Nashik News : बाबाजींच्या कृपेने मिळाली जगण्याची ‘दृष्टी’; धर्मसोहळ्यात सलीम पठाणने उलगडला जीवनपट

अकराव्या वर्षी माझी दृष्टी गेली. अनेक दवाखाने केले, परंतु पुढील तीन वर्षे डोळ्यासमोर अंधारच होता.
Salim Pathan
Salim Pathan esakal
Updated on

Nashik News : अकराव्या वर्षी माझी दृष्टी गेली. अनेक दवाखाने केले, परंतु पुढील तीन वर्षे डोळ्यासमोर अंधारच होता. अशा काळात एका सत्संगाच्या निमित्ताने स्वामी शांतीगिरी महाराजांची भेट झाली.

त्यांनी मौनव्रतात सात दिवस अनुष्ठान करण्याचा सल्ला दिला. (Got vision back through shantigiri maharaj grace to salim pathan nashik news)

अनुष्ठानानंतर आठव्या दिवशी पुन्हा सारे काही स्पष्ट दिसू लागल्याचे खडक माळेगाव येथील सलीम इस्माईल पठाण यांनी सांगितले. राजकारण्यांकडून एकीकडे दोन धर्मात, समाजात तेढ निर्माण करून स्वतःची पोळी भाजून घेण्याच्या काळात आपल्या वागणुकीने दोन्ही समाजातील कट्टर पंथीयांना विचार करायला लावणारी ही कथा स्वतः सलीमनेच गुरवारी (ता.२०) साधुग्राममध्ये ‘सकाळ’ च्या प्रतिनिधीला सांगून दोन धर्मात वाद निर्माण करणारांच्या डोळ्यात झणझणीत अंजनही घातले.

जय बाबाजी भक्त परिवारातर्फे जगदगुरू जनार्दन स्वामी महाराज यांच्या ३४ व्या पुण्यस्मरणानिमित्त तपोवनातील साधुग्राम येथे धर्मसोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने जपानुष्ठान, महायज्ञ, भागवत पारायण, नामसंकीर्तन, हस्तलिखित नामजप, भागवत पारायण, श्रमदान आदी उपक्रम हजारो भाविकांच्या उपस्थितीत सुरू आहेत.

आज या सोहळ्यात सलीम इस्माईल पठाण यांची भेट झाली. तेव्हा त्यांनी आपला जीवनपट उलगडून सांगितला. मी मुस्लिमधर्मीय असून खडक माळेगाव येथील रहिवासी असल्याचे त्यांनी सांगितले. अकराव्या वर्षी अचानक दृष्टी गेली अन् पुढील तीन वर्षे सर्वत्र अंधारच दिसू लागला. या काळात अनेक रुग्णालयात उपचार घेतले, परंतु दृष्टी आलीच नाही.

Salim Pathan
Nashik News: पडक्या घरांमध्ये पोलिस कुटुंबीयांचा निवास; 50 टक्के खोल्या बंद

अशावेळी महामंडलेश्वर शांतीगिरी महाराज यांची एका सत्संगाच्या निमित्ताने भेट झाली. त्यांनी सात दिवस मौनव्रतात अनुष्ठान करण्यास सांगितले. त्यानुसार श्रद्धेने बाबाजींनी जे सांगितले, ते सर्व केले अन्‌ आठव्या दिवशी डोळ्यांनी दिसू लागले. तेव्हापासून गत १७ वर्षे बाबाजींच्या सानिध्यात असल्याचे सलीमने सांगितले. आजवर तीनवेळा पायी नर्मदा परिक्रमा केल्याचे सलीम सांगतो.

अनुष्ठानाबरोबरच नमाजही

बाबाजींचा शिष्य बनल्यावर हिंदू धर्मात धर्मांतर करण्याविषयी बाबाजींना विनंती केली. तेव्हा धर्म बदलत नसतो, खरेतर माणुसकी हाच खरा धर्म असल्याची शिकवण बाबाजींनी दिली. वेगळ्या धर्माचा असूनही बाबाजींनी प्रेम दिले, जगण्याची नवी दृष्टीही दिली.

बाबा एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी हिंदूधर्मीय पुजाअर्चेबरोबरच नियमित नमाज पढण्याचाही सल्ला दिल्याचे सलीम यांनी सांगितले. दोन धर्मात तेढ निर्माण न होता जगात सुखशांती नांदावी, अशी अपेक्षा त्यांनी शेवटी व्यक्त केली.

Salim Pathan
Nashik News: पडक्या घरांमध्ये पोलिस कुटुंबीयांचा निवास; 50 टक्के खोल्या बंद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.