Nashik News: ‘ग्रीन फिल्ड’ मूल्यांकन लटकले; सोलापूरच्या आंदोलनाचा परिणाम

नाशिकमध्ये शेतकरी चिंतेत
green field expressway
green field expresswayesakal
Updated on

Nashik News : सुरत- चेन्नई ग्रीन फिल्ड महामार्गासाठी जमीन देणाऱ्या सोलापूर व धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना समाधानकारक मोबदला न मिळाल्याने तेथे संतापाची लाट उसळली असताना नाशिकमध्ये मात्र अद्याप मूल्यांकनच निश्चित झालेले नाही.

मूल्यांकनाच्या प्रतिक्षेत असलेल्या शेतकऱ्यांनी तेथील आंदोलनाचा धसका घेतला असून, एवढा कमी मोबदला मिळत असेल तर महामार्गासाठी जमिनी द्याव्या की नाही, असा विचार सुरू झाला आहे.

दरम्यान, दोन्ही जिल्ह्यातील आंदोलनामुळे नाशिकमध्येदेखील आंदोलनाचा भडका उडू नये म्हणून नाशिकसह दिंडोरी व निफाड तालुक्यातील शेतकऱ्यांना भूसंपादनाच्या नोटिसा पाठविल्या जात नसल्याचे बोलले जात आहे. (Green Field assessment postponed Result of Solapur agitation Nashik News)

पूर्व भारताला दक्षिण भारताशी जोडण्यासाठी भारत माला प्रकल्पांतर्गत सुरत-चेन्नई ग्रीन फिल्ड एक्स्प्रेस वे तयार केला जाणार आहे. महाराष्ट्रातील नाशिक, नगर, धाराशिव व सोलापूर या चार जिल्ह्यातून हा एक्स्प्रेस वे जाईल.

सोलापूर व धाराशिव येथे भूसंपादनाची प्रक्रिया सुरु झाली असून बागायती जमिनींचे मूल्यांकन कमी धरल्याने या दोन्ही जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांनी आंदोलने सुरू केली आहेत.

त्याचा परिणाम नाशिकमध्येदेखील दिसून येत असून आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्येदेखील जमिनींचे मूल्यांकन होत नसल्याने शेतकरी चिंतेत आहे. कमी मूल्यांकन धरल्यास येथेदेखील आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्याची तयारी शेतकऱ्यांनी केली आहे.

बागायती जमिनींना कमी भाव मिळतं असेल तर प्रकल्प महत्त्वाचा असला तरी प्रकल्पासाठी जागा देणे परवडणारे नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, रामशेज, पिंपळनारे या दिंडोरी तालुक्यातील गावांमध्ये नोटिसा बजावण्यासाठी दिवस मोजण्याचे काम सुरू आहे.

सोलापूरप्रमाणेच आंदोलनाचा भडका उडू नये याची काळजी यामागे असल्याचे बोलले जात आहे. मूल्यांकन होत नाही, शेतकऱ्यांना भूसंपादनाच्या नोटीस बजावल्या जात नाही. महामार्गासाठी भूसंपादन होणार असल्याने शेती सुरू होत नाही.

"सोलापूरमधील शेतकऱ्यांना बागायती जमिनीचा कमी मोबदला मिळाला. त्यामुळे त्यांचे आंदोलन रास्त आहे. नाशिकमध्ये मूल्यांकन झालेले नाही ते तातडीने होणे गरजेचे आहे."

- साहेबराव पिंगळे, शेतकरी.

"शेतीसाठी सामग्री खरेदी केल्यानंतर भूसंपादनाच्या नोटिसा आल्यास खर्च वाया जाईल. त्यामुळे बागायती जमिनी ओसाड पडल्या आहेत. एक्स्प्रेस वेसाठी होणाऱ्या भूसंपादनाचे मूल्यांकन जाहीर करावे." - पंडित पिंगळे, शेतकरी.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

green field expressway
Adhik Maas 2023: वाण देण्यासाठी फुलले रामतीर्थ! विविध मंदिरामध्ये महिलांची गर्दी

असा आहे ग्रीन फिल्ड एक्स्प्रेस प्रवास

सुरत-चेन्नई ग्रीन फिल्ड एक्स्प्रेस वे माध्यमातून अंतर कमी होणार आहे. नाशिकपासून १७६ किलोमीटर अंतरावर असलेल्या सुरत शहरात अवघ्या दोन तासात पोचणे शक्य होणार आहे. नाशिक जिल्ह्यातील सहा तालुके आणि ७० गावांमधून महामार्ग जाणार आहे.

नाशिकला लागून गुजरात राज्याची सीमा आहे. परंतु, घाट रस्त्यांमुळे वर्दळ कमी असते. ग्रीन कॉरिडॉरमुळे रस्ते अडथळ्यांची समस्या कमी होऊन प्रगतशील सुरतमध्ये दोन तासात रस्ते मार्गाने पोचता येणार आहे.

ग्रीन फिल्ड कॉरिडॉर वैशिष्टे

- जिल्ह्यात ९९५ हेक्टर भूसंपादन होणार.

- नाशिक जिल्ह्यात नऊ हजार कोटींचा खर्च.

- सहापदरी महामार्ग, पाच मीटरचे दुभाजक.

- नाशिक जिल्ह्यात २६ किलोमीटर जंगल व्यापणार.

- ग्रीन फिल्डमुळे विनाअडथळा प्रवास.

- सुरगाणा तालुक्यातील संबरकल येथे १.३५ किलोमीटरचा बोगदा.

- पेठ, सुरगाणामध्ये नऊ डक्ट.

- महामार्गावर वाहनांसाठी अंडरपास.

- वावी येथे समृद्धी महामार्गाशी कनेक्ट.

- नाशिकमधून १२२ किलोमीटर महामार्ग

green field expressway
Nashik Rain Update: पावसाळ्यातला पहिला विसर्ग...! ‘दारणा’पाठोपाठ गंगापूर धरणातून विसर्ग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.