अखेर दैनंदीन वापरातील खादयपदार्थ व तृणधान्यावरील GST मागे

GST latest marathi news
GST latest marathi newsesakal
Updated on

नाशिक : जीवनावश्‍यक व दैनंदिन वापरातील वस्‍तूंवरील ५ टक्‍के जीएसटी (GST) अखेर केंद्र सरकारकडून (Central Government) मागे घेण्यात आला.

सर्वसामान्यांच्या आक्रोशापुढे केंद्र सरकारला नमते घ्‍यावे लागले. जीएसटी मागे घेण्यात आल्‍याने सर्वसामान्यांना तसेच गरिबांना दिलासा मिळाला आहे. सर्वसामान्‍य गृहिणींनी सरकारच्‍या या निर्णयाचे स्‍वागत करून दिलासा व समाधान व्यक्त केले. (GST on daily use food items cereals is stepped down nashik Latest Marathi News)

"सरकारने जीवनावश्‍यक वस्तूंवरील जीएसटी मागे घेऊन आम्‍हा सर्वसामान्यांना दिलासा दिला आहे. कोरोना काळानंतर स्‍थिरस्‍थावर होताना अनेक समस्‍यांना सामोरे जावे लागत होते. त्‍यामुळे ही आमच्यासाठी दिलासादायक बातमी आहे." - नितल देशपांडे, गृहिणी

"दही, पनीर, गहू, तांदूळ यासारख्या वस्‍तूंवर जीएसटी हे खटकतच होते. सरकारने जीएसटी मागे घेतल्‍याने मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा मिळाला आहे. या निर्णयाचे स्वागतच आहे."

- शीतल शेलार, गृहिणी

"जीवनावश्‍यक वस्‍तूत येणारे गहू, तांदूळ, आटा, रवा, बेसन आदींवरचा जीएसटी मागे घेतल्‍याने आर्थिक बजेटलाही दिलासा मिळाला आहे. कारण आमचे महिलांचे महिन्याचे बजेट हे ठरलेले असते." - रूपाली कुरकुरे, गृहिणी

GST latest marathi news
लॅपटॉपने वाहनाचे लॉक उघडणाऱ्या Fortuner चोरट्यांपैकी एकाला राजस्थानातून अटक

"जीएसटी मागे घेतल्‍याचा सरकारचा निर्णय ऐकून खूप मोठा दिलासा मिळाला आहे. कारण गहू, तांदूळ, आटा, दही हे रोजच्या वापरातील खाण्याच्या वस्‍तू आहे. निर्णयाचे स्‍वागत आहे."

- सुवर्णा सोनवणे, गृहिणी

"जीवनावश्‍यक वस्तूंवरील पाच टक्‍के जीएसटी हे ऐकून खूप टेन्शन आले होते, परंतु लगेचच सरकारने जीएसटी रद्द करण्याचा निर्णय घेतल्‍याने समाधान वाटत आहे. अगोदरच महागाई वाढल्‍याने थोडासा का होईना दिलासा मिळाला आहे." - भाग्‍यश्री शिवदेकर, गृहिणी

GST latest marathi news
Crime Update : पाठलाग करून विनयभंग, मारहाण; गुन्हा दाखल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()