Ramesh Bais : राज्यपाल रमेश बैस घेणार पहिणे गाव दत्तक? दौऱ्याची प्रशासनाकडून जोरदार तयारी

Ramesh Bais
Ramesh BaisEsakal
Updated on

किरण कवडे : सकाळ वृत्तसेवा

Nashik News : तत्कालीन राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांनी नाशिक जिल्हा दौऱ्यात इगतपुरी तालुक्यातील आशाकिरणवाडी (पूर्वीचे नाव वैतागवाडी) हे गाव दत्तक घेतले असताना महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस हे देखील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पहिणे हे गाव दत्तक घेण्याची शक्यता आहे. (Governor Ramesh Bais is likely to adopt Pahine village in Trimbakeshwar taluka nashik news)

सूत्रे हाती घेतल्यानंतर प्रथमच राज्याच्या दौऱ्यावर निघालेले राज्यपाल बैस नाशिक जिल्ह्यात येत असून पहिणे गावातील अंगणवाडी, आरोग्य केंद्र व ग्रामपंचायतीच्या ग्रंथालयास भेट देणार आहेत. येथील ग्रामस्थांशी संवादही साधणार असल्याने गावचे रुपडे पालटले आहे.

आदिवासी बहुल गावांना मूलभूत सुविधा पुरवल्या जाव्यात, या दृष्टीने शासनामार्फत प्रत्येक तालुक्यातील एक गाव दत्तक घेण्याचे काम प्रगतिपथावर आहे. त्याचाच एक भाग म्हणून नाशिक जिल्हा दौऱ्यावर येत असलेले राज्यपाल रमेश बैस हे पहिणे गावाला प्रत्यक्ष भेट देणार आहेत.

गावाच्या समस्या, रोजगार, साक्षरता या संदर्भात माहिती जाणून घेणार आहेत. या गावाला दत्तक घेउन त्याचा सर्वांगिण विकास करण्यासाठी राज्यपाल हे प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगण्यात येते. याविषयी ते बुधवारी घोषणा करतात का याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

Ramesh Bais
हॉल तिकीटवर तारीख आजची, पण परीक्षा तर कालच झाली! नाशिक, नागपूरात बीएड प्रवेश परीक्षेवेळी गोंधळ

२९५४ लोकसंख्येचे गाव

पहिणे या गावात १ एप्रिल १९६० साली ग्रामपंचायतीची स्थापना झाली. यात पहिणे, भिलमाळ आणि कोजुली असे तीन गावे असून तेथे १४ पाडे आहेत. देवगाव हे जिल्हा परिषद गटाचे नाव असून अंजनेरी हा पंचायत समिती गण आहे. २०११ सालच्या लोकसंख्येनुसार या गावाची लोकसंख्या २९५४ एवढी आहे. त्यात १४५४ महिला,१५०० पुरुष आहेत. यात ३०३ अनुसूचित जातीचे लोकही वास्तव्य करतात.

गावचे वैशिष्ट्ये

-पहिणे ग्रामपंचायतीचे १७६६ हेक्टर भौगोलिक क्षेत्र

- येथे १८५ कुटुंबांकडे शिधा पत्रिका आहेत

- या गावात प्रधानमंत्री आवास योजनेतून ७३ घरे, शबरी आवास योजनेतून १७ व रमाई आवास

योजनेतून १५ असे एकूण १०५ घरांचा लाभ ग्रामस्थांना मिळाला आहे

- भात,गहू,नागली,वरई ही मुख्य पिके आहेत

- गावाचे लोकसंख्या साक्षरतेचे प्रमाण हे ५९ टक्के असून यात १००२ पुरुष व ७६४ महिला

- ४१ टक्के लोक हे निरक्षर, यात ४९८ पुरुष व ६९० महिला

-पर्यटनाच्या दृष्टीने या गावचा विकास होऊ शकतो

Ramesh Bais
NMC News : आता खासगीकरणातून बाजार शुल्क वसुली; महापालिका करणार एजन्सीची नियुक्ती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.