जानेवारीत खवय्यांच्या चाखता येणार नाशिकच्या द्राक्षांचा गोडवा

Grape from Nashik district will be available in January 2022
Grape from Nashik district will be available in January 2022Sakal
Updated on

पिंपळगाव बसवंत : नाशिक जिल्ह्यातील सुमारे पावणे दोन लाख एकर क्षेत्रावर विस्तारलेल्या द्राक्षबागांची फळधारणा छाटणी पूर्ण झाली आहे. फुलोरा व द्राक्ष लगडण्याच्या स्थितीत असलेल्या बागा परतीच्या पावसाशी झुंज देत शेतकऱ्यांनी फुलविल्या आहेत. यामुळे निफाड तालुक्यातील द्राक्ष जानेवारीत देश-परदेशातील खवय्यांच्या जिभेवर गोडवा पेरतील. अनुकुल वातावरण राहिल्यास निर्यातीचा द्राक्ष अधिक अधिक उत्पादन होईल. पण निर्यातीसाठी लागणाऱ्या वाहतुक खर्चात दुप्पटीने वाढ झाल्याने निर्यातीचा टक्का घरण्याची शक्यता आहे.

पावसाचा मुक्काम यंदा लांबला. त्यामुळे छाटणीला आलेला अडथळा वगळता द्राक्ष उत्पादकांनी निर्यातक्षम द्राक्ष पिकविम्यासाठी कंबर कसली आहे. सध्या द्राक्ष छाटणी होऊन एक ते दीड महिना उलटला आहे. फुलोरा व मणी लगडलेल्या अवस्थेत बागा आहेत. प्रत्येक झाडावर ३० ते ४० घडांची संख्या आहे. लांबलेल्या पावसाने फारशी हानी झाली नसली तरी काही प्रमाणात करपा रोगाचे आक्रमण झाले आहे. त्यांचा परिणाम द्राक्ष घडांचा दर्जा टिकविण्यासाठी शेतकऱ्यांची कसोटी लागणार आहे. शेतकऱ्यांना सध्या रोज औषध फवारणी करावी लागत आहे.

बागलाणची द्राक्षे येण्यास सुरवात

विविध रोगांशी यशस्वी सामना करून खवय्यांना पसंतीला उतरतील असी रसाळ, गोड द्राक्ष पिकविण्यात नाशिकच्या शेतकऱ्यांचा हातखंडा आहे. बागलाण परिसरात आॅगस्ट महिन्यात फळधारणा छाटणी झाली आहे तर निफाड, दिडोरी, नाशिक परिसरात पावसाचा धोका न पत्करता शेतकऱ्यांनी सप्टेंबर-आॅक्टोबर महिन्यात टप्प्याटप्याने द्राक्ष छाटणी केली. बागलाण परिसरातून द्राक्ष बाजारात दाखल होण्यास प्रारंभ झाला आहे. निफाडसह जिल्ह्यातील इतर भागातून जानेवारी महिन्यात द्राक्ष परिपक्व होऊन काढले जातील. एकरी शंभर क्विंटल द्राक्ष उत्पादन अपेक्षित आहे. गतवर्षी भारतातून युरोप, रशियासह जगभरात सात हजार आठशे कंटेनरमधून एक लाख सहा मेट्रीकटन द्राक्ष निर्यात झाले होते.

कंटेनरच्या भाडेवाढीचा चटका

कंटेनरच्या भाड्यामध्ये झालेली भरमसाट वाढ नाशिकची द्राक्ष सातासमुद्रापार जाण्यास मोठा अडथळा निर्माण झाला आहे. कोरोनानंतर आता द्राक्षवाहतुकीसाठी लागणारे कंटनेरच्या भाड्यामध्ये भरमसाठ वाढ झाली आहे. मर्क्स लाईन या संस्थेमार्फत जलवाहतुकीसाठी जहाजे पुरविली जातात. मर्क्स गेली दोन वर्षापासुन भाडेवाढीचा सपाटा लावला आहे. दोन वर्षापुर्वी २३०० डॉलर्स भाडे युरोप, रशियासाठी आकारले जायचे. ते गतवर्षी ४२०० डॉलर झाले. यंदा यात दुप्पटीपेक्षा अधिक वाढ करीत साडेनऊ हजार डॉलर प्रती कंटेनर भाडे केल्याने द्राक्षनिर्यातदारांचे धाबे दणाणले आहे. अगोदर केद्र शासनाने द्राक्ष निर्यातीवरील प्रती कंटेनर सात टक्क्याचे अनुदान तीन टक्कापर्यत कमी केले आहे. त्यात ही भाडेवाढ निर्यातदार व शेतकर्यासाठी दुष्काळात तेरावा महिना ठरणार आहे.

Grape from Nashik district will be available in January 2022
नाशिक : बॅडमिंटन खेळणाऱ्या चिमुरडीचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

मनमानी भाडेवाढ रोखावी

भाडेवाढ आवाक्याबाहेर गेल्याने लहान द्राक्षनिर्यातदार या व्यवसायातून बाहेर पडण्याच्या मनस्थितीत आहे. त्यामुळे वीस टक्के द्राक्ष निर्यातीत घसरण होऊ शकते. द्राक्ष निर्यात भाडेवाढीच्या कचाट्यात सापडल्याने द्राक्ष निर्यातदार संघाचे जगन खापरे, मधुकर क्षीरसागर, नितीन अग्रवाल यांनी केद्रांच्या वाणिज्य विभागाकडे धाव घेतली. भाडेवाढीची मर्क्सची मनमानी रोखण्यासाठी मध्यस्थी करा व निर्यात अनुदान आठ टक्के करा अशी मागणी वाणिज्य विभागाचे सिचव द्वारकानाथ मिश्रा यांच्याकडे केली आहे.

सोशल मिडीयावरून शेतकऱ्यांमध्ये जागृती केल्याने द्राक्षाच्या फळधारणा छाटणीचे विभाजन झाले. त्यामुळे एकाच वेळी बंपर पीक न येता टप्प्याटप्प्याने द्राक्ष बाजारात येतील. तसे झाल्यास आकर्षक दर मिळण्याची चिन्ह आहे.

- सुनील जाधव, द्राक्ष उत्पादक.

अनुकुल वातावरण व अधिक मिळणाऱ्या दरामुळे शेतकऱ्यांनी यंदा निर्यातक्षम द्राक्ष उत्पादनाकडे अधिक भर दिला आहे. उत्पादन जरी झाले तरी कंटेनर वाहतुकीच्या भाड्यात दोन वर्षाच्या तुलनेत चारपट वाढ झाली आहे. त्यामुळे त्याचा प्रतिकुल परिणाम दरावर तर होईलच शिवाय निर्यातीचा टक्का घसरण्याची भीती आहे.

- लक्ष्मण सावळकर, द्राक्ष निर्यातदार, मॅग्नस फार्म फ्रेश.

Grape from Nashik district will be available in January 2022
घोटी महामार्ग पोलिसांची मोठी कारवाई; पकडला २५ लाखांचा गुटखा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.