NMC News : मलेरिया विभागाचे वराती मागून घोडे; अनामत रक्कमेतून ग्रॅच्युइटी, भविष्यनिर्वाह निधी कापणार

NMC Nashik News
NMC Nashik Newsesakal
Updated on

NMC News : शहरात डेंगीची साथ सुरू असताना औषध व धूर फवारणी होत नाही. तसेच, वांरवार मुदतवाढीमुळे वादात सापडलेल्या मे. दिग्विजय एन्टरप्रायजेस कंपनीने सात वर्षांपासून कार्यरत २३८ कामगारांची ग्रॅच्युएटी व भविष्यनिर्वाह निधीची रक्कम अदा केली नसल्याची बाब समोर आल्यानंतर महापालिकेच्या मलेरिया विभागाने अनामत रक्कमेतून भविष्यनिर्वाह निधी व ग्रॅच्युइटीची रक्कम कापण्याचा निर्णय घेतला आहे.

तर दुसरीकडे संबंधित ठेकेदाराने काम संपत असल्याने काही महिन्यांची एकत्रित रक्कम एकाच वेळी भरत असल्याचे पत्र दिल्याने रक्कम भरली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे मलेरिया विभागाच्या हाती संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्यासाठी लेखी पुरावा प्राप्त झाल्याने काय कारवाई होते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. (Gratuity provident fund will be deducted from deposit amount by malaria department nashik news)

नाशिक म्युनिसिपल कर्मचारी-कामगार सेनेचे अध्यक्ष सुधाकर बडगुजर यांच्याकडे धूर व औषध फवारणी करणाऱ्या २३८ कर्मचाऱ्यांनी ग्रॅच्युएटी व भविष्यनिर्वाह निधी अदा केला नसल्याची तक्रार केली होती. पेस्ट कंट्रोल कंत्राटी कर्मचाऱ्यांना सात वर्षापासून ग्रॅज्युइटी वेतन व इतर शासकीय लाभ मिळाले नाही.

या तक्रारीच्या अनुषंगाने वैद्यकीय विभागाने संबंधित ठेकेदार कंपनीला स्मरणपत्र दिले. पेस्ट कंट्रोलचे एकूण २३८ कंत्राटी कर्मचाऱ्यांना ८ ऑगष्ट २०१६ ते ३० जुलै २०२३ पर्यंत भविष्यनिर्वाह निधी व ग्रॅज्युइटी रक्कम अदा केली नसल्याचे पत्र कर्मचारी संघटनेकडून देण्यात आले होते. वैद्यकीय अधीक्षक डॉ. तानाजी चव्हाण यांनी यासंदर्भात मे. दिग्विजय एन्टरप्रायजेसला स्मरणपत्र दिले. सात वर्षात संबंधित ठेकेदार कर्मचाऱ्यांची भविष्यनिर्वाह निधी व ग्रॅच्युएटी रक्कम अदा करतं आहे की नाही, हे पाहण्याची जबाबदारी असताना मलेरिया विभागाने दुर्लक्ष केले आहे.

NMC Nashik News
Nashik News : त्रस्त पतींचे पत्नींच्या नावे मुंडण करीत पिंडदान; पत्नीपीडितांकडून सुटकाऱ्यासाठी विधी

तक्रारीच्या अनुषंगाने ठेकेदाराची महापालिकेकडे असलेल्या जवळपास अडीच कोटी रुपयांच्या सुरक्षित अनामत रक्कमेमधून कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, स्मरणपत्राला उत्तर देताना काम पूर्ण होत असल्याने काही महिन्यांची ग्रॅच्युएटी व भविष्यनिर्वाह निधीची एकत्रित रक्कम भरत असल्याचे लेखी देण्यात आले आहे. त्यामुळे ठेकेदाराने वेळोवेळी रक्कम भरली नसल्याचे स्पष्ट होत असल्याने मलेरिया विभागाच्या हाती पुरावा मिळाला आहे.

"ग्रॅच्युएटी व भविष्यनिर्वाह निधी संदर्भातील सविस्तर अहवाल संबंधित कार्यालयाकडून मागविला आहे. ग्रॅच्युएटी व भविष्यनिर्वाह निधी ठेकेदाराकडून भरला जात आहे की नाही, हे पाहण्याची जबाबदारी लेखा विभागाची आहे. ठेकेदाराने काही महिन्यांची ग्रॅच्युएटी व भविष्यनिर्वाह निधीची रक्कम एकाच वेळी अदा करतं असल्याचे पत्र सादर केले आहे." - डॉ. राजेंद्र त्र्यंबके, मलेरिया अधिकारी, महापालिका.

NMC Nashik News
Nashik News : सेंट्रल पार्क अनियमिततेत बांधकाम विभागाचा हात; आमदाराच्या सहभागाने भाजप पुन्हा चर्चेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.