Republic Day 2024 : शासकीय योजनांतून सर्वसामान्यांचा विकास : पालकमंत्री भुसे

जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासात सहभाग नोंदवावा, असे आवाहन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी केले.
Guardian Minister Bhuse Statement on Development of common people through government schemes republic day 2024 nashik news
Guardian Minister Bhuse Statement on Development of common people through government schemes republic day 2024 nashik newsesakal
Updated on

नाशिक : सर्वसामान्यांच्या विकासासाठी शासनामार्फत विविध योजना राबविण्यात येत असतात. या योजनांचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घेऊन जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासात सहभाग नोंदवावा, असे आवाहन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी केले.

पोलीस कवायत मैदानावर75 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्य ध्वजवंदन सोहळ्यातते बोलत होते. (Guardian Minister Bhuse Statement on Development of common people through government schemes republic day 2024 nashik news )

यावेळी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, नाशिक महानगरपालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर, पोलिस आयुक्त संदिप कर्णिक, विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. बी.जी. शेखर पाटील, जिल्हा पोलिस अधीक्षक शहाजी उमाप, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीचे संचालक राजेश कुमार, प्रभारी जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, स्वातंत्र्य सैनिक, माजी सैनिक उपस्थित होते.

पालकमंत्री भुसे म्हणाले, प्रजासत्ताकाचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करतांना युवकांचे सक्षमीकरण करून त्यांना आत्मनिर्भर करण्यावर भर देत असून या सक्षम युवांच्या माध्यमातून समर्थ भारत घडविण्याचा व देशाला आर्थिक महासत्ता बनविण्याच्या मार्गावर आपण वाटचाल करीत आहोत. यासोबतच बळीराजासाठी शासनाने प्रधानमंत्री पिक विमा योजनेंतर्गत जिल्ह्यातील पाच लाख 88 हजार 648 शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला आहे.

Guardian Minister Bhuse Statement on Development of common people through government schemes republic day 2024 nashik news
Republic Day 2024 : अविनाश साबळेंमुळे बीड जिल्ह्याला पुन्हा बहुमान ; प्रजासत्ताक दिनानिमित्त अतिविशिष्ट सेवापदक जाहीर

नुकतेच नाशिक जिल्ह्याचा समावेश क्वालिटी सिटी अंतर्गत करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे व शिक्षणासाठी आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी मॉडेल स्कुल योजना तसेच JEE व NEET प्रवेशासाठी सुपर ५० हा उपक्रम राबविण्यात येत आहे. आनंदाचा शिधा' या उपक्रमाच्या माध्यमातून गोरगरीब नागरिकांना डाळी, तेल अशा विविध सहा वस्तु अवघ्या शंभर रुपयांत उपलब्ध करून देण्यात येत आहे.

तसेच बेघर अथवा कच्ची घरे असणाऱ्या कुटुंबांना केंद्र व राज्य पुरस्कृत ग्रामीण गृहनिर्माण योजने अंतर्गत जिल्ह्यात साधारण एक हजार 513 भूमीहिन लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून दिली असून पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थ सहाय्य योजने अंतर्गत ४८ लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे.

उमेद अभियान अंतर्गत 2023-24 या आर्थिक वर्षात जिल्ह्यातील पाच हजार 167 महिला स्वयंसहाय्यता गटांना 145 कोटी 46 लाखांचे बँकेमार्फत अर्थसहाय्य देण्यात आले. प्रधानमंत्री जन आरोग्य योजने अंतर्गत जिल्ह्यात आजपर्यंत 15 लाख 44 हजार 780 नागरिकांना आयुष्यमान भारत कार्ड देण्यात आले.

महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीचे संचालक राजेश कुमार, प्रभारी जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, स्वातंत्र्य सैनिक, माजी सैनिक उपस्थित होते.
महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीचे संचालक राजेश कुमार, प्रभारी जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, स्वातंत्र्य सैनिक, माजी सैनिक उपस्थित होते.esakal
Guardian Minister Bhuse Statement on Development of common people through government schemes republic day 2024 nashik news
Republic Day 2024: प्रियंका पवार ATS ची स्पेशल ऑपरेशन कमांडो कशी बनली? मंत्र्याने सांगितला खास किस्सा

महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत एक लाख 10 हजार 166 लाभार्थ्यांना 522 कोटी व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेत एकूण पाच हजार 192 लाभार्थ्यांना 12.10 कोटी रकमेचे मोफत उपचार करण्यात आले असल्याची माहिती ही पालकमंत्री यांनी यावेळी दिली. या योजनांचा नागरिकांनी जास्तीत जास्त लाभ करून घ्यावा. जिल्हा विविध विकासात्मक उपक्रम राबविण्यात सातत्याने अग्रस्थानी राहण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली

ध्वजवंदनानंतर पोलीस दल, होमगार्ड, गृहरक्षक, शहर वाहतुक शाखा, अग्निशमन दल, भोसला मिलटरी पथक, उर्दु बडी दर्गा, पोलीस बॅन्ड पथक, डॉग युनिट आदी पथकांनी संचलन केले. तसेच विविध शाळेच्या विद्यार्थ्यांमार्फत सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण करण्यात आले. सुत्रसंचलन सिमा पेटकर यांनी केले.

