हिरवी मिरची शंभरी पार; गृहिणींचे बजेट कोलमडले

टोमॅटो लाल चिखलाच्या मार्गावर; गृहिणी बेजार
green chilli cross 100 per kg Malegaon
green chilli cross 100 per kg Malegaonsakal
Updated on

मालेगाव कॅम्प : बाजारात स्थानिक शेतकऱ्यांकडील मालाची आवक घटताच परराज्यातील मालाला अचानक दरवाढीचे गिफ्ट मिळाले आहे. कधी नव्हे ती ‘मिरची’ अख्ख्या बाजारात भाव खाऊन जात आहे. हिरव्या मिरचीने किरकोळ विक्रीत किलोमागे थेट शंभरी पार केल्याने गृहिणींना भाजी बाजारात महागाईचा ठसका भरला आहे. मिरचीसोबत नवख्या कैऱ्या, लिंबू, गवार, काकडीने भाजी बाजारात शंभर रुपये किलोहून जास्त भाव घेतल्याने महिलांचे बजेट कोलमडून पडत आहे.

स्वयंपाक घरात अगत्याची बाब म्हणून मिरची प्रत्येक खरेदीदारांची पसंती असते. कमी तिखट जाड हिरवी मिरची आणि जास्त तिखट बारीक हिरव्या मिरचीचे दोन्ही प्रकार गृहिणी खरेदी करतात. सर्व प्रकारच्या हॉटेल व्यावसायिकांना मिरची खरेदी क्रमप्राप्त असते. मिरचीशिवाय हॉटेल व्यवसाय शक्यच नाही, असे मानले जाते. स्थानिक शेतकऱ्यांनी कांदा, टोमॅटो आणि इतर भाजीपाल्याकडे मोर्चा वळवल्याने मिरची उत्पादनात प्रचंड घट झाली आहे. मिरचीची नियमित मागणी लक्षात घेऊन मालेगावच्या मुख्य बाजारात व्यापाऱ्यांनी मध्यप्रदेश, गुजरात व जिल्ह्यातील बागायती क्षेत्रातून मिरची मागवली आहे. हिरवी जाड मिरची ७० रुपये, तर बारीक हिरवी मिरची शंभर रुपये किलो होलसेल दरात विक्री होत आहे. व्यापारी वर्ग ११० ते १२० प्रतिकिलो दराने किरकोळ विक्री करीत आहे. अद्याप उन्हाळ्याचा आरंभ असतानाच लिंबूने थेट ८० रुपये किलो दर गाठल्याने रसवंती चालकांना नमनालाच वैताग आणला आहे.

उत्पादक उपाशी; परप्रांतीय तुपाशी

महत्वाचा भाजीपाला महागल्याने महिलावर्गाचा एकीकडे नकाश्रू असताना स्वस्त भाजीपाला खरेदीकडे मोर्चा वळवला आहे. सलग चार महिने शंभरी पार मिळणारे वांगे आता ४० ते ५० रुपये किलोवर विसावले आहे. मेथी, शेपू, पालक आणि कोथिंबीर जुडी अवघ्या पाच ते सात रुपये नीचांकी दराने विक्री होत आहे. टोमॅटोचा भाव दिवसागणिक कोसळत असल्याने पुन्हा एकदा लालचिखल होण्याच्या मार्गावर आहे. स्थानिक शेतकऱ्यांकडे असलेल्या मालाला भाव नाही आणि परराज्यातील मालाला प्रचंड भाव या स्थितीत उत्पादक वैतागले आहेत. ग्राहकांनी स्वस्त भाजीपाला खरेदीवर लक्ष केंद्रित केले आहे.

भाजीपाला पिकवताना आजारांची शाश्‍वती, मजूर पुरवठा अधिक असल्याने यात धोके अधिक असतात. बाजाराच्या चढ- उताराचा सर्वाधिक फटका या पिकांना बसत असल्याने शेतकरी या पिकांपासून दूर जात आहे.

- भाऊसाहेब कोकरे,फळबाग उत्पादक, दाभाडी

भाजीपाला दर किरकोळ दर

प्रकार (प्रतिकिलो)

बटाटा १० ते २० १५ ते २५

टोमॅटो १० ते १५ २०

सिमला मिरची ४० ते ५० ६०

हिरवी मिरची जाड ५५ ते ७० १००

हिरवी मिरची बारीक ९० ते १०० १२०

फ्लावर १५ ते २० ३०

भोपळा ७ ते ८ १० (प्रतिनग)

कोबी २५ ४०

वाल काळीशेंग २५ ४०

वाल हिरव्या शेंगा १० १५

गिलके ४० ६०

दोडके ६० ८०

आद्रक २० ३५

गवार ९० १२०

कैरी १०० १२०

वाटाणा शेंगा ४० ६०

भेंडी ४० ६०

काकडी ३० ४०

शेवगा ४५ ६०

गाजर १५ २५

लिंबू ६५ ८०

कारले ५५ ७०

काळे वांगे १५ ते १७ ४०

हिरवे वांगे २५ ६०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.