Nashik News: आजीआजोबांच्या आठवणींत नातवंडांचे दातृत्व; सप्तशृंगी चरणी 5 लाखांचे दान

Saptashrung Temple
Saptashrung Templeesakal
Updated on

वणी : आजी आजोबा म्हणजे नातवंडांचे हक्काचे व्यासपीठ असते, आजी शिवाय संस्कार नाही अन आजोबांशिवाय संघर्ष नाही असं म्हटलं जातं. या दोन्हीही व्यक्ती आपल्या आयुष्यातून निघून जाणे ही बाब नातवंडांसाठी दु:खद असते.

मग ती व्यक्ती आजी असो किंवा आजोबा. या दोन्हीही व्यक्तींशी असलेली जवळीक, त्यांचे प्रेम काही केल्या विसरता येत नाही. आयुष्याच्या वळणावर आपल्यापासून कायमचे दुरावलेल्या आजी आजोबांच्या आठवणी नाशिक येथील निकम परिवाराने अनोख्या पद्धतीने स्मृती पटलावर उभ्या केल्या.

Saptashrung Temple
Saptashrung Gad | श्री सप्तशृंगी देवी दर्शनाकरिता सशुल्क VIP दर्शन पास सुरु : विश्वस्त मंडळाचा निर्णय

आपल्या मातोश्रीच्या आई वडिलांच्या अर्थात आपल्या आजी आजोबांच्या आठवणींना आगळ्यावेगळ्या पद्धतीने स्मृती जागवत एक उत्तम उदाहरण निकम कुटुंबातील सदस्यांनी समाजासमोर उभे केले आहे. आपल्या आजी आजोबांच्या स्मृती जागवण्यासाठी नातवंडांनी श्री सप्तश्रृंग निवासिनी देवी ट्रस्टला एकूण ५ लाख १०१ रुपयांचे दान देत अनोखे दातृत्व दर्शविले आहे.

मूळचे आराई (ता. सटाणा) येथील परंतु नाशिकस्थित शकुंतला एकनाथ निकम यांच्या लेकरांनी आपल्या आजोळच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आपल्या आजोबा व आजीच्या स्मरणार्थ विश्वस्त संस्थेला दान देत एक अनोख्या दातृत्वाचे दर्शन घडविले आहे. स्वर्गीय मोतीराम बजन बच्छाव व स्वर्गीय हिरकण मोतीराम बच्छाव यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ५ लाख १०१ रुपयांचे दान दिले आहे.

Saptashrung Temple
Saptashrung Gad : सप्तशृंगगडावर नववर्षानिमित्त 300 किलो द्राक्षांची आरास

विश्वस्त संस्थेच्या मुख्य कार्यालयात हे दान देण्यात आले. श्री सप्तश्रृंग निवासिनी देवी ट्रस्टच्या मुख्य कार्यालयात ट्रस्टचे विश्वस्त भूषणराज तळेकर यांच्या हस्ते निकम कुटुंबियांचा यथोचित सत्कार करण्यात आला.

शकुंतला निकम, राजेंद्र निकम, मनोज निकम, सुषमा देवरे, वर्षा सोनवणे, मनीषा निकम, सुवर्णा निकम, दिलीप देवरे, उदय सोनवणे आदींसह विश्वस्त संस्थेचे मुख्य व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे, कार्यालयीन अधीक्षक प्रकाश जोशी, जनसंपर्क अधिकारी भिकन वाबळे, राजेंद्र पवार, शांताराम बर्डे, पद्माकर देशमुख, योगेश सोनवणे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.