International Satsang Ceremony: समर्थ सेवा मार्गाचा नेपाळमध्ये भव्य आंतरराष्ट्रीय सत्संग सोहळा

नेपाळचे उपराष्ट्रपती, सेनापती उपस्थित राहणार
Gurumauli Annasaheb More
Gurumauli Annasaheb More esakal
Updated on

International Satsang Ceremony : श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाच्या वतीने गुरुमाऊली प पू अण्णासाहेब मोरे यांचे उपस्थितीत “श्री अतिरुद्रात्मक रुद्राक्ष लिंगार्चन व श्री ललिता सहस्त्रनाम पठण” या सेवेचा अंतर्भाव असलेल्या भव्य आंतरराष्ट्रीय सत्संग सोहळ्याचे आयोजन श्री क्षेत्र पशुपतीनाथ, हंसमंडप, गौशाला, काठमांडू, नेपाळ येथे शनिवार दि. १० जून २०२३ ला करण्यात आले असल्याची माहिती श्री स्वामी समर्थ सेवामार्गाचे देश विदेश अभियान प्रमुख नितीनभाऊ मोरे यांनी दिली. (Grand International Satsang Ceremony of Samarth Seva Marga in Nepal nashik news)

या अत्यंत महत्वपूर्ण सोहळ्यात नाशिक जिल्ह्यातील एकवीस हजार तर राज्यातून पंच्याहत्तर हजार सेवेकरी, भाविक उपस्थित राहणार आहेत.

अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरूपीठ, श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर (महाराष्ट्र), भारत चे पीठाधीश परमपूज्य गुरुमाऊली आण्णासाहेब मोरे यांच्या पावन सान्निध्यात जगभरातील श्री स्वामी समर्थ सेवेकरी ही अतिविशेष आध्यात्मिक सेवा भगवान पशुपतीनाथ आणि गुहेश्वरी मातेच्या स्थानावर करणार आहेत.

शिव आणि शक्तीची ही अभूतपूर्व उच्चतम सेवा – अखिल मानव जाती आणि सजीव सृष्टीच्या कल्याणा साठी, आणि विश्वशांती साठी करण्यात येत आहे.

अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाचे गेल्या सत्तर वर्षांपासून सुरू असलेल्या सेवा कार्यामुळे लाखो भाविकांचे जीवन उज्वल झाले आहे.

सेवामार्गाच्या ‘१८ सुत्री नागरी – विकास अभियानाद्वारा’ बालसंस्कार, गर्भसंस्कार, देश-विदेश अभियान, समस्या समाधान, आयुर्वेद, कृषी सशक्तीकरण, वास्तुशास्त्र, युवा सशक्तीकरण, संस्कृती संवर्धन, स्वयंरोजगार, व्यसनमुक्ती, महिला सबलीकरण इत्यादी अभियानाद्वारा समाजजीवनात सकारात्मक असे बदल करण्याच कार्य जगभरात सुरू आहे.

अखिल विश्वातील मानव जातीला 'मानवता हा एकमात्र धर्म आहे आणि मानव हीच एकमात्र जात आहे असा दिव्य संदेश परमपूज्य गुरुमाऊलींनी दिला आहे. अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग- मनुष्याच्या सर्वांगीण विकासासाठी विविध सामाजिक व आध्यात्मिक उपक्रमांचे सतत आयोजन करत असतो.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Gurumauli Annasaheb More
Jai Jai Swami Samartha: जेव्हा स्वामींची भूमिका साकारणारा अक्षय अक्कलकोटला जातो तेव्हा..

सेवा मार्गाच्या देश-विदेश विभागाच्या माध्यमातून गुरुपुत्र आदरणीय श्री नितीनभाऊ मोरे यांच्या मार्गदर्शनाने जगभरात सेवा मार्गाच्या प्रचार-प्रसारा चे कार्य जोमाने सुरू आहे. नेपाळ मध्ये देखील श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाच्या नेपाळस्थित सेवेकऱ्याच्या माध्यमातून विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असते.

दि. १० जूनला आयोजित करण्यात आलेल्या या अतिउच्च आध्यात्मिक सेवेसाठी - श्री स्वामी समर्थ महाराज - परमपूज्य गुरुमाऊलींचे हजारो सेवेकरी भारतातून आणि जगभरातून श्री क्षेत्र पशुपतीनाथ येथे जात आहेत. नेपाळस्थित नियोजन समिती या आंतरराष्ट्रीय सत्संग सोहळ्याची पूर्व तयारी गेल्या सहा महिन्यांपासून करत आहे.

नेपाळच्या इतिहासात प्रथमच होऊ घातलेल्या या ऐतिहासिक-आध्यात्मिक कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे नेपाळ राष्ट्राचे सन्माननीय उपराष्ट्रपती श्री. रामसहाय प्रसाद यादव आहेत. नेपाळचे सन्माननीय प्रधान सेनापती (सेनाध्यक्ष) श्री. प्रभुराम शर्माजी व प्रहरी प्रमुख (पोलीस महासंचालक) श्री. वसन्त कुँवरजी या कार्यक्रमाचे विशेष अतिथी आहेत.

या कार्यक्रमाची सुरुवात सकाळी आठ वाजता ‘श्री स्वामी समर्थ महाराजांच्या भूपाळी आरती’ ने होईल. त्यानंतर ‘अतिरुद्रात्मक रुद्राक्ष लिंगार्चन समारोह व श्री ललिता सहस्त्रनामाचा पाठ’ होईल. ‘महानैवद्य आरती’ नंतर ‘परमपूज्य गुरुमाऊलींचे - आध्यात्मिक व वैज्ञानिक दृष्टीकोण ठेऊन – वैयक्तिक, सामाजिक, राष्ट्रीय विकास’ यावर आशीर्वादपर हितगुज होईल. ‘महाप्रसादाने’ या कार्यक्रमाची सांगता होईल.

या ऐतिहासिक-आध्यात्मिक सोहळ्याचा सर्वांनी लाभ घ्यावा – असे आवाहन नेपाळच्या वतीने आयोजन समितीचे अध्यक्ष श्री. अभिराज आचार्य यांनी केले आहे.

Gurumauli Annasaheb More
Swami Samarth Gurupeeth : राज्यभरातील प्रमुख समर्थ सेवेकऱ्यांना गुरूपीठातून मार्गदर्शन करणार गुरुमाऊली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.