Nashik News: दरसवाडी- डोंगरगाव कालव्याच्या निविदेला शासनाची मान्यता; भुजबळ यांच्या प्रयत्नांमुळे चालना

मातीकाम, बांधकाम, अस्तरीकरण करण्यासाठी मंत्री भुजबळ यांच्या प्रयत्नांमुळे चालना
Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbalesakal
Updated on

येवला : दरसवाडी-डोंगरगाव पोहोच कालवा व पुणेगाव दरसवाडी डावा कालवाचे मातीकाम, बांधकाम व अस्तरीकरण करण्यासाठी २५२ कोटी ७४ लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून, निविदेस शासनाने मंजुरी दिली असल्याने या कामाचे कार्यारंभ आदेश निर्गमित होऊन प्रत्यक्ष कामाला सुरवात होणार आहे. (Govt approves Daraswadi Dongargaon canal tender Boosted by chhagan Bhujbal efforts Nashik News)

सतत दुष्काळाच्या छायेत असलेला येवला तालुका होता. २००४ पासून मंत्री भुजबळ यांनी येवला मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. त्यांनी हजारो कोटी रुपयांची विविध विकासकामे करून पिण्याच्या पाण्याची व सिंचनाची कामे मार्गी लावली.

त्यांच्या माध्यमातून येवल्यासाठी असलेला मांजरपाडा प्रकल्प पूर्ण झाला आहे. या प्रकल्पातील दरसवाडी पोहोच कालवा व पुणेगाव डावा कालव्याची वहनक्षमता वाढविण्यासाठी या कालव्याचे मातीकाम, बांधकाम व अस्तरीकरणाचे त्यांचे प्रयत्न होते.

त्यानुसार या कामासाठी यापूर्वीच निधीला मंजुरी दिली होती. या कामास मंजुरी मिळाल्यानंतर निविदा प्रक्रिया राबवून कामास सुरवात व्हावी, यासाठी त्यांचा सातत्याने पाठपुरावा सुरू होता.

आता दरसवाडी पोहोच कालवा ० ते ८८ किलोमीटरचे मातीकाम बांधकामे व अस्तरीकरणाच्या नूतनीकरण करण्यासाठी १५२ कोटी ९० लक्ष, तर पुणेगाव डावा कालवा ० ते ६३ किलोमीटरचे मातीकाम व अस्तरीकरणाच्या नूतनीकरणासाठी ९९ लक्ष ८४ रुपयांची निविदा प्रक्रिया राबविली.

Chhagan Bhujbal
Nashik Onion News : उन्हाळ कांद्याच्या लागवड क्षेत्रात घट; सुमारे सव्वा ते दीड लाख क्षेत्रावरच लागवडीचा अंदाज

ही निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून, निविदा प्रस्तावास शासनाने मंजुरी दिल्यामुळे या कामाचे कार्यारंभ आदेश निर्गमित होऊन प्रत्यक्ष कामाला सुरवात होणार आहे.

हे काम पूर्ण झाल्यानंतर मांजरपाडाचे पाणी डोंगरगावपर्यंत जाऊन येवला तालुक्यातील सिंचन क्षमतेत अधिक वाढ होईल. त्याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे.

तालुक्यातील शेतकरी या कालव्याला पाणी यावे, यासाठी चातकासारखी वाट पाहत असून, दुष्काळी उत्तर-पूर्व भागाला जलसंजीवनी देणारा हा कालवा ठरणार असल्याने त्याच्या कामाकडे सर्वांचे तालुक्याचे लक्ष लागून आहे.

Chhagan Bhujbal
World Post Day: 5 हजार विद्यार्थ्यांचे पंतप्रधानांना पत्र; टपाल दिनानिमित्त क्वालिटी सिटी नाशिकच्या माध्यमातून उपक्रम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.