मालेगाव : राज्य शासनाने अत्याधुनिक शेती, नवनवीन प्रयोग, फळबाग लागवड आदींना चालना देतांना शेती शाश्वत विकासासाठी १७ फेब्रुवारी २०२२ ला नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाची (पोकरा) घोषणा केली.
तत्कालीन कृषीमंत्री दादा भुसे यांच्या प्रयत्नाने तालुक्यातील सर्व १४१ गावांचा या प्रकल्पामध्ये समावेश झाला. तालुक्यातील ४ हजार ४४२ लाभार्थी शेतकऱ्यांना या योजनेंतर्गत २०२२-२३ व २०२३-२४ या दोन आर्थिक वर्षात शेती विकासाच्या विविध घटकांसाठी ५४ कोटी ५७ लाख ६ हजार रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले. (Grant distributed to four half thousand beneficiaries in Malegaon Taluka under Nanaji Deshmukh Agricultural Sanjeevani Project Nashik News)
तालुक्यातील सुमारे साडेचार हजार लाभार्थ्यांना या अनुदानातून ठिबक सिंचन, शेततळे, अस्तरीकरण, शेतीशाळा, फळबाग लागवड, पाणी उपसा साधणे, शेडनेट, रेशीम उद्योग, तुषार सिंचन आदी कामे केली.
या योजनेंतर्गत सर्वाधिक २ हजार ४४२ लाभार्थ्यांना ठिबक सिंचनासाठी अनुदान घेतले. ठिबक सिंचनासाठी या लाभार्थ्यांना १५ कोटी ९ लाख रुपयांचे अनुदान प्राप्त झाले. शेतकऱ्यांबरोबरच शेत मजुरांनाही यामुळे अधिकाधिक कामे मिळाली.
ठिबक सिंचन पाठोपाठ ४ कोटी ८ लाख रुपये अनुदानात १ हजार ६७६ शेतकरी लाभार्थ्यांना फळबाग लागवडीसाठी अनुदान मिळविले. सर्वाधिक विक्रमी ३४ कोटी अनुदान शेडनेटसाठी देण्यात आले.
२०४ लाभार्थी शेतकऱ्यांनी शेडनेट उभारले. ९१ लाभार्थ्यांना वैयक्तीक शेततळ्यांचा लाभ देण्यात आला. त्यासाठी १ कोटी ३ लाख रुपये अनुदान वितरित करण्यात आले.
घटक नाव अनुदान रक्कम लाभार्थी संख्या
ठिबक सिंचन १५ कोटी ९ लाख २४४२
फळबाग लागवड ४ कोटी ८ लाख १६७६
शेडनेट ३४ कोटी २०४
वैयक्तिक शेततळे १ कोटी ३ लाख ९१
शेततळे अस्तरीकरण २० लाख २२
रेशीम उद्योग ७ लाख १६
शेतीशाळा १९ लाख ७
तुषार सिंचन ७२ लाख ३
पाणी उपसा साधणे १५ लाख १
"नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प तालुक्यासाठी कायापालट करणारा ठरला. या प्रकल्पात तालुक्यातील सर्व १४१ गावांचा समावेश झाला ही समाधानाची बाब आहे. योजनेसाठी कृषी विभागातील अधिकाऱ्यांसह सर्व घटकांना प्रशिक्षण देण्यात आले होते. शेडनेट, ठिबक सिंचन यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीला हातभार लागला."
- गोकुळ अहिरे, उपविभागीय कृषी अधिकारी, मालेगाव
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.