Dada Bhuse News : नाशिकची कायदा सुव्यवस्था नियंत्रणात; पालकमंत्री दादा भुसे यांचा दावा

Dada Bhuse news
Dada Bhuse newsesakal
Updated on

Dada Bhuse News : गेल्या काही महिन्यांमध्ये नाशिकमधील कायदा व सुव्यवस्था बिघडली आहे. असे असतानाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सातत्याने परिस्थितीवर लक्ष ठेवून असून, पोलिस आयुक्तांशी संवाद साधत आहे.

त्यामुळे कायदा व सुव्यवस्था नियंत्रणात असल्याचा अजब दावा पालकमंत्री दादा भुसे यांनी केला आहे. गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांमध्ये संघर्ष होत असल्याचे सांगताना अशा गुन्हेगारांवर मोका लावणे योग्य असल्याचा दावादेखील केला. (Guardian Minister Dada Bhuse comment on Law and order in Nashik news)

काही महिन्यांमध्ये नाशिक शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडली आहे. दर दोन- तीन दिवसांनी खुनाच्या घटना घडत आहे, तर अमलीपदार्थांचेदेखील प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आलेल्या पालकमंत्री भुसे यांना माध्यमांनी कायदा व सुव्यवस्थेबद्दल प्रश्न उपस्थित केला.

त्यावर बोलताना त्यांनी मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री फडणवीस हे परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचे सांगितले. खून आपसांतील वादातून होत असल्याचा दावा त्यांनी केला. पोलिसांनी अशा गुन्हेगारांवर केलेली मोकाची कारवाई योग्य आहे. प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे, परंतु त्याचा वापर कसा करावा याचेदेखील चिंतन व्हायला हवे असा सल्ला त्यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना दिला.

मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाखालील राज्यात महायुतीचे सरकार योग्यरीतीने काम करत आहे. जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी खासदार राऊत असे वक्तव्य करत आहे. मुंबई व नाशिक महामार्गावरील खड्डे बुजविण्याचे काम जवळपास पूर्ण होत आले आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Dada Bhuse news
Aditya Thackeray News : बहुमत असूनही दत्तक पिता नाशिकचा.... आदित्य ठाकरे यांची भाजपवर टीका

भिवंडी बायपास येथे २२ किलोमीटर रस्त्यावरील २४ कट बंद करण्यात आले आहे. पोलिसांना सहकार्य करण्यासाठी पोलिस मित्रांचीदेखील नियुक्ती केली आहे. त्यामुळे नाशिक- मुंबईदरम्यान महामार्गावरील वाहतूक सुरळीत झाल्याचा दावा पालकमंत्री भुसे यांनी केला.

पूजेवरून महायुतीत खटके

राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री छगन भुजबळ यांनी काही दिवसांपूर्वी सरस्वती पूजेसंदर्भात वक्तव्य केले होते. त्याचा धागा पकडून पालकमंत्री दादा भुसे यांनी त्यांच्यावर टीका केली. नाशिकमध्ये एका कार्यक्रमाच्या निमित्ताने भुजबळ यांनी फुले, शाहू व आंबेडकर हेच आपले दैवत असल्याचे वक्तव्य केले.

त्यावर फुले, शाहू, आंबेडकर यांना पुजले पाहिजे. मात्र सरस्वतीचा अपमान करणेदेखील बरोबर नाही, असा चिमटा भुसे यांनी काढला. भारत देश हा हिंदू दैवतांना मानणारा आहे. त्यामुळे कोणाच्या भावनांना ठेच लागेल, असे वक्तव्य करणे भुजबळ यांनी टाळावे असा सल्लाही त्यांनी दिला.

Dada Bhuse news
Dada Bhuse News : पाऊस नसल्याने काटकसर करावी; दादा भुसेंचे आवाहन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.