Dada Bhuse
Dada Bhuseesakal

Dada Bhuse: कुशल व अकुशल कामांचे प्रमाण राखा; पालकमंत्री दादा भुसे यांचे रोहयो आढावा बैठकीत निर्देश

Published on

Dada Bhuse : जिल्ह्यात महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून कामे करताना कुशल व अकुशल कामांचे ६०:४० प्रमाण राखावे. आधी अकुशल कामे करून नंतर कुशल कामे करावेत, अशा शब्दांत पालकमंत्री दादा भुसे यांनी जिल्हा परिषद प्रशासनाला सुनावले.

यामुळे मिशन भगीरथ, शाळांच्या संरक्षक भिंती आदी कामांचे नियोजन करताना जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाकडून हा नियम डावलत कामे करण्यास ब्रेक लागला असून, आता अकुशल कामांना प्राधान्य द्यावे लागणार आहे. (Guardian Minister Dada Bhuse instructions in MGNREGA review meeting nashik news)

रोजगार हमी योजनेची कामे करताना कुशल व अकुशल कामांचे ६०:४० प्रमाण राखण्याची जबाबदारी जिल्हा परिषदेची आहे. वर्ष अखेरपर्यंत हे प्रमाण राखले जाईल, अशा शब्दांत मुख्य कार्यकारी अधिकारी अशिमा मित्तल यांनी रोजगार हमी कार्यालयातील कार्यक्रम अधिकारी, तांत्रिक अधिकारी यांच्या बैठकीत गत आठवड्यात सांगितले होते.

त्यावर ६०:४० प्रमाण आतापासून राखले नाही तर वर्षाच्या अखेरीस कसे राखले जाणार, असा प्रश्न उपस्थित झाला होता. जिल्हा परिषदेने आतापर्यंत अधिकाधिक १०२ कोटींची कामे रोजगार हमीतून केलेली आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

 Dada Bhuse
Nashik News: प्रकल्पग्रस्तांचा पायी मोर्चा मुंबईकडे रवाना; मुख्यमंत्र्यांना देणार निवेदन

यावर्षी ग्रामपंचायत विभागाने यावर्षी २४ लाख मनुष्य दिवस रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट ठेवले असून आतापर्यंत तीन लाख मनुष्य दिवस रोजगार निर्मिती केली आहे. मात्र, सध्या नियोजित केलेली कामे पूर्ण करण्यासाठी ५८ लाख मनुष्य दिवस रोजगार उपलब्ध करावा लागणार आहे.

पालकमंत्री दादा भुसे यांनी जिल्हा परिषदेत दोन आढावा बैठका घेतल्या. या बैठकीत ग्रामपंचायत विभागाने रोजगार हमी योजनेतून सुरू असलेल्या कामांचे सादरीकरण केले.

यात पालकमंत्री भुसे यांच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या १०० मॉडेल स्कूलची कामे रोजगार हमीतून सुरू असल्याचेही सांगण्यात आले. तसेच मिशन भगीरथमधून सुरू असलेल्या सिमेंट बंधाऱ्यांच्या कामांचीही यावेळी माहिती देण्यात आली.

 Dada Bhuse
Nashik News: रेशनकार्डसाठी दिव्यांग थेट तहसीलदार दालनात

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.