Nashik Crime : घरात आजी सोडून कुणीही नसल्याची संधी साधत नातू आणि त्याच्या दोन साथीदारांनी आजीला बेदम मारहाण करत तिच्या अंगावरील चोरी केली प्रकरणी वडनेर भैरव पोलिसांनी नातवांसह दोघा संशयित यांना शिताफीने अटक करत गुन्हा उघडकीस आणला. याप्रकरणी तिघा जणांना पोलिसांनी अटक केली आहे. (Grandson steals grandmother jewellery Items seized three arrested Nashik Crime)
वडनेर भैरव येथे संशयित सतीश ऊर्फ गणेश बारकू शिंदे, (वय २३, रा.मालसाने) याची आजी राहत असते. आजी घरी एकटीच असल्याची संधी साधत संशयित सतीश याने आजीचे दागिणे चोरण्याचा प्लॅन तयार केला.
यासाठी त्याने आपले दोन साथीदार संशयित विशाल पवार (वय २४, रा. करमाळे, ता. कळवण), जलराम ऊर्फ जाल्या किसन पवार (वय २७, एकलहरे वस्ती, कळवण) या दोघांना आजीच्या घराजवळ बोलावून घेतले.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
त्यानंतर तिघांनी आजी घरात एकटी असताना तिला बेदम मारहाण करत तिच्याजवळील सोन्याचे दागिने चोरून नेले.याप्रकरणी वडनेर भैरव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी सोहेल शेख,
वडनेर भैरवचे सहाय्यक पोलिस निरीक्षक मयूर भामरे यांच्यासह त्यांच्या पथकाने घटनास्थळाची पाहणी करत सीसीटीव्ही फूटेज आणि तांत्रिक मदत घेत यातील संशयित नातू सतीश ऊर्फ गणेश बारकू शिंदे यास पळसे (नाशिक) येथून ताब्यात घेत त्याच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी साथीदारांच्या मदतीने चोरी केल्याचे सांगितले.
यानंतर या दोघा संशयित साथीदार यांना देखील वडनेर भैरव पोलिस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचारी यांनी अटक करत हा गुन्हा उघडकीस आणला. संशयित सतीश शिंदे याच्यावर यापूर्वी देवळा आणि अभोणा पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.