Nashik Dada Bhuse : ‘क्वालिटी सिटी’ चळवळीत सहभागी व्हा : पालकमंत्री भुसे

Dada Bhuse Latest Marathi News
Dada Bhuse Latest Marathi Newsesakal
Updated on

Nashik Dada Bhuse : कौशल्य विकास, स्वच्छता आणि शिक्षण या क्षेत्रांवर पहिल्या टप्प्यात भर असलेल्या ‘क्वालिटी सिटी नाशिक’ या चळवळीत शासकीय व निमशासकीय यंत्रणा सहभागी होणारचं, त्याशिवाय नाशिककरांनी हिरिरीने सहभागी होऊन शहर विकासात हातभार लावावा.

क्वालिटी सिटी साकारताना अंमलबजावणीसाठीच्या सूचना लालफितीत अडकू देऊ नका, असा सज्जड इशारा पालकमंत्री दादा भुसे यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दिला. (Guardian Minister Bhuse appeal to citizen Join Quality City movement nashik news)

स्कील इंडिया अर्थात कौशल भारत कुशल मोहिमेंतर्गत क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया आणि नॅशनल स्कील डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या मार्गदर्शनाखाली क्वालिटी सिटी उपक्रम राबविला जात आहे. उपक्रमासाठी देशात पाच शहरांची निवड करण्यात आली असून, त्या शहरातील पहिला मान नाशिकला मिळाला आहे.

त्याअनुशंगाने महापालिका मुख्यालयात स्वंयसेवी संस्थांची बैठक बोलाविण्यात आली होती. त्या वेळी पालकमंत्री भुसे यांनी सूचना दिल्या. उपक्रमासाठी क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडियासमवेत नाशिक महापालिका, नाशिक जिल्हा परिषद, क्रेडाई नाशिक मेट्रो, नाशिक सिटीझन्स फोरम, श्री रामकृष्ण आरोग्य संस्थान यांच्यात एक सामंजस्य करार केला जाणार आहे.

नॅशनल स्कील डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे संचालक जितूभाई ठक्कर, आमदार प्रा. देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, महापालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर, अतिरिक्त आयुक्त भाग्यश्री बानायत, प्रदीप चौधरी, माजी विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Dada Bhuse Latest Marathi News
Dada Bhuse : मर्यादा सोडू नका, नाहीतर.... पालकमंत्री दादा भुसे यांचे संजय राउतांना खडेबोल

पालकमंत्री भुसे म्हणाले, स्वच्छता, शिक्षण व आरोग्य या तीन विषयांवर आपल्याला काम करायचे आहे. जलदगतीने व प्रभावीपणे मानांकनापर्यंत पोचण्यासाठी सर्वांनी मदत करायची आहे.

लोकांनी हा उपक्रम हाती घ्यायचा आहे. श्री. ठक्कर यांनी प्रास्ताविक करताना गुणवत्तापूर्ण शहर बनविण्यासाठी सर्वांच्या मदतीची आवशक्यता असल्याचे मत व्यक्त केले. देशातील पाच शहरांची निवड करताना नाशिकमधील क्षमतांचा विचार करण्यात आला.

१५ ऑगष्ट २०२४ पर्यंतचे ध्येय डोळ्यांसमोर ठेवून वाटचाल करण्याचे आवाहन त्यांनी केले. क्रेडाई मेट्रोचे अध्यक्ष कुणाल पाटील, यांनी लेबर स्किल तसेच त्यांच्यासाठी घरे बांधण्याच्या संकल्पनेची माहिती देताना सिंहस्था निमित्त प्रस्तावित बाह्य रिंगरोड नव्वद मीटरचा व्हावा, अशी मागणी केली.

Dada Bhuse Latest Marathi News
Nashik Dada Bhuse : नाशिककरांना 8 दिवसात दिसेल रिझल्ट; पालकमंत्र्यांचे आश्वासन

नाशिक सिटीझन फोरमचे उपाध्यक्ष सचिन गुळवे, निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे, आयमा अध्यक्ष निखिल पांचाळ, नाईसचे विक्रम सारडा, आयएमएच्या डॉ. श्रेया कुलकर्णी यांनी क्वालिटी सिटी संकल्पना राबविण्यासंदर्भातील सूचना व अंमलबजावणीची कार्यवाही सादर केली.

क्वालिटी सिटीचे उद्दिष्ट

नाशिकमधील घरेलू कामगार, वाहनचालक, शिपाई आणि सुपरवायझर स्तरावरील व्हाइट कॉलर कर्मचारी यांच्या कौशल्य विकासाचा कार्यक्रम पहिल्या टप्प्यात हाती घेतला जाणार आहे. अंमलबजावणीसाठी परस्पर सहकार्याची क्षेत्रे शोधणे, विकसित करणे आणि कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट आहे.

क्वालिटी सिटी नाशिक चळवळीअंतर्गत त्या-त्या क्षेत्रांमधली सध्याची परिस्थिती समजून घेण्यासाठी प्रत्येक क्षेत्राचे परिस्थितीजन्य विश्लेषण करणे, त्यानंतर अडथळे व संभाव्य आव्हाने ओळखून त्यांच्यावर मात करणे, स्थानिक परिस्थितीच्या अनुषंगाने कृतिआराखडा तयार करून आवश्यक तेथे अभ्यासक्रमांच्या दुरुस्तीसह अंमलबजावणी करणे.

Dada Bhuse Latest Marathi News
Nashik Dada Bhuse : दवाखान्यातील गर्दी कमी करण्यासाठी रानभाज्यांची आवश्यकता : पालकमंत्री दादा भुसे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.