Dada Bhuse News : सामान्यांना डिजिटल शिक्षणाची संधी देण्यासाठी प्रयत्न : पालकमंत्री दादा भुसे

dada bhuse
dada bhuse
Updated on

Dada Bhuse News : सर्वसामान्यांपर्यंत डिजिटल शिक्षणाची संधी गेली पाहिजे. त्यासाठी प्रयत्नशील असून लवकरच या संदर्भात राज्य सरकारतर्फे एक महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला जाणार असल्याची घोषणा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व पालकमंत्री दादा भुसे यांनी शनिवारी (ता. ९) केली.

नाशिक महापालिकेच्या शिक्षण विभागातर्फे कालिदास कलामंदिरात शिक्षक गौरव पुरस्कारांचे वितरण पालकमंत्री भुसे यांच्या हस्ते पार पडले.

या वेळी ते बोलत होते. आमदार सीमा हिरे, महापालिकेचे आयुक्त डॉ. अशोक करंजकर, अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, उपायुक्त श्रीकांत पवार व्यासपीठावर उपस्थित होते. (Guardian Minister Dada Bhuse statement about Efforts to provide opportunities for digital education to common people nashik news)

डिजिटल शिक्षणाची संधी आता महापालिका व जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सर्वसामान्य घरातील विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्याचे शासन प्रयत्न करत असल्याचे श्री. भुसे यावेळी म्हणाले. गोरगरिबांचे मुले उच्चवर्गीय यांच्या पाल्यांच्या स्पर्धेत सरस ठराविक यासाठी शिक्षण विभाग प्रयत्न करत आहे.

त्यांना यशही मिळत असल्याचे बाब अभिमानास्पद आहे. विद्यार्थ्यांमध्ये शास्त्रज्ञ, कलावंत, कवी, खेळाडू दडलेला आहे. त्यांना वाव मिळून दिल्यास देशाचा विकास होईल. रस्ते, गटारी या प्रकारची कामे सुरू असताना यातील एखादे काम मागे पुढे झाले तरी चालेल मात्र शैक्षणिक क्षेत्राच्या संदर्भात कुठेही कमतरता राहता कामा नये.

क्रांती घडविण्याची ताकद शिक्षकांमध्ये आहे. शिक्षकांनी निर्धार केल्यास नाशिकचे नाव देश पातळीवर पोचेल, असा विश्वास श्री. भुसे यांनी व्यक्त केला. सूत्रसंचालन करताना शिक्षकावर सोपविल्या जाणाऱ्या कामांबद्दल तक्रार करण्यात आली. हाच मुद्दा पकडून पालकमंत्री भुसे यांनी शिक्षकावर विश्वास असल्यामुळे जादा काम दिले जात असल्याचे नमूद केले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

dada bhuse
Dada Bhuse News : शेतकऱ्यांना 2 टप्प्यांत कांद्याचे अनुदान : पालकमंत्री भुसे

शिक्षकांनी ज्ञानदानाच्या मूळ गाभ्यावर फोकस करण्याची गरज असल्याचेही सांगितले. डिजिटल युगात चांगले नागरिक घडविण्याचे संस्कार विद्यार्थ्यांवर करावेत, असे आवाहन आमदार हिरे यांनी केले. प्रशासन अधिकारी बी. टी. पाटील यांनी प्रास्ताविक केले. स्मार्ट स्कूल, दप्तरमुक्त शनिवार, बाल संवाद या उपक्रमांची माहिती त्यांनी दिली. दीपाली वरुडे, रत्नेश चौधरी यांनी ईशस्तवन सादर केले. सूत्रसंचालन व आभार मंगेश जोशी, शीतल भाटे यांनी मानले.

यांचा झाला गौरव

वैशाली क्षीरसागर, श्रीकृष्ण वैद्य, जयश्री मराठे, दत्तात्रेय शिंपी ,किरण वाघमारे, रोहिणी मंडळ, अनंत शिंपी, सविता बोरसे, श्रुती हिंगे, काझी जहाँआरा मोहिनुद्दीन, राजेंद्र सोनार, बाळासाहेब आरोटे, ज्योती फड, किरण शिरसाट, मंगला पवार यांचा पालकमंत्री भुसे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

dada bhuse
Dada Bhuse News : शिक्षणाचे नाशिक मॉडेल राज्यात आदर्श ठरावे : पालकमंत्री दादा भुसे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()