Gram Panchayat Election : सौंदाणेत 64.64 टक्के मतदान निकालाबाबत उत्सुकता!

Crowd for voting in Janata Vidyalaya.
Crowd for voting in Janata Vidyalaya. esakal
Updated on

सौंदाणे (जि. नाशिक) : येथील ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत १७ पैकी १५ सदस्य बिनविरोध निवडून आले. उर्वरित दोन जागा व थेट सरपंचपदाच्या निवडणुकीसाठी चुरशीची लढत झाली. सरपंचपदाच्या निवडणुकीत तीन उमेदवार रिंगणात असले तरी खरी लढत दुरंगीच झाली. उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी गेल्या काही दिवसापासून गाव व परिसर पिंजुन काढला. (Gram Panchayat Election Curious about 64 percent voting results in Saundane Nashik News)

मतदान केंद्राबाहेर प्रतिनिधी व कार्यकर्त्यांची झालेली गर्दी.
मतदान केंद्राबाहेर प्रतिनिधी व कार्यकर्त्यांची झालेली गर्दी. esakal

येथे सकाळपासूनच केंद्रावर मतदानासाठी मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. अखेरच्या दोन टप्प्यात सर्वच केंद्रांवर गर्दी झाली होती. दिवसभरात मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. भाजपचे युवानेते अद्वय हिरे व पालकमंत्री दादा भुसे यांच्या समर्थकांमध्ये लढत झाली. वार्ड क्रमाक दोन व वॉर्ड क्रमांक तीनमध्ये प्रत्येकी एका जागेसाठी दुरंगी लढत रंगली आहे. दोन्हीही वॉर्डात मतदारांचा उत्स्पुर्त प्रतिसाद बघावयास मिळाला.

सरपंचपदासाठी युवसेनेचे चेतन पवार यांच्या पत्नी शितल पवार, माजी जिल्हा परिषद सदस्य रत्नाकर पवार यांच्या मातोश्री दगुबाई पवार व विद्यमान सदस्य प्रल्हाद पवार यांच्या पत्नी अंजना पवार आपले नशीब आजमावित आहेत.

हेही वाचा : ज्ञानेश्वरीत आहेत HR निगडित व्यवस्थापन सूत्रे...

Crowd for voting in Janata Vidyalaya.
Gram Panchayat Election : 402 उमेदवारांच्या राजकीय भविष्याचा मंगळवारी फैसला!

तिरंगी लढतीत पक्ष, भाऊबंदकी, मित्रपरिवार, नाते संबध यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. मतदान केंद्राच्या बाहेर सर्व उमेदवारांच्या बुथ जवळ मोठ्या संखेत कार्यकर्त्यांची गर्दी होती.

येथे ६ हजार ५७१ मतदारांपैकी ४ हजार २४८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यात २ हजार २३३ पुरुष व एक हजार ९१५ स्त्री मतदारांचा समावेश आहे. या निवडणुकीत एकाही राजकीय पक्षाची व उमेदवारांची जाहीर सभा झाली नाही. तालुका पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

Crowd for voting in Janata Vidyalaya.
Gram Panchayat Election : नागापूरला मतदान शांततेत; थेट सरपंच पदासाठी चुरस!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.