सिन्नर (जि. नाशिक) : सिन्नर तालुक्यातील बारा ग्रामपंचायतच्या थेट सरपंचसह सदस्य पदाच्या निवडीसाठी झालेल्या निवडणुकीत माजी आमदार राजाभाऊ वाजे समर्थक गटाने बाजी मारली आहे. वाजे गटाने 7 ग्रामपंचायतींवर उद्धव ठाकरे शिवसेना गटाचा झेंडा फडकवला आहे. तर आमदार माणिकराव कोकाटे समर्थक गटाला केवळ 4 ग्रामपंचायत मध्ये सरपंच पद राखता आले. वडगाव पिंगळा ग्रामपंचायत सरपंच पदी मात्र दोन्ही गटांनी एकत्र पुरस्कृत केलेला उमेदवार निवडून आला. (Gram Panchayat Election Result Waje group won Sinnar in gram panchayat election nashik news)
हेही वाचा : असं एक गाव, जिथं जमिनीला कान लावला तरी संगीत ऐकू येतं...
ठाणगाव, नांदूर शिंगोटे, सायाळे, कारवाडी, लोणारवाडी, आशापुर, डूबेरेवाडी या 7 ग्रामपंचायत वर वाजे समर्थक शिवसेना तर कीर्तांगळी, शहा, पाटपिंप्री, उजनी या 4 ग्रामपंचायत राष्ट्रवादीचे आमदार माणिकराव कोकाटे समर्थ गटाकडे तर वडगाव पिंगळा ग्रामपंचायत उभय गटांनी पुरस्कृत केलेल्या आघाडी कडे राहिली.
सिन्नर मधील निवडून आलेले सरपंच पुढील प्रमाणे...
आशापुर - सुलोचना सीताराम पालवे (वाजे गट / उद्धव सेना)
कृष्ण नगर (डुबेरवाडी) - दत्तू गोफणे (वाजे गट / उद्धव सेना)
कीर्तागंळी - कुसुम शांताराम चव्हाणके (कोकाटे गट/ उद्धवसेना)
कारवाडी - रूपाली निलेश जाधव (वाजे गट /उद्धव सेना)
शास्त्रीनगर - जयश्री सदाशिव लोणारे (वाजे गट/उद्धवसेना)
नांदूर शिंगोटे - शोभा दीपक बरके ( वाजे गट / उद्धव सेना)
पाटपिंपरी - नंदा रमेश गायकवाड (कोकाटे गट / राष्ट्रवादी)
शहा - संभाजी जाधव ( कोकाटे गट /राष्ट्रवादी)
सायाळे - विकास शेंडगे ( वाजे गट/ उद्धव सेना)
ठाणगाव - नामदेव शिवाजी शिंदे (वाजे गट/ उद्धव सेना)
उजनी - निवृत्ती लहानु सापनर ( कोकाटे गट/ राष्ट्रवादी)
वडगाव पिंगळा - शेवंताबाई मुठाळ ( कोकाटे-वाजे गट पुरस्कृत)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.