Nashik News : पंतप्रधान किसान योजनेच्या पोर्टलवर जिवंत व्यक्तीत मृत घोषित दाखवून त्याचे पीएम किसान योजनेचे अनुदान गोठविण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.
अनुदान खात्यावर का जमा झाले नाही. याप्रकरणी चौकशी केली असता हा सर्व प्रकार समोर आला. त्यामुळे या गोष्टीचा मोठा मनस्ताप संबंधितांना सोसावा लागला आहे. (Grants frozen by showing dead on portal Disclosure of incident after complaint at lakhmapur Nashik News)
लखमापूर (ता.बागलाण) येथील माजी सरपंच रमेश बच्छाव यांना जून २०२२ पर्यंत पीएम किसान योजनेचे नियमित अनुदान मिळत होते. मात्र त्यांनतर अनुदान येणे बंद झाले. त्यामुळे श्री. बच्छाव यांनी आपले आधारकार्ड देखील त्यांच्या बँक खात्याला लिंक केले.
केवायसीची पूर्तता केल्यानंतर देखील अनुदान मिळत नसल्याने त्यांनी याबाबत संबंधित विभागाकडे जाऊन चौकशी केली असता पीएम किसान पोर्टलच्या संकेतस्थळावर ते मृत असल्याचे दाखविण्यात आल्याचे समोर आले. हयात असताना देखील मृत असल्याचे समजल्याने श्री. बच्छाव यांना धक्का बसला.
प्रशासकीय कामकाजात मृत व्यक्तीला मृत म्हणून सिद्ध करण्यासाठी ५० कागदपत्र जमा करावे लागतात. परंतु ह्यात असलेल्या शेतकऱ्यांना मृत घोषित करताना कुठलेही कागदपत्रांची गरज पडत नसल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला.
हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’
यानंतर रमेश बच्छाव यांनी संबंधित विभागाला हयात असल्याचा दाखला व इतर सर्व कागदपत्रे ऑनलाइन व ऑफलाइन जमा केली. प्रशासकीय योजनांमध्ये अशा प्रकारच्या बऱ्याच त्रुटी होत असल्यामुळे सामान्य शेतकऱ्यांना योजनांपासून वंचित राहावे लागते यासाठी प्रशासनाने कामकाजात बदल करणे गरजेचे आहे.
मला जून २०२२ पर्यंत पीएम किसान योजनेचे अनुदान नियमित मिळत होते. त्यानंतर अनुदान येणे बंद झाले. यानंतर मी आधारकार्ड लिंक केले. परंतु तरीदेखील अनुदान येत नव्हते. यासंबंधी किसान पोर्टलवर चौकशी केल्यानंतर हा धक्कादायक प्रकार लक्षात आला.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.