Summer Heat : उन्हाच्या तडाख्याने वऱ्हाडींना घाम

summer heat
summer heatesakal
Updated on

Summer Heat : मेच्या सुट्यांचा काळ व त्यातच विवाह तिथींमध्ये रविवार हा सुटीचा दिवस असल्याने हंगामातील २१ मे ही सर्वांत मोठी लग्नतिथी होती. प्रत्येक गाव-खेड्यात विवाह सोहळा होता. वैशाख वनवा संपल्याने उन्हाचा तडाखा कमी होईल हा अंदाज मात्र फोल ठरला.

ज्येष्ठातही उन्हाचा तडाखा सुरूच आहे. त्यातच आजच्या लग्नतिथीला जागोजागी हजेरी लावताना वऱ्हाडींना उन्हाने घाम फोडला. वाढत्या तापमानामुळे ‘नको रे ते लग्न बाबा’ असे म्हणण्याची वेळ वऱ्हाडींवर आली होती. शहरात रविवारी (ता. २१) ४२.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. (Grooms sweat due to heat of summer nashik news)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

summer heat
Nashik News: कांदा अनुदान, दरप्रश्‍नी नेत्यांना गावबंदी! मुंजवाड ग्रामस्थांचा ग्रामसभेत निर्णय

किमान तापमान २८ अंश सेल्सिअस होते. गेल्या आठवड्यात तापमानात काहीशी घसरण झाल्यानंतर तीन दिवसांपासून तापमान सातत्याने ४२ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक होते. वाढत्या तापमानामुळे गोरज मुहूर्तावरील विवाहतिथी वाढल्या आहेत. दुपारच्या विवाहांसाठी लग्न मंडप व मंगल कार्यालयात वाढत्या झळांपासून बचाव करण्यासाठी कूलर व पंखे लावावे लागत आहेत.

यामुळे वधूपित्याच्या खर्चात वाढ झाली आहे. विवाह सोहळ्यांना जाण्यासाठी अनेकांनी दुचाकीऐवजी चारचाकीला पसंती दिली. तापमानामुळे ताक, मठ्ठा, पाणी, उसाचा रस आदींची जागोजागी जोरदार विक्री सुरू आहे. याबरोबरच शीतपेय, आईस्क्रीम, कुल्फी आदींनाही मोठी मागणी होती.

summer heat
Nashik News : केबल जळाल्याने इंदिरानगर परिसरात अंधार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.