Nashik Crime News : सात महिन्यांत 8 गुंड कारागृहात; गंभीर गुन्ह्यातील सराईत गुंड स्थानबद्ध

Nashik Crime News : सात महिन्यांत 8 गुंड कारागृहात; गंभीर गुन्ह्यातील सराईत गुंड स्थानबद्ध
esakal
Updated on

Nashik Crime News : शहरातील वाढत्या गुन्हेगारीविरोधात पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांची धडक कारवाई सुरूच असून, आणखी एका सराईत गुंडाविरोधात स्थानबद्धतेची कारवाई करीत नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली आहे.

रोशन विश्वास लवटे (वय २९, रा. सोमवार बाजार, देवळाली गाव) असे स्थानबद्ध करण्यात आलेल्या गुंडाचे नाव आहे. (goon sent to Nashik Road Central Jail nashik crime news)

रोशन लवटे याच्याविरोधात नाशिक रोड व उपनगर पोलिस ठाण्यात घरात बेकायदेशीर घुसणे, घरफोडी, चोरी, मारहाण, खुनाचा प्रयत्न, स्फोटक पदार्थ बाळगणे, दंगा करणे, जबरी चोरी आदी गंभीर गुन्हे दाखल आहेत. लवटे याने देवळाली गाव, नाशिक रोड, रोकडोबावाडी, विहीतगाव व परिसरात दहशत निर्माण करण्यासाठी अनेक गंभीर गुन्हे केले.

त्यास १२ जुलै २०२२ मध्ये शहर व ग्रामीण भागातून तीन महिन्यांसाठी तडीपारही करण्यात आले होते. त्यामुळे शहराच्या सार्वजनिक शांततेस बाधा निर्माण झाली होती. त्यामुळे त्याच्याविरोधात एमपीडीए कायद्यानुसार मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे. या कारवाईमुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Nashik Crime News : सात महिन्यांत 8 गुंड कारागृहात; गंभीर गुन्ह्यातील सराईत गुंड स्थानबद्ध
Nashik Crime News : चुंचाळे शिवारातील गुन्हेगारी पोलिसांसाठी डोकेदुखी; परप्रांतीय कामगारांची वसाहत

यंदा आठ गुन्हेगार स्थानबद्ध

सराईत गुन्हेगारांच्या गुन्हेगारी कृत्यामुळे शहरवासीयांमध्ये दहशत निर्माण होते. त्यामुळे अशा गुन्हेगारांविरोधात पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी स्थानबद्धतेचा हत्यार उपसले आहे.

त्याअंतर्गत गेल्या सात महिन्यांत आठ सराईत गुंडाची स्थानबद्धतेखाली मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. २०२१ मध्ये नऊ, तर २०२२ मध्ये दोन गुंडावर स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आलेली होती. आयुक्तांच्या या कारवाईमुळे सराईत गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहे.

Nashik Crime News : सात महिन्यांत 8 गुंड कारागृहात; गंभीर गुन्ह्यातील सराईत गुंड स्थानबद्ध
Nashik Crime News : नाशिकरोडला पुन्हा 4 गाड्याची तोडफोड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.