Nashik News : देशातील पहिला एलिव्हेटेड टायर बेस मेट्रो प्रकल्पाची फाइल दिल्लीत धुळखात पडून असली तरी मेट्रो घोषणेमुळे मात्र कामांच्या परवानगी घेताना मात्र तांत्रिक अ़डचणी निर्माण होत आहे.
मुंबई नाका सर्कल विकसित करताना अशीच अडचण निर्माण झाल्याने महापालिकेला महामेट्रोच्या नागपूर कार्यालयाकडे पत्रव्यवहार करावा लागत आहे.
दरम्यान महामेट्रोने प्रस्तावित मार्गात कुठलाच अडथळा येणार नसल्याचे हमीपत्र महापालिकेकडून भरून घेताना सर्कल विकास करण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र दिल्याने मार्ग मोकळा झाला आहे. (Green signal of Maha Metro for development of Mumbai Naka Circle NMC issued no objection certificate Nashik News)
शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करण्यासाठी टायरबेस एलिव्हेटेड स्वरूपाची मेट्रो चालविण्याचा निर्णय घेण्यात आला. केंद्र सरकारने प्रकल्पासाठी २१०० कोटी रुपयांची घोषणा केली.
त्यात ११६१ रुपये कर्ज स्वरूपात उभारले जाणार आहे. महामेट्रोसाठी ३१ किलोमीटर लांबीचे तीन एलिव्हेटेड मार्ग उभारले जाणार असून, त्यावर २५ मीटर लांबीच्या अडीचशे प्रवासी क्षमतेची बस धावणार आहे.
पहिल्या टप्प्यात दोन मार्ग निश्चित करण्यात आले आहेत. पहिला टप्पा १० किलोमीटरचा असून, त्यावर १० स्टेशन राहतील. गंगापूर, जलालपूर, काळेनगर, जेहान सर्कल, थत्तेनगर, शिवाजीनगर, पंचवटी, सीबीएस व मुंबई नाका या मार्गाचा त्यात समावेश असेल.
दुसरा मार्ग 22 किलोमीटरचा असून, त्यावर १५ स्थानके असतील. गंगापूर गाव, ध्रुवनगर, श्रमिकनगर, महिंद्र, सातपूर कॉलनी, एबीबी सर्कल, पारिजातनगर, मायको सर्कल, सीबीएस, सारडा सर्कल, द्वारका, गायत्रीनगर, समतानगर, गांधीनगर, नेहरूनगर, दत्तमंदिर, नाशिक रोड असा मार्ग आहे.
सीबीएस हे संयुक्त स्थानक राहणार आहे. दरम्यान २०२३ पर्यंत महामेट्रोचे काम पूर्ण करण्याचे निश्चित करण्यात आले होते. परंतु दिल्लीत मंत्रिमंडळाच्या बैठकीत फाइलचा प्रवास रखडला आहे. अर्थसंकल्पात प्रकल्पाची घोषणा करण्यात आल्याने कायदेशीर स्वरुप प्राप्त झाले आहे.
त्यामुळे मेट्रोच्या मार्गावर कुठलेही काम हाती घेताना महामेट्रोच्या कार्यालयाशी संपर्क करावा लागतं असून तेथून ना हरकत दाखला मिळाल्यानंतर पुढील कामे होतात.
मुंबई नाका सर्कलचा मार्ग मोकळा
मुंबई नाका येथे मेट्रोचे एक स्टेशन असून तेथे इंटरचेंज प्रस्तावित आहे. परंतू मुंबई नाका भागात वांरवार वाहतूक ठप्प होत असल्याने मायलन सर्कलचा घेर कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला.
घेर कमी झाल्यानंतर या भागात सिग्नल व्यवस्था लावली जाणार आहे. मेट्रोचा इंटरचेंज असल्याने भविष्यात मेट्रोचे काम सुरु झाल्यास अडचण निर्माण होवू नये म्हणून ना हरकत दाखला घेण्यात आला आहे. या निमित्ताने टायरबेस मेट्रोचा विषय संपुष्टात आला नसल्याचे स्पष्ट होते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.