सटाणा (जि. नाशिक) : अर्ली द्राक्ष पिकाबरोबरच डाळिंबाला पीक विम्याचे कवच मिळावे, अशी मागणी बागलाणचे आमदार दिलीप बोरसे यांनी केली होती. त्याची दखल घेत शासनाने चालू हंगामापासून या दोनही पिकांना पिकविम्याचे कवच लागू केले आहे. या निर्णयामुळे कसमादे परिसरातील शेकडो द्राक्ष व डाळिंब उत्पादकांना दिलासा मिळाला आहे. (grapes and pomegranates will get insurance cover from this year says mla borase)
नाशिक जिल्ह्यातील बागलाण, मालेगाव, देवळा, कळवण या भागात सहा हजार हेक्टर क्षेत्रावर अर्ली द्राक्ष पिकाची लागवड केली आहे. दरवर्षी हजारो टन द्राक्ष निर्यात होऊन शासनाला कोट्यवधी रुपयांचे परकीय चलन मिळते. तसेच, शेकडो बेरोजगारांना रोजगारही मिळतो. मात्र, या पिकाला विमा कवच देण्याबाबत शासन उदासीन होते. गेल्या तीन वर्षांपासून अवकाळी आणि गारपीटीमुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान होऊन शेतकरी कर्जबाजारी झाला होता. आमदार दिलीप बोरसे यांनी वेळोवेळी या पिकाला विमा कवच देण्याची आग्रही मागणी कृषिमंत्री दादा भुसे, कृषि सचिव एकनाथ डवले यांच्याकडे केली होती. त्यानुसार कृषि आयुक्त धीरज कुमार यांनी प्रत्यक्ष बांधावर जाऊन सर्वेक्षण करून सकारात्मक अहवाल शासनास सादर केला. त्यानुसार शासनाने अर्ली द्राक्ष पिकाला यंदाच्या हंगामापासून तीन वर्षांसाठी विमा कवच लागू करण्याचा निर्णय लागू केला आहे.
२०२० - २१ पासून पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजना कर्जदार तसेच, बिगर कर्जदार शेतकऱ्यांना अधिसूचित क्षेत्रातील पिकांसाठी ऐच्छिक आहे. अधिसूचित क्षेत्रातील फळपिकांसाठी खातेदारांशिवाय कुळाने अगर भाडेपट्याने शेती करणारे शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार विमा हप्ता ३० टक्के दरापर्यंत मर्यादित केला आहे. त्यामुळे ३० टक्क्यांवरील विमा हप्ता राज्य शासन व शेतकऱ्यांनी भरावा. या योजनेंतर्गत ३० ते ३५ टक्क्यांपर्यंतचा अतिरिक्त ५ टक्के विमा हप्ता दायित्व राज्य शासनाने स्विकारले असून, ३५ टक्क्यांवरील विमा हप्ता राज्य शासन व शेतकऱ्यांनी प्रत्येकी ५० : ५० टक्के प्रमाणे भरावयाचा आहे. एका शेतकऱ्यास अधिसूचित फळपिकासाठी ४ हेक्टरक्षेत्र मर्यादेपर्यंत विमा नोंदणी करण्याची मुभा आहे.
फळबागांना नियमावली…
अधिसुचित फळपिकांपैकी एका क्षेत्रावर मृग अथवा आंबिया बहारापैकी एकाच हंगामाकरीता विमा संरक्षणासाठी अर्ज करता येईल. (उदा. संत्रा, मोसंबी, डाळिंब व द्राक्ष) केवळ उत्पादनक्षम फळबागांनाच विमा संरक्षणाचे कवच लागू राहणार आहे. यापेक्षा कमी वयाच्या फळबागांना विमा संरक्षणाची नोंद झाल्याचे पडताळणीत निदर्शनास आल्यास त्यांचे विमा संरक्षण संपुष्टात येईल.
शासनाच्या या निर्णयामुळे शेकडो शेतकऱ्यांना फायदा होणार असून, अर्ली द्राक्ष पिकविम्यासोबतच डाळिंब पिकविम्याचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा. जेणेकरून नुकसानभरपाई मिळेल.
- दिलीप बोरसे, आमदार, बागलाण
(grapes and pomegranates will get insurance cover from this year says mla borase)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.