यांचा झाला सन्मान

# महाराष्ट्र गौरव पुरस्कार योजनेअंतर्गत भारतीय सैन्यदलातील शौर्यचक्र प्राप्त जवान ग्रुप कॅप्टन योगेश्वर कृष्णराव कांदळकर यांना एकरकमी रोख रक्कम देऊन सन्मान करण्यात आला.

Guardian Minister Bhuse Statement on Development of common people through government schemes republic day 2024 nashik news
Republic Day 2024 : पद्मश्री या मानाच्या पुरस्कारासाठी उदय देशपांडे यांची निवड ; मल्लखांब ऑलिंपिकमध्ये न्यायचाय : देशपांडे

# स्वातंत्र्य सैनिक व त्यांच्या पत्नी यांचा सत्कार : भिमसेन गणपत पगारे, नाशिक, मनोहर त्र्यंबक कुलकर्णी, नाशिक, माधव नथु वाघ, निफाड, राजाभाऊ रखमाजी राजवाडे (मयत) मालेगाव यांच्या पत्नी केदाबाई राजवाडे, जान मोहम्मद उस्मान (मयत) मालेगाव यांच्या पत्नी अस्मानबानो मोहंमद, मोहयुद्दीन मोहमंद (मयत) मालेगाव यांच्या पत्नी नजीबुनिसा मोहमंद

# राष्ट्रपती पदक : . उत्तम राजाराम सोनवणे (पोलीस उपनिरीक्षक), अशोक लक्ष्मण काकड (सहा. पोलिस उपनिरिक्षक, पंचवटी पो.स्टे.), नंदु रामभाऊ उगले ( सहा. पोलिस उपनिरिक्षक, बीडीडीएस), नितीन विश्वनाथ संधान ( पोलिस हवालदार, शहर वाहतूक शाखा, नाशिक), विनय देवरे (सहा. पोलीस उपनिरीक्षक), प्रमोद आहेर (सहा. पोलीस उपनिरीक्षक)

# पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह : प्रकाश डोंगरे, पोलीस हवालदार

# विशेष सेवा पदक : राहुल घोलप ( पोलीस नाईक), स्वप्निल रंधे (पोलीस नाईक)

# अनुकंपाभरती : भरत अशोक काकळीज (अधिक्षक अभियंता, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण), रोहित निंबा सोनवणे, शंतनु नानाजी कापडणीस, सुरज मोठाभाऊ साळुंके (मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नाशिक), रेणुका राजेंद्र खोलकर, नरेंद्र सिताराम गांगोडे (उपसंचालक आरोग्य सेवा, नाशिक, मंडळ नाशिक), करणसिंग भगवानसिंग परदेशी, अमित प्रविण धिवरे (मुख्यवन संरक्षक, प्रादेशिक कार्यालय,नाशिक), दिवाकर मोहन वाघ (अधीक्षक अभियंता, राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समिती, नाशिक), विशाखा राजेंद्र शिंपी (विभागीय सह निबंधक, सहकारी संस्था, नाशिक), लक्ष्मीकांत श्रीकांत गायखे, बाबासाहेब गौतम बनसोडे, मयुर सुनिल मोढे, प्रथमेश सुनिल आढाव, अभिजीत ज्ञानेश्वर कदम, सुरज साहेबराव सोनवणे (उपसंचालक भूमी अभिलेख, नाशिक)

Guardian Minister Bhuse Statement on Development of common people through government schemes republic day 2024 nashik news
Republic Day 2024 Wishes : प्रजासत्ताक दिनानिमित्त द्या मराठीतून खास शुभेच्छा, पाहा लिस्ट

# महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजना व प्रधनमंत्री जन आरोग्य योजनेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या रुग्णालये : एस.एन.बी.टी. इन्स्टीट्युट ऑफ मेडिकल सायन्स अँड रिसर्च सेंटर, नाशिक, जिल्हा शासकीय रुग्णालय, नाशिक

# कौशल्य रोजगार, उद्योजकता व नाविन्यता जिल्हा कार्यकारी समितीमार्फत पुरस्कार : श्रीमती सायली ननावरे, श्रीमती सायली कुटे, कृतीका भंडारी, सुजल देशमुख, सोनल बागुल, ईश्वरी भरवटे, जिया खिवसरा, अर्जुन शिंदे, वेदांत पिंगळे, प्रशांत शिंदे.

# सांस्कृतिक कार्यक्रम : के.के. वाघ विद्यालय, भोसला मिलिटरी स्कुल, डीएसपी विद्यालय, गुरुकुल विद्यालय या शाळेच्या विद्यार्थ्यांनि देशभक्तीपर गीतांवर नृत्य सादर करीत उपस्थितांची वाहवा मिळविली.

Guardian Minister Bhuse Statement on Development of common people through government schemes republic day 2024 nashik news
Republic Day 2024 : मंदिरांच्या देशात शहींदांचे मंदिर असलेले अनोखे गाव, मंदिर बनलंय गावाची ओळख!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.