गोविंदनगर रस्ता खचला; महापालिकेची ठक्कर डेव्हलपर्सला नोटीस

NMC Latest marathi news
NMC Latest marathi newsesakal
Updated on

नाशिक : गेल्या दोन दिवसात झालेल्या मुसळधार पावसाने (Heavy rain) सध्या सर्वाधिक वर्दळीचा बनलेल्या गोविंदनगरचा रस्ता आर. डी. सर्कल येथे खचला. यामुळे वाहनधारकांना मनस्तापाबरोबरच वाहतूक पोलिस व महापालिकेच्या (NMC) कर्मचाऱ्यांना भर पावसात काम करावे लागले.

सर्कलजवळ गोविंदनगरच्या बाजूने डाव्या बाजूला असलेल्या ठक्कर बिल्डर्स ॲण्ड डेव्हलपर्सला बांधकाम विभाग व नगररचना विभागाने नोटीस बजावली. दरम्यान, रस्त्याचे काम करून देण्याची तयारी संबंधित बिल्डर्सने दर्शविल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली. (Govindnagar road damaged Municipal Corporation issues notice to thakkar developers nashik rain Latest Marathi News)

NMC Latest marathi news
Nashik : भर पावसात माजी नगरसेवक उतरले रस्त्यावर

विवारपासून शहर व परिसरात पावसाची संततधार आहे. पावसामुळे बांधकाम विभागाच्या रस्ते कामाचे पितळ उघडे पडले आहे. रस्त्यावरचा वरचा भाग उखडून खडी इतरत्र पसरली आहे. तर अनेक ठिकाणी रस्ते खचण्याचे प्रकार होत आहे.

गोविंदनगर ते सिटी सेंटर मॉल हा शंभर फुटी रस्ता भक्कम असताना सोमवारी (ता. ११) पावसात खचला. ज्या भागात रस्ता खचला तेथे कमर्शिअल बांधकामासाठी मोठा खड्डा खोदण्यात आला आहे. पावसाचा जोर वाढल्याने खड्ड्यातील माती ढासळू लागली.

काही वेळानंतर रस्ताच खचल्याने वाहतूक बंद करावी लागली. वाहतूक ठप्प झाल्याने गोविंद नगर ते सिटी सेंटर मॉल पुलापर्यंत एकेरी वाहतूक करण्यात आली. बांधकाम विभागाने संबंधित बिल्डर्सला प्रकाराची कल्पना दिली. मंगळवारी (ता. १२) रस्ता दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले.

NMC Latest marathi news
रस्त्यांचे पितळ उघडे; पावसाने पडले खड्डे अन् रस्त्यावर पसरली खडी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.