Gram Panchayat Election 2022: बागलाणला सरासरी 78 टक्के मतदान; थेट सरपंचपदाच्या निवडणुकीसाठी उत्साह

Gram Panchayat Election 2022
Gram Panchayat Election 2022esakal
Updated on

सटाणा (जि. नाशिक) : बागलाण तालुक्यातील ४१ ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी रविवारी (ता. १८) किरकोळ अपवाद वगळता शांततापूर्ण वातावरणात मतदान पार पडले. तालुक्यातील तीन ग्रामपंचायत यापूर्वीच बिनविरोध झाल्याने आज ३८ ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले. तालुक्यात थेट सरपंचपदासाठी ११२, तर सदस्यपदासाठी ४४५ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. दिवसभरात सरासरी ७८ टक्के मतदान झाले. (Gram Panchayat Election Average turnout for Baglan 78 percent Enthusiasm for direct Sarpanch elections Nashik News)

बागलाण तालुक्यातील चौगाव येथील मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी आलेले दिव्यांग शांताराम मांडवडे (वय ६८), उत्तम जगताप (वय ९०) यांना उचलून आणताना युवक. दिव्यांग दाम्पत्य समाधान शेवाळे, गीता शेवाळे, वृद्ध दाम्पत्य कौतिक मांडवडे (वय ९०) व सुलकनबाई मांडवडे (८५) तर आराई (ता. बागलाण) येथे मतदानासाठी वृद्ध महिला व ग्रामस्थांना आणताना. (छाया : रोशन खैरनार, सटाणा)
बागलाण तालुक्यातील चौगाव येथील मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी आलेले दिव्यांग शांताराम मांडवडे (वय ६८), उत्तम जगताप (वय ९०) यांना उचलून आणताना युवक. दिव्यांग दाम्पत्य समाधान शेवाळे, गीता शेवाळे, वृद्ध दाम्पत्य कौतिक मांडवडे (वय ९०) व सुलकनबाई मांडवडे (८५) तर आराई (ता. बागलाण) येथे मतदानासाठी वृद्ध महिला व ग्रामस्थांना आणताना. (छाया : रोशन खैरनार, सटाणा) esakal

सरपंच पदासाठी थेट जनतेतून मतदान होणार असल्याने मतदारांमध्ये उत्साह होता. तालुक्यात अनेक गावांमध्ये काट्याची लढत पाहायला मिळाली. सकाळपासूनच मतदान केंद्रांवर मतदारांनी गर्दी केली होती. काही गावातील मतदान केंद्रांवर सकाळी, तर काही केंद्रांवर दुपारनंतर रांगा लागल्या होत्या. (Gram Panchayat Election 2022 Updates)

सकाळी दहापर्यंत तालुक्यात सरासरी २७ टक्के मतदान झाले. दुपारी एकच्या दरम्यान ४६ टक्के मतदान पूर्ण झाले होते. दुपारनंतर महिला मतदानासाठी बाहेर पडल्याने मतदान केंद्रांवर रांगा लागल्या होत्या. त्यामुळे दुपारी साडेतीनला तालुक्यात ६८.२२ टक्के मतदनाची नोंद झाली होती. सायंकाळी ५.३० पर्यंत एकूण ७८ टक्के मतदान झाले.

तालुक्यातील चौगाव, मुंजवाड, आराई, डांगसौंदाणे, वीरगाव, जायखेडा, आसखेडा, टेंभे वरचे व खालचे, पिंपळकोठे, मोरेनगर आदी संवेदनशील गावांमध्ये अनुचित प्रकार घडू नये, यासाठी चोख पोलिस बंदोबस्तासह दंगा नियंत्रण पथक व राज्य राखीव दलाची तुकडी तैनात होती.

पोलिस अधिकारी पुष्कराज सूर्यवंशी व पोलिस निरीक्षक सुभाष अनमूलवार यांनी संवेदनशील मतदान केंद्रांची पाहणी केली. मतदान यंत्रांना काही तांत्रिक अडचणी येऊ नयेत म्हणून बागलाणचे उपविभागीय अधिकारी बबनराव काकडे, तहसीलदार जितेंद्र इंगळे- पाटील यांनी केंद्रांची पाहणी केली. किरकोळ अपवाद वगळता मतदान शांततेत पार पडले.

हेही वाचा : ज्ञानेश्वरीत आहेत HR निगडित व्यवस्थापन सूत्रे...

Gram Panchayat Election 2022
Indian Railway : रेल्वे प्रशासनाची धडक कारवाई; विनातिकीट प्रवाशांकडून 23 लाखांचा दंड वसूल

तीन ग्रामपंचायती बिनविरोध

माघारीच्या अंतिम मुदतीत सदस्यपदाच्या १७६ उमेदवारांनी माघार घेतल्याने १६७ उमेदवारांची बिनविरोध निवड झाली होती. तर माघारीवेळी थेट सरपंचपदाच्या ४१ उमेदवारांनी माघार घेतली असून, पिंपळकोठे, विरगाव, किकवारी बुद्रुक, महड व ढोलबारे या पाच ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी प्रत्येकी एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांचीही यापूर्वीच बिनविरोध निवड झाली आहे. त्यामुळे सरपंच पदासाठी तालुक्यात ११२, तर सदस्यपदासाठी ४४५ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. किकवारी बुद्रुक, महड व ढोलबारे या ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने आज ३८ ग्रामपंचायतींसाठीच मतदान झाले.

मतमोजणीसाठी ९ टेबल

सटाणा येथील तहसील कार्यालय आवारातील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत मंगळवारी (ता. २०) सकाळी ९ पासून मतमोजणीस सुरवात होणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार जितेंद्र इंगळे- पाटील यांनी सांगितले. मतमोजणीसाठी एकूण ९ टेबल ठेवण्यात आले असून, दुपारी ३ पर्यंत अंतिम निकाल हाती येईल. मतमोजणी केंद्रात उमेदवारांच्या मतमोजणी प्रतिनिधींव्यतिरिक्त इतरांना केंद्रापासून २०० मीटर अंतरापर्यंत प्रवेश बंद करण्यात आला आहे. कोणतेही वाद्य वाजविण्यास मज्जाव करण्यात आला आहे. याचे उल्लंघन केल्यास संबधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने सांगितले.

Gram Panchayat Election 2022
Gram Panchayat Election : साक्रीत उत्साहात मतदान!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.