Dada Bhuse | मालेगाव गटविकास अधिकाऱ्यास सक्तीच्या रजेवर पाठवा : पालकमंत्री भुसे

Dada Bhuse news
Dada Bhuse newsesakal
Updated on

नाशिक : जिल्हा परिषदेत झालेल्या आढावा बैठकीत मालेगाव तालुका अनेक योजनेत पिछाडीवर दिसून आल्याने पालकमंत्री दादा भुसे यांनी मालेगावचे गटविकास अधिकारी जितेंद्र देवरे यांना तत्काळ सक्तीच्या रजेवर पाठवून त्यांचा कार्यभार दुसऱ्या अधिकाऱ्याकडे देण्याचे आदेश दिले. तसेच जिल्हा परिषदेचे बांधकाम विभाग एकचे कार्यकारी अभियंता सुरेंद्र कंकरेज यांचा मुद्दाही बैठकीत गाजला. त्यांच्याविरोधात आमदारांच्या तक्रारी वाढलेल्या असताना बैठकीस दांडी मारल्यामुळे त्यांची चौकशी करून अहवाल शासनाला सादर करण्याचे आदेश भुसे यांनी प्रशासनाला दिले. (Guardian Minister Dada Bhuse statement about Malegaon Group Development Officer Nashik News)

Dada Bhuse news
Nashik Crime News : सिन्नरमध्ये घरफोड्या करणारी टोळी जेरबंद : 6 घरफोड्यांची उकल

जिल्हा परिषदेत पालकमंत्री भुसे यांनी शुक्रवारी (ता. ११)आढावा बैठक घेतली. बैठकीत योजनानिहाय झालेल्या आढाव्यात मालेगाव तालुक्यात काम नसल्याचे निदर्शनास येत होते. बांधकाम, पाणंद असो की समाजकल्याणअंतर्गत सायकलवाटप या योजनांबाबत देवरे यांचे दुर्लक्ष असल्याचे दिसत असल्याने आक्रमक झालेल्या पालकमंत्री भुसे यांनी देवरे यांना सक्तीच्या रजेवर पाठवून त्यांचा कारभार दुसऱ्या अधिकाऱ्याकडे द्या. जबाबदार अधिकारी असताना महत्त्वाच्या बैठकांना गैरहजर राहतात.

त्यांना कर्तव्याची जाणीव नाही, अशा शब्दांत त्यांनी अधिकाऱ्यांवर ताशेरे ओढले. बैठकीत आमदार हिरामण खोसकर यांनी हा मुद्दा उपस्थित करत कंकरेज यांच्यावर कारवाई करण्याची आग्रही मागणी केली. कंकरेज हे कार्यालयात उपस्थित राहत नाही, खासगी कार्यालयात बसून ते ठेकेदारांना बोलवतात आणि त्यांची पिळवणूक करतात. ३१ मार्च २०२२ रोजी प्रशासकीय मान्यता मिळालेली कामे केवळ त्यांनी वेळात कार्यारंभ आदेश न दिल्याने रद्द झाली आहेत. त्यांच्यावर तत्काळ करवाई करण्याची मