Nashik News : द्राक्षपंढरी म्हणून ओळखली जाणाऱ्या नाशिक जिल्ह्यात स्थानिक बाजारपेठेमध्ये द्राक्षाला उठाव नसल्यामुळे २० ते २२ रुपये प्रतिकिलो भाव मिळत आहे. यातून द्राक्ष उत्पादकाचे भांडवलही निघत नसल्यामुळे उत्पादक संकटात सापडले आहेत. (grape growers are giving their vineyards to Currant traders nashik news)
शेतकऱ्यांना द्राक्षे घेता का कुणी असे म्हणायची वेळ आली आहे. दुसरीकडे बेदाणा व्यापारीही द्राक्षाला १७ ते २० रूपये प्रतिकिलो भाव देत असल्यामुळे द्राक्ष उत्पादक बेदाणा व्यापारींना आपल्या द्राक्षबागा देत असल्यामुळे सध्या बेदाण्याला सुगीचे दिवस आल्याचे दिसून येत आहे.
नाशिकच्या द्राक्षांची गोडी जगभरात जाऊन पोहचली आहे. नाशिक जिल्ह्यात जवळपास ६३ हजार हेक्टरवर द्राक्षाची लागवड झाली आहे. त्यामध्ये निफाड, दिंडोरी आणि नाशिक तालुका द्राक्षपीक घेण्यात अव्वल आहे.
मागील पाच ते सात वर्षापासून नैसर्गिक आपत्ती तसेच स्थानिक बाजारपेठे द्राक्षाच्या बाजार भावामध्ये सतत होणारी घसरण सध्या द्राक्ष उत्पादकासाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. सतत पडणारे बाजारभाव, नैसर्गिक आपत्ती यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत. सहकारी सोसायटी, राष्ट्रीयकृत बॅकामधील द्राक्ष उत्पादकाचे कर्ज थकले असून बाजारभावाची हमी नसल्यामुळे हे शेतकरी दुहेरी संकटात सापटला आहे.
हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत
मागील पंधरा ते वीस वर्षापूर्वी द्राक्षबागाना ३० रुपये प्रतिकिलो भाव मिळाला तरी द्राक्षशेती परवडत होती, कारण तेव्हा रासायनिक खते व औषधाच्या किंमती माफक होत्या. मजूरही मुबलक प्रमाणात उपलब्ध होत होते. आज मजुरीत प्रचंड प्रमाणात वाढ होऊनही मजूर मिळत नाही. द्राक्षशेतीसाठी सध्या मजुराचे भाव पाहिले तर तेवढे उत्पन्न द्राक्षशेतीमध्ये पाहण्यास मिळत नाही.
शेतीमध्ये रूपया खर्चून ५० ते ७५ पैसे मिळत असतील तर द्राक्षशेती परवडणार कशी अशी चर्चा द्राक्ष उत्पादकांमध्ये होत आहे. एप्रिलच्या खरड छाटणीपासून तर गोड्याबार छाटणी ते द्राक्ष तयार होईपर्यत अनेक संकटाचा सामना करून शेवटी द्राक्षबागा वाचल्या तर बाजारभाव पडतात. अशा परिस्थिती त्या द्राक्ष उत्पादकांनी काय करावे त्यात कुटुंबातील खर्च, आजारपण, मुलाची लग्न, शैक्षणिक खर्च अशा अनेक समस्या कुटूंबात असतात.
अशा अनेक संकटाना बळीराजा तोंड देत असताना सर्व पिकांना न परवडणारे व मातीमोल बाजारभाव यामुळे शेती व्यवसाय मोडकळीस आला आहे. सध्याच्या परिस्थितीचा विचार केला तर द्राक्ष, कांदा, टोमॅटो, सोयाबीन या पिकांना चालू वर्षी मातीमोल बाजारभाव मिळाल्यामुळे शेतकरी भांडवल खर्च करून उध्वस्त झाला आहे.
सर्वकाही नुकसानीचे होत असल्याने काही शेतकरी बाजारपेठेतील विक्रीपेक्षा बेदाणा तयार करण्याचा निर्णय तर काहींनी द्राक्ष सडून जाण्यापेक्षा बेदाणा उत्पादकांना द्राक्ष देवून पदरात जे पडेल ते मिळवून घेत असल्याने बेदाणा उद्योगाला कमी भावात मुबलक द्राक्षांचा पुरवठा होत आहे. त्यामुळे एकीकडे द्राक्ष उत्पादक कोमात, तर बेदाणा उत्पादक जोमात अशी अवस्था सध्या बघावयास मिळत आहे.
"सध्या व्यापारी वर्गाकडून स्थानिक बाजारपेठेत द्राक्षाला मागणी नसल्याचे कारण देत द्राक्ष खरेदीकडे पाठ फिरवत आहे. इतर राज्यात वातावरणातील बदल, अवकाळी पाऊस यामुळे ग्राहक वर्गाची मागणी नसल्याचा परिणाम झाल्यामुळे द्राक्ष भावात सतत घसरण होत आहे." - महेश ठुबे, द्राक्ष उत्पादक, खेडगाव
"बेदाणा तयार करण्यासाठी लागणाऱ्या डिपिंग ऑइल, कार्बोनेट, गंधक आणि कोरोगेटेड बॉक्ससाठी लागणाऱ्या कच्चा मालाची किंमतीत वाढ झाली असली तरी, कच्च्या मालाच्या दरात अर्थात द्राक्षमणी हे सध्या ८ रुपये ते २० रुपयांपर्यंत दर्जानुसार मुबलक प्रमाणात मिळत आहे. त्यामुळे बेदाणा निर्मिती खर्च थोडाफार अवाक्यात आला असून मालही मोठया प्रमाणात तयार होत आहे. तसे असले तरी अवकाळी पाऊस व वातावरणातील बदलाचा फटका आम्हालाही बसत आहे." - मोहसिन मणियार, बेदाणा उत्पादक, वणी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.