नाशिक : आनंदवली- चांदशी रस्त्यावर मोकळ्या जागेतील गवताला आग लागल्याने दिव्यांग (Handicapped) कष्टकऱ्यांचा संसार जळून खाक झाला आहे. तुकाराम किसनराव बोबडे, असे या कष्टकऱ्यांचे नाव असून मोकळ्या जागेतील पत्र्याच्या शेडमध्ये कुटुंबीयांसह ते राहत आहे. त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संख्या पाच आहे. (grass catch fire Burnt the house of the handicapped laborers Nashik News)
परभणी जिल्ह्यातील वयोवृद्ध आई- वडिलांना भेटण्यासाठी बोबडे कुटुंब गेले होते. या वेळी भरदुपारी गवताला आग लागली. या आगीचे लोळ सर्वत्र पसरले आणि कष्टकऱ्यांच्या घराला वेढले. काही वेळात कपडे, शालेय साहित्य आणि संसारोपयोगी वस्तू भक्षस्थानी पडल्या. अशा परिस्थितीत कुटुंबातील मुलांच्या शिक्षणासाठी मराठा विद्या प्रसारक समाज (MVP) संस्थेचे माजी उपप्राचार्य बी. व्ही. कापडणीस यांनी मदत केली आहे. मात्र गरिबांचा संसार उभा करण्यासाठी समाजातून मदतीची अपेक्षा आहे, असे प्रा. कापडणीस यांनी म्हटले आहे. मदतीसाठी संपर्काचा क्रमांक : ९३५६११५६४४ अथवा ९५६१२५६०७१.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.