Nashik Bhajan Mahotsav: शिवसेनेतर्फे 16 जुलैपासून भव्य भजन महोत्सव

Shivsena News
Shivsena Newsesakal
Updated on

Nashik Bhajan Mahotsav : शिवसेना वर्धापन दिनानिमित्त सुरू असलेल्या भगवा महिनांतर्गत आषाढी एकादशीचे औचित्य साधून १६ जुलैला शिवसेना नाशिक महानगरातर्फे भव्य भजन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

पुरुष आणि महिला अशा दोन गटांत या स्पर्धा होणार असून दोन्ही गटांना स्वतंत्र पारितोषिके देण्यात येणार आहेत. त्याचबरोबर प्रत्येक मंडळास स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र व सहभागी झालेल्या भजनी मंडळाच्या प्रत्येक सदस्याला सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. (Grand Bhajan Mahotsav organized by Shiv Sena from July 16 nashik news)

या भजन महोत्सवासाठी प्रत्येक भजनी मंडळात वादकासह कमीत- कमी ५ आणि जास्तीत- जास्त १५ सदस्य असावेत. वादन साहित्य मंडळाने स्वतः आणायचे असून प्रत्येक भजनी मंडळाला १० ते १५ मिनिटांचा वेळ देण्यात येणार येणार आहे.

भजनी मंडळाची नोंदणी विनामूल्य असून नोंदणी १० जुलै दुपारी चारपर्यंत स्वीकारण्यात येणार आहे. नाशिक शहर व जिल्ह्यातील अधिकाधिक भजनी मंडळांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवावा असे शिवसेना जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांनी केले आहे.

याप्रसंगी सहसंपर्कप्रमुख राजू लवटे, महानगरप्रमुख प्रवीण तिदमे उपस्थित होते. अधिक माहितीसाठी आकाश कोकाटे (८८८८५५२५५२) व शिवसेना मध्यवर्ती कार्यालय नाशिक शहर जिल्हा (०२५३४०१८९९९) या क्रमांकावर संपर्क साधावा.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Shivsena News
Shiv Sena: कितीही वादळ येऊदे संजय राऊत अजूनही राज ठाकरेंच्या जवळचे?

भजन स्पर्धेचे नियम व अटी

*साठ वर्षाच्या आतील स्त्री-पुरुष आपल्या ग्रुपसह भजनी मंडळात सहभाग घेऊ शकतील.

* भजनी मंडळाचा किमान पाच व्यक्तींचा ग्रुप असणे आवश्यक.

* भजन महोत्सवात भजन सादरीकरणासाठी विहित नमुन्यातील अर्ज भरणे आवश्यक.

* भजनाला साजेशी वेषभूषा करून भजन सादर करणाऱ्यांचे विशेष स्वागत आहे.

* कोणत्याही भारतीय भाषेतील भजन सादरीकरण करण्याची मुभा आहे.

* भारतीय संत विरचित भजन सादरीकरण करणाऱ्यांचे स्वागत.

* सदर भजन महोत्सव ही स्पर्धा नसून सादरीकरण आहे तथापि परफॉर्मन्सनुसार भजनी संघाला आकर्षक बक्षीस देऊन गौरविण्यात येईल.

* भजन महोत्सवात प्रवेश मर्यादित आहेत प्रवेशिका स्वीकारण्याच्या किंवा नाकारण्याचा अधिकार व्यवस्थापक मंडळाने राखून ठेवला आहे.

Shivsena News
Shivsena: वर्षा बंगल्यात झाला ठाकरे गटाच्या मोठ्या नेत्याचा शिंदे गटात प्रवेश, सांगितलं कारण..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.