Nashik News : ग्रामीण भागात खाजगी वाहनांवर सरकारी लोगो; पोलीसांच्या नाकावर टिच्चून धावताहेत रस्त्यावर

file photo
file photoesakal
Updated on

Nashik News : ग्रामीण भागात वाहतूक सुरक्षेबाबत फारशी प्रभावी कारवाई होत नसल्याने धुम स्टाईल धावणारे दुचाकीस्वार, कर्णकर्कश हार्न तसेच पोलीस, भारत सरकार, महाराष्ट्र शासन आदि फलक खाजगी वाहनाच्या काचेवर तसेच फॅन्सीनंबर फ्लेटचा वापर करून सर्रासपणे संबंधित विभागाच्या नाकावर टिच्चून रस्त्यावर धावत आहेत.

दरम्यान पोलीस विभागातील मनुष्यबळ अल्प असून मोजक्याच आधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांवर भिस्त असल्याची चर्चा आहे.  (Government logo on private vehicles in rural areas running on road neglect police Nashik News)

 ग्रामीण भागातील वाहन अपघातात वाढ होत चालल्याचे चित्र निर्माण झाले आहे. रस्त्यावर विना परवाना अवैध वाहतूक तसेच खाजगी वाहनांवर पोलिस, महाराष्ट्र शासन, भारत सरकार, प्रेस तसेच कर्णकर्कश हार्न दुचाकीला लावून बिनदिक्कत लावून फिरताना दिसून येत आहेत.

तसेच बरेच दुचाकीस्वार दुचाकीचे सायलेन्सरचा आवाज बदलून ध्वनिप्रदूषण करीत आहेत तर अनेक जण फॅन्सीनंबर फ्लेट बसवून भाईगिरी करताना आढळून येतात. अशी वाहने पोलीस तपासणीतून सहजासहजी सुटतात.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

file photo
Nashik News: त्र्यंबकेश्वरला पंगतीतील भेदाला मूठमाती! अंनिसने आक्षेप घेतलेली गावजेवणातील वेगळी पंगत बंद

अशा वाहनांमार्फत वाहतुकीचे बहुतांश नियम धाब्यावर बसविले जातात. पण असे करणा-यावर कारवाईचा बडगा कोण उगारणार असा प्रश्न सर्वसामान्य व्यक्तीला नेहमीच पडत असतो. याशिवाय भारताची राजमुद्रा, सैन्यातील विविध चिन्हांची प्रतिकृतीदेखिल खाजगी वाहनावर लावलेले दिसून येत आहेत तसेच पोलीसांचे गोलाकार बोधचिन्हही बऱ्याच वाहनांवर निदर्शनास येत आहेत.

आरटीओच्या नियमाप्रमाणे खाजगी वाहनांवर अशा प्रकारे नाव वापर करणे हा गुन्हा आहे. असे असतांनाही संबधित विभागाकडून कोणतीही कारवाई होत नाही त्यामुळेच अशा वाहनांचे प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. संबंधित विभागाकडून अशा वाहनांवर काय कारवाई करणार याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे.

file photo
Nashik ZP News : जि. प. जलसंधारण विभागाच्या टेंडर क्लार्कचा पदभार काढला; वाढत्या तक्रारीमुळे निर्णय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.