Dada Bhuse | शिक्षण आरोग्यातील नावीन्य उपक्रमांना भरघोस निधी : दादा भुसे

 Dada Bhuse
Dada Bhuseesakal
Updated on

नाशिक : जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये लोकसहभागातून नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले जात आहे. हे उपक्रम आपल्या गावांमध्ये राबविल्या आदर्श गावे होतील. जिल्हा परिषदेच्या माध्यमातूनही शिक्षण असो की, आरोग्य यात नावीन्यपूर्ण उपक्रम (Activity) राबविले जात आहे.

यातून भावी पिढी उभी राहणार आहे. (Guardian Minister Dada Bhuse assured that activities in education health will not be allowed to fall short of funds nashik news)

त्यामुळे शिक्षण, आरोग्यातील उपक्रमांना निधीची कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाही पालकमंत्री दादा भुसे यांनी दिली. नावीन्यपूर्ण उपक्रमांच्या माध्यमातून नाशिक पॅटर्न तयार करा. हा आदर्श पॅटर्न बघायला राज्यभरातील लोक आले पाहिजे असे आदर्श काम उभे करण्याचे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागांतर्गत मिशन १०० आदर्श शाळा विकसित करणे कार्यशाळा शुक्रवारी (ता.१७) रावसाहेब थोरात सभागृहात झाली. या कार्यशाळेचे पालकमंत्री दादा भुसे यांनी उदघाटन केले.

यावेळी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, खासदार हेमंत गोडसे, आमदार हिरामण खोसकर, बाळासाहेबांच्या शिवसेना गटाचे जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते, युवा नेते उदय सांगळे, मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल,

अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे, प्रकल्प संचालक प्रतिभा संगमनेरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हर्षल नेहते, शिक्षणाधिकारी भगवान फुलारी आदी उपस्थित होते.

हेही वाचा : हिंडेनबर्ग अहवालाचा फटका भाजपला भविष्यात बसणार?

 Dada Bhuse
Nashik News : नंदिनी प्रदूषणावर CCTVची नजर; स्मार्टसिटीकडून पत्र

पालकमंत्री भुसे म्हणाले की, ग्रामीण भागातील शाळांमध्ये गोर-गरिबांची मुले शिकतात. या मुले जागतिक स्पर्धेत टिकली पाहिजे. यासाठी पहिल्या टप्यांत १०० शाळा स्मार्ट केल्या जात आहे. यापुढे जाऊन १०० शाळांचे रूपांतर एक हजार शाळांमध्ये करायचे आहे.

महिला बचत गटांच्या उत्पादन होणाऱ्या मालास विक्री व्यवस्थेसाठी शासकीय जागा उपलब्ध करून घेण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे भुसे यांनी सांगितले.शासनाकडून राबविल्या जात असलेल्या योजना आपल्यासाठी आहे, असे समजावून त्यांची अंमलबजावणी झाली पाहिजे.

योजनांवर अवलंबून न राहता गावांनी लोकसहभाग वाढवून नावीन्यपूर्ण उपक्रम हाती घेण्याची गरज आहे. या उपक्रमांमध्ये सातत्य ठेवल्यास सर्व गावे आदर्श होतील, असा विश्वास झिरवाळ यांनी व्यक्त केला.

आदर्श शाळा विकसित करण्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. विस्तार अधिकारी नीलेश पाटोळे यांनी प्रास्ताविक तर शिक्षण विस्तार अधिकारी नेहा शिरोरे यांनी सूत्रसंचालन केले. उपशिक्षणाधिकारी धनंजय कोळी यांनी आभार मानले.

 Dada Bhuse
Nashik News: शस्त्रकलेच्या प्रशिक्षणातून वारसा जतन; ते दांपत्य जपताहेत शिवकालीन युद्धनीती इतिहास

सुंदर गाव पुरस्काराचे वितरण

कार्यशाळा सुरू होण्यापूर्वी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दरवर्षी राज्य शासनातर्फे देण्यात येणाऱ्या (कै.) आर.आर पाटील सुंदर गाव पुरस्कार निफाड तालुक्यातील थेरगाव आणि इगतपुरी

तालुक्यातील शिरसाठे या गावांना विभागून देण्यात आला. तसेच १५ तालुक्यातील १५ गावांना तालुकास्तरावरील सुंदर गाव पुरस्काराचे वितरण यावेळी झाले.

उमेद अंतर्गत महिला बचत गटांना देणाऱ्या निधीच्या धनादेशाचे प्रातिनिधीक स्वरूपात बचत गटांना वितरणही यावेळी मान्यवरांच्या हस्ते झाले. आरोग्य विभागांतर्गत जागरूक पालक सुदृढ बालक योजनेतंर्गत बालकांची तपासणी सुरू आहे. या बालकांना हेल्थ कार्डचे वाटप केले जाणार असून याचा शुभारंभ यावेळी मान्यवरांच्या हस्ते झाले.

विजेचा लंपडाव

रावसाहेब थोरात आयोजित केलेल्या कार्यक्रमात विजेचा लपंडाव सुरू होता. चार तास सुरू असलेल्या या कार्यक्रमात वारंवार वीज गायब होत असल्याने कार्यक्रमात व्यत्यय येत होता. वीज गायब झाल्यानंतर सभागृहात उपस्थितांकडून मोबाईलचा टॉर्च लावला जात होता.

 Dada Bhuse
Nashik Crime News : विनयभंग करणाऱ्या संशयितास अटक

या गावांचा झाला सन्मान

वडांगळी (सिन्नर), वेळुंजे (त्र्यंबकेश्वर), शिरसाठे (इगतपुरी), थेरगाव (निफाड), सुळे (कळवण), बोराळे (नांदगाव), राजदेरवाडी (चांदवड), दरी (नाशिक), भारदेनगर (मालेगाव), कोपुर्ली बु. (पेठ), महालखेडा पा. (येवला), पिंपळदर (बागलाण), करंजवण (दिंडोरी),

वरवंडी (देवळा) आणि बुबळी (सुरगाणा). श्रीकृष्ण महिला स्वयंसहाय्यता समूह (करंजाळी, पेठ), ओमसाई महिला स्वयंसहाय्यता समूह (करंजाळी, पेठ), सुकन्या महिला स्वयंसहाय्यता समूह (अंबाई, त्र्यंबकेश्‍वर), कंसारी महिला स्वयंसहाय्यता समूह (विल्होळी, नाशिक).

झिरवाळ यांची फटकेबाजी

कार्यक्रमात विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी चांगलीच फटकेबाजी केली. दिंडोरी तालुक्यातील विविध गावांमध्ये लोकसहभाग असो की, शिक्षक यांनी राबवीत असलेल्या नावीन्यपूर्ण उपक्रमांचे दाखल देत त्यांनी उपस्थितीत ग्रामसेवक, सरपंच, सदस्यांना टोलेबाजी केली.

गावांना पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर दुसर्या दिवशी ते गावात दिसत नाहीत. त्यासाठी सातत्य ठेवावे, आपले गाव म्हणून काम करावे, शासनावर अवलंबून राहण्यापेक्षा लोकांना एकत्र करून विकास करा, अशा कानपिचक्याही त्यांनी यावेळी दिल्या.

 Dada Bhuse
Wood Apple : उष्णतेच्या विकारांपासून दूर ठेवणारे बहुगुणी कवठ; आयुर्वेदात महत्त्व अधोरेखित

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.