International Satsang Ceremony : आंतरराष्ट्रीय सत्संगास नेपाळच्या भाविकांचा अभुतपूर्व प्रतिसाद!

great response of devotees of Nepal to international satsang ceremony nashik news
great response of devotees of Nepal to international satsang ceremony nashik newsesakal
Updated on

International Satsang Ceremony : अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरूपीठाचे पिठाधीश परमपूज्य गुरुमाऊली आण्णासाहेब मोरे यांच्या पावन सान्निध्यात व आदरणीय सौ. मंदाकिनीताई मोरे तसेच गुरुपुत्र आदरणीय श्री नितीनभाऊ मोरे यांच्या उपस्थितीत नेपाळ येथे स्वामी सेवा मार्गाच्या देश-विदेश विभागा अंतर्गत भव्य आंतरराष्ट्रीय सत्संग सोहळ्याचे आयोजन श्री क्षेत्र पशुपतीनाथ, हंसमंडप, गौशाला, काठमांडू येथे शनिवार दि. १० जून २०२३ ला करण्यात आले. (great response of devotees of Nepal to international satsang ceremony nashik news)

या अतिरुद्रतात्मक लिंगार्चन आणि ललिता सहस्त्रनाम पठण सोहळ्यास अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. भरातभरातून आलेल्या भाविकांबरोबरच स्थानिक भाविकांनी प्रचंड प्रमाणात हजेरी लावून. सेवेचा मनमुराद आनंद लुटला.

या सोहळ्यात ‘अखिल मानवजाती आणि सजीव सृष्टीच्या कल्याणासाठी’, आणि ‘विश्वशांतीसाठी’ “श्री अतिरुद्रात्मक रुद्राक्ष लिंगार्चन व श्री ललिता सहस्त्रनाम पठाणाची” अतिविशेष आध्यात्मिक सेवा नेपाळ सहित - जगभरातील हजारो श्री स्वामी समर्थ सेवेकऱ्यांनी भगवान पशुपतीनाथ आणि गुह्येश्वरी मातेच्या चरणावर मोठ्या उत्साहाने आणि श्रद्धेने समर्पित केली.

नेपाळ मध्ये प्रथमच होत असलेल्या अश्या या अभूतपूर्व ऐतिहासिक-आध्यात्मिक आंतरराष्ट्रीय सत्संगाचे प्रमुख पाहुणे नेपाळचे सन्माननीय उपराष्ट्रपती श्री. रामसहाय प्रसाद यादव होते. सोबतच नेपाळचे सन्माननीय प्रधान सेनापती (सेनाध्यक्ष) श्री. प्रभुराम शर्माजी व सन्माननीय सशस्त्र प्रहरी महानिरीक्षक श्री. राजू आर्यालजी, नेपाळचे रिटायर्ड रथी श्री अमर पंतजी, श्री रिटायर्ड कर्नल श्री अभिराज आचार्य, श्री. माधव थापा, दुबई सेवा केंद्राचे श्री. रवी काळे, जॉइंट कमिशनर मुंबई श्री. रमेश पवार या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित होते. 

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

great response of devotees of Nepal to international satsang ceremony nashik news
Ashadi wari : संत गजानन महाराजांची पालखी आज मराठवाड्यात दाखल

नेपाळच्या राष्ट्रशिष्टाचारा प्रमाणे नेपाळचे राष्ट्रगीत व त्यानंतर लष्कराच्या बँडने राष्ट्रगानाची धुन वाजवून कार्यक्रमाला सुरुवात झाली. शांतीमंत्रानंतर - कार्यक्रमासाठी बनवण्यात आलेल्या विशेष रुद्राक्ष लिंगाचे पूजन परमपूज्य गुरुमाऊलींनी नेपाळच्या उपराष्ट्रपती सोबत केले.

 परमपूज्य गुरुमाऊलींनी आपल्या आशीर्वादरुपी हितगुजात नेपाळचा  - नाथांच्या भूमीचा आवर्जून उल्लेख करुन नवनाथांचे संस्कृती टिकवणे व मानव घडवण्याचे हिमालयाचे उंचीचे कार्य विषद केले. सद्य परिस्थितीत देखील तश्याच प्रकारे कार्य हे स्वामी सेवेकऱ्यांनी करावे असे आवाहन केले. श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाचे गेल्या सत्तर वर्षांपासून सुरू असलेल्या सेवा कार्याचा परिचय नेपाळ मधील भाविकांना करुन दिला.

