Nashik News: गोसेवक चिंगूने वाचविले जखमी गाय अन् वासराचे प्राण

Gosevak Chingu Tiwari from Lasalgaon treating an injured cow and calf
Gosevak Chingu Tiwari from Lasalgaon treating an injured cow and calfesakal
Updated on

Nashik News : येथील गोसेवक चिंगू तिवारी यांनी जखमी अवस्थेत असलेली गाय व नुकत्याच जन्मलेल्या तिच्या वासरावर योग्यवेळी उपचार करत त्यांना मृत्यूच्या दाढेतून काढत प्राण वाचविले. त्याबद्दल त्याचे कौतुक होत आहे. (Gosevak Chingu saved injured cow and calf life Nashik News)

रविवारी (ता.१६) पावसाच्या वातावरणात एक गाय तिच्या पिल्लाला जन्म देत असताना मोकाट कुत्र्यांनी तिच्यावर हल्ला केला. अर्धवट अवस्थेत हे वासरू जमिनीवर पडले, त्यात त्याचे पाय जखमी झाले.

अवघ्या काही तासाचे हे वासरू उभे राहू शकत नव्हते. मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात गाय व वासरू एकमेकांपासून दुरावले होते. जखमी अवस्थेत असलेल्या वासराला येथे नमन व्यास, अमन व्यास, रेहान शेख यांनी सुरक्षित ठिकाणी आणले.

तातडीने गोसेवक चिंगूला कळविण्यात आले. चिंगू तिवारीने जखमी वासराला दुचाकीवर पुढे टाकत मोकाट जनावरांचा कळप असलेल्या ठिकाणी दुचाकी नेत गायीचा शोध लावला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Gosevak Chingu Tiwari from Lasalgaon treating an injured cow and calf
Nashik Police Bike Squad: नागरिकांच्या मदतीसाठी ग्रामीण पोलिसांचे 27 दुचाकींचे पथक

जखमी गाय वासराच्या मागे मागे पळत सुरक्षित ठिकाणी आल्यानंतर सर्वप्रथम वासराला गाईचे दूध पाजण्याचा प्रयत्न केला, पण उपयोग झाला नाही. चिंगू तिवारी व त्यांच्या साथीदारांनी अथक प्रयत्नांने गाईचे पाय बांधून कच्चे दूध काढून बाटलीद्वारे वासराला दूध पाजल्यानंतर वासराने थोडीफार हालचाल सुरू केली.

चिंगू मित्रपरिवाने स्वखर्चाने जखमी गाईसाठी औषध विकत आणून घरी व वासरावर उपचार करून त्यांचे प्राण वाचविले. चिंगू तिवारी, ओम अहिरे, विशाल गिते, यश शर्मा, ऋषिकेश शर्मा यांनी सहभाग घेतला.

Gosevak Chingu Tiwari from Lasalgaon treating an injured cow and calf
Nashik: 36 कोटींचे कामे पुरवणी अर्थसंकल्पात; भुजबळांच्या प्रयत्नांतून मतदारसंघातील कामे मार्गी लागणार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.