शेतकऱ्याकडून लाच घेताना ग्रामसेविकेला रंगेहाथ पकडले | Nashik

bribe
bribeesakal
Updated on

मनमाड/चांदवड (जि. नाशिक) : अनुदान मिळवून देण्यासाठी शेतकऱ्यांकडून ९०० रुपयांची लाच स्वीकारताना कातरवाडी (ता. चांदवड) येथील ग्रामसेविका अनिता कुटेमाटे यांना मनमाड येथे लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ ताब्यात घेतले. या प्रकरणी मनमाड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, शेतात उभे असलेले पीक पूर्ण उद्‌ध्वस्त झाले आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. या नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना शासनाकडून दिली जात असून, यासाठी ग्रामसेवकाकडे अनुदान मिळण्यासाठी गेले असता फिर्यादीला अनेकदा चकरा मारण्यास लावून ग्रामसेवक अनिता कुटेमाटे यांनी फिर्यादीकडे पैशाची मागणी केली. एक हजार रुपयांची मागणी केली असता तडजोडीअंती ९०० रुपये देण्याचे ठरले. त्यानंतर फिर्यादीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली असता लाचलुचपतच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचला. सानप कॉम्प्लेक्स येथील टी स्टॉलवर ९०० रुपयांची लाच स्वीकारताना पथकातील पोलिस निरीक्षक साधना इंगळे, हवालदार सचिन गोसावी, पोलिस नाईक अजय गरुड, राजेंद्र गिते, अशोक धामंदे यांनी कुटेमाटे यांना रंगेहाथ ताब्यात घेतले.

bribe
वाढता वाढता वाढे प्रलंबित खटले
bribe
मार्चमध्ये सत्ताधारी भाजपचे पॅकअप

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.