सेवेकऱ्यांच्या ‘१८ सुत्री ग्राम व नागरी – विकास अभियानाद्वारा’ समाजजीवनात सकारात्मक बदल करण्याचे कार्य जगभरात सुरू आहे. नेपाळ मध्ये लवकरच श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाचे कार्य हे मोठ्या प्रमाणात वाढावे अशी अपेक्षा व्यक्त करुन नेपाळस्थित सेवेकऱ्यांच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांचे कौतुक केले. परमपूज्य गुरुमाऊलींच्या अमृत वाणीने स्वामी भक्त मंत्रमुग्ध झाले.

great response of devotees of Nepal to international satsang ceremony nashik news
Ashadhi Wari 2023 : रिंगण सोहळ्याच्या वैभवाची दातलीतील गोल रिंगणावेळी चुणूक!

त्यांनी जैविक जीवनशैलीवर जोर देताना समजावून सांगितले की, सात्विक अन्न, विचार आणि कृतीतून जगामध्ये सकारात्मक बदल आणून सद्य परिस्थितीत होणारे नरसंहार, दहशतवाद यासारख्या वाईट घटना थांबवता येतील व सर्वत्र शांतता नांदेल.

परमपूज्य गुरुमाऊलींनी प्रतिपादन केले की विज्ञान आणि अध्यात्म यांची योग्य सांगड घालून कार्य केल्यास विश्वामध्ये शांती व ऐक्य प्रस्थापित होईल व यासाठी आपण सर्वानी एकजूट होउन विश्वशांतीसाठी कार्य केले पाहिजे. या प्रसंगी त्यांनी “माणुसकी नावाचा एकच धर्म व माणूस नावाची एकच जात”  हा दिव्य संदेश सर्वांना दिला.

तसेच भारतीय संस्कृती व मूल्ये यावर बोलताना 'वसुधैव कुटुम्बकम', बालसंस्कार, युवा प्रबोधन, कृषी शास्त्र, आयुर्वेद, वास्तुशास्त्र, माता-पित्यांचा आदर व कॅन्सर सारख्या आजारावर उपाय इत्यादी गोष्टीवर मार्गदर्शन केले. नेपाळवासियांनी स्वामी कार्यात भाग घेऊन सुखी व आनंदी जीवन जगण्याचे आवाहन केले.

great response of devotees of Nepal to international satsang ceremony nashik news
Sant Nivruttinath Palakhi : संतश्रेष्ठ निवृत्तिनाथांच्या पालखी सोहळ्याचा नगर जिल्ह्यात प्रवेश

नेपाळचे सन्माननीय उपराष्ट्रपती श्री. रामसहाय प्रसाद यादव - हे स्वामी सेवेकऱ्यांची  स्वामी सेवा मार्गावर व परमपूज्य गुरुमाऊलींवरील असीम श्रद्धा बघून भारावून गेले. तर अखिल मानव जातीला स्वामी सेवा कार्याची प्रचंड गरज असल्याचं त्यांनी प्रतिपादन केले. नेपाळ आणि भारताचे आध्यात्मिक व सांस्कृतिक संबंध हे पुराण काळा पासून आहेत आणि ते या विश्वशांती कार्यक्रमामुळे अधिक दृढ होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

नेपाळ मधील सर्वच मान्यवरांनी स्वामी सेवेकऱ्यांच्या शिस्तीचे कौतुक करत, इतक्या लांबून येऊन अतिउच्च आध्यात्मिक सेवा एवढ्या मोठ्या संख्येने केल्याबद्दल हार्दिक अभिनंदन केले.

अतिशय भक्तिपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या ऐतिहासिक-आध्यात्मिक सोहळ्याचा शेवट नेपाळच्या सेवा केंद्राचे नेपाळचे रिटायर्ड जनरल श्री अमर पंतजी यांच्या आभार प्रदर्शनाने आणि त्यानंतर भारताच्या आणि नेपाळच्या राष्ट्रगीताने झाला. हा आंतरराष्ट्रीय सत्संग स्वामी भक्त, सेवेकऱ्यांसाठी अदभूत व विलक्षण अनुभूती देणारा व जीवनामध्ये आनंद व सुखाची गुरुकिल्ली प्रदान करणारा ठरला.

great response of devotees of Nepal to international satsang ceremony nashik news
International Satsang Ceremony : नेपाळमध्ये आज रुद्राक्ष लिंगार्चन सोहळा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.