Nashik News: शासनाने टोल बंद करण्याची मागणी! रस्त्यांची डागडुजी करा; उद्योजक आणि प्रमुख 26 संघटनांचा इशारा

Representatives of organizations and associations attending the joint meeting of twenty-six organizations
Representatives of organizations and associations attending the joint meeting of twenty-six organizationsesakal
Updated on

Nashik Toll : नाशिक जिल्ह्यातील सर्व राज्य व राष्ट्रीय महामार्गांची व इतर रस्त्यांची त्वरित डागडूजी करावी.

याबाबत त्वरित निर्णय न झाल्यास टोल आकारू नये, असा निर्णय वजा इशारा नाशिक इंडस्ट्री मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (निमा)तर्फे निमा सभागृहात आयोजित उद्योजक, व्यावसायिक, व्यापारी आणि नागरिकांच्या प्रमुख २६ संघटनांच्या संयुक्त बैठकीत देण्यात आला.

वाहतुकीच्या मार्गात अडथळे ठरणारे अतिक्रमण काढावेत, हवाई सेवेचे व्यापक जाळे विणावे, तसेच नाशिकहून मुंबईसाठी जलद रेल्वेसेवा सुरू करावी आदी बाबींसहित नाशिक जिल्ह्याच्या विकासाला पूरक अनेक मागण्यांवर विस्तृत चर्चा करण्यात आली. (Government demand to stop toll repair roads Warning of entrepreneurs and major 26 associations Nashik News)

व्यासपीठावर निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे, आयमाचे अध्यक्ष, क्रेडाईचे हितेश पोद्दार, नाईसचे अध्यक्ष रमेश वैश्य, निपमचे हेमंत राख, चेंबरचे कांतिलाल चोपडा, लघु उद्योग भारतीचे विवेक कुलकर्णी, निमाचे माजी अध्यक्ष विवेक गोगटे, तानचे सागर वाकचौरे, प्रॅक्टिशनर इंजिनिअर असोसिएशनचे अनिल कडभाने आदी मान्यवर उपस्थित होते.

बैठकीत नाशिक शहर, तसेच जिल्ह्यातील रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत उपस्थित प्रतिनिधींच्या भावना तीव्र होत्या. आपण सर्व टोल भरतो, त्या तुलनेने रस्ते चांगले नसतील तर त्याचा उपयोग काय.

मुंबईला जायला जर आठ-आठ तास लागत असतील तर ते आम्ही कसे खपवून घ्यायचे, असा संतप्त सवाल करून रस्त्यांची डागडुजी लवकर न झाल्यास शासनाने स्वतःहून या मार्गांवरील टोल बंद करावे, असा एकमुखी निर्णयही बैठकीत घेण्यात आला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Representatives of organizations and associations attending the joint meeting of twenty-six organizations
Anil Bhaidas Patil: आता माघार नाही... 3 पक्षांसोबत आगामी निवडणुका : मंत्री अनिल पाटील

वंदे भारत आणि जनशताब्दीच्या धर्तीवर नाशिकहून मुंबईला तीन तासांत पोचवणारी जलद रेल्वे हवी, नाशिकहून मुंबईसाठी लोकल सेवेचे व्यापक जाळे विणले जावे, कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रस्तावित केलेल्या बाह्य रिंग रोडला त्वरित मंजुरी मिळावी, महापालिकेच्या बंद असलेल्या सर्व जकात नाक्यांजवळ ट्रक टर्मिनस उभारावे, वाहतुकीची कोंडी कमी करण्यास सार्वजनिक वाहतूक सेवेवर सर्वांनीच भर द्यावा,

शिंदे-पळसे टोल नाक्यावर मनुष्यबळ वाढवावे, ओझर विमानतळावरून सर्व ठिकाणी जाण्यास बस कनेक्टिव्हिटी हवी, नाशिक ते वडसा रेल्वे मार्ग तयार व्हावा, नाशिक येथे आयआयटी आणि आयएएम महाविद्यालये सुरू व्हावीत, नागरिकांच्या सनदच्या धर्तीवर उद्योजकांची सनद तयार करावी ही मागणी मंजूर झाली असून, त्याची त्वरित अंमलबजावणी व्हावी आदी महत्त्वपूर्ण सूचना बैठकीत करण्यात आल्या.

बैठकीस निमाचे कोषाध्यक्ष विरल ठक्कर, राजेंद्र वडनेरे, मिलिंद राजपूत, कैलास पाटील, नरेश पारख, गिरीश नवसे, नंदन दीक्षित, सचिन पाटील, सचिन बागड, हितेश पोद्दार, मनोज वासवानी, आनंद सूर्यवंशी, राजेंद्र फड, अमित अलई, मनीष रावल, किरण वाजे, गोविंद झा, दिलीप वाघ, सुधाकर जाधव, सागर देवरे, श्रीकांत पाटील,

सुभाष जांगडा, निखिल तापडिया, संजय राठी, वैभव चावक यांच्यासह नाईस, निपम, निवेक, लघुउद्योग भारती, तान, ट्रान्सपोर्ट असोसिएशन, सराफ असोसिएशन, निर्यातदार संघटना आदींसहित नाशिकमधील सर्व प्रमुख २६ संस्था आणि संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Representatives of organizations and associations attending the joint meeting of twenty-six organizations
Dhule News: साखळी बंधाऱ्यांमुळे बोरी होणार बारमाही! 4 कोटींतून बंधारे आकारास

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.