Government Employees Strike : जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी पुकारण्यात आलेल्या आजपासूनच्या बेमुदत संपामध्ये जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या जिल्हाभरातील वर्ग तीन व चारच्या साडेचारशे कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. तर, जिल्हा रुग्णालयातील २६८ कर्मचारी या संपात सहभागी झाले होते.
यामुळे रुग्णालयीन सेवा विस्कळीत होण्याची शक्यता होती. परंतु राष्ट्रीय आरोग्य अभियान, नर्सिंग महाविद्यालयाचे विद्यार्थीनी व कंत्राटी कर्मचार्यांमुळे रुग्णालयातील सेवा सुरळीत सुरू राहिली.
दरम्यान, रुग्णालयातील अत्यावश्यक सेवा देण्यासाठी संपातील कर्मचार्यांनी काळ्या फिती लावून कर्तव्य बजावले. (Government Employees Strike 450 employees of health department strike essential services smooth Services rendered by NHRM contractors nashik)
राज्याभरातील शासकीय - निमशासकीय कर्मचारी संघटनांनी २००५ पूर्वीची जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी व कर्मचारी भरती प्रक्रिया राबविण्याच्या मागणीसाठी आजपासून बेमुदत संप पुकारला आहे.
या संपामध्ये जिल्हा शासकीय रुग्णालयासह जिल्ह्यातील उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयातील वर्ग तीन आणि चारच्या कर्मचार्यांनीही सहभागी झाले होते.
जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमाेर महाराष्ट्र गर्व्हमेंट नर्सेस फाऊंडेशन संलग्न नाशिक जिल्हा नर्सेस असोसिएशनच्या अध्यक्षा पूजा पवार, कार्याध्यक्ष सीमा टाकळकर, सरचिटणीस कल्पना पवार यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा रुग्णालयातील परिचारिका व वॉर्ड बॉय यांनी आंदोलन केले.
तर नाशिक जिल्हा रुग्णालय चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटनेचे भगवान शिंदे यांच्या नेतृत्वाखाली चतुर्थश्रेणी कर्मचारी संपात सहभागी झाले होते. यवेळी संपकर्यांनी सरकारविरोधी घोेषणाबाजी करीत, जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत घोषणाबाजी केली.
संपात नर्सेस संघटनेच्या पूजा पवार, सीमा टाकळकर, कल्पना पवार, विशाल सोनार, दिनेश खैरनार, सोनल मोरे, शोभा सोनवणे यांच्यासह परिचारिका तर, चर्तुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भगवान शिंदे, सचिव दिलीप बोढरे, किसन धुर्गज, सागर वाडिले, दिनेश पारते, अनुज बेद, प्रकाश गुळवे, धनवीज चंडालिया आदींनी सहभाग घेतला होता.
रुग्णसेवा सुरळीत
जिल्हा रुग्णालयातील १७० परिचारिका व वॉर्डबॉय तर, चतुर्थ श्रेणीचे ९८ असे एकूण २६८ कर्मचारी संपात सहभागी झाले होते. रुग्णालयीन सेवा सुरळीत ठेवण्यासाठी जिल्हा नर्सिंग महाविद्यालयाच्या नर्सेस, राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे (एनएचआरएम) नर्सेस, कंत्राटी कर्मचारी असे सुमारे १७० कर्मचार्यांची नियुक्ती केली होती.
तसेच, अत्यावश्यक सेवेतील परिचारिका व चतुर्थ श्रेणीतील कर्मचार्यांनी काळ्या फिती बांधून संपात सहभाग दर्शविला आणि रुग्णसेवेत प्रत्यक्ष कामकाजही केले. त्यामुळे जिल्हा रुग्णालयातील रुग्णसेवा सुरळीत राहिल्याचे दिसून आले.
वर्ग.........एकूण कर्मचारी......संपात सहभागी
वर्ग-३.......४८०..............३३५
वर्ग-४.......१८४..............११५
"संपाची पूर्वकल्पना असल्याने दोन दिवस आधीच पूर्वतयारी करण्यात आली होती. नाशिक, मालेगावात नर्सिंग महाविद्यालयाचे विद्यार्थी, एनएचआरएमचे कर्मचारी व कंत्राटी कर्मचार्यांची नियुक्ती केली. त्यामुळे शस्त्रक्रिया व अत्यावश्यक सेवा सुरळीत पार पडल्याने कुठेही अडचण निर्माण झाली नाही."- डॉ. चारुदत्त शिंदे, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा रुग्णालय.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.