Asha Workers Protest: आशा व गटप्रवर्तक यांच्या संपाबाबत तोडगा काढण्यासाठी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत उपाध्यक्ष झिरवाळ यांनी कृती समिती मागण्यांची दखल घेऊन राज्य सरकारने कंत्राटी कर्मचारी दर्जांबाबत निर्णय घ्यावा, तसेच मानधनात वाढ करावी, अशा सूचना आरोग्य विभागास दिल्या.
राज्यभरातील ७० हजार आशा, तीन हजार ६०० गटप्रवर्तक प्रलंबित मागण्यांसाठी १८ ऑक्टोबरपासून संपावर आहेत. (government should take decision regarding contract staff status suggested by Deputy Speaker of Legislative Assembly nashik news)
आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत मानधनात वाढ देण्याचा निर्णय झाला होता; परंतु मागण्यांवर कोणताही तोडगा निघाला नव्हता. गटप्रवर्तकांना कंत्राटी कर्मचारी दर्जा द्या, मोबदल्यात सहा हजार २०० केलेली वाढ १० हजार करावी, सामाजिक सुरक्षा लागू करा या मागण्यांसाठी संप सुरू आहे.
मागण्यांबाबत विधानसभेचे उपाध्यक्ष झिरवाळ यांनी विधान भवनातील दालनात बैठक घेतली. बैठकीस आशा गटप्रवर्तक संघटना कृती समिती पदाधिकारी तसेच आरोग्य अभियान अतांत्रिक सहसंचालक सुभाष बोरकर, आरोग्य विभाग, विधी विभाग, अधिकारी उपस्थित होते. बैठकीत गटप्रवर्तकांवर झालेल्या अन्यायाबाबत पुरावे देण्यात आले. कंत्राटी कर्मचारी दर्जा द्या या विषयावर बैठकीत सविस्तर चर्चा झाली.
कृती समिती मागण्यांची दखल घेऊन राज्य सरकारने कंत्राटी कर्मचारी दर्जाबाबत निर्णय घ्यावा, गटप्रवर्तकांना १० हजार रुपये वाढ द्यावी, संपकाळातील मानधन कपात करण्यात येऊ नये अशा सूचना झिरवाळ यांनी बैठकीत दिल्या. संप काळात तीन बैठका घेण्यात आल्या. त्याचा लेखी इतिवृत्तांत द्यावा, असा निर्णय सांगितला.
वरील सर्व मागण्यांबाबत आरोग्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचेही झिरवाळ यांनी सांगितले. मागण्या मान्य होईपर्यंत संप मागे घेणार नाही, असे सांगितले. या वेळी एम. ए. पाटील, राजू देसले, डॉ. डी. एल. कराड, आनंदी अवघडे, शंकर पुजारी, राजेश सिंग उपस्थित होते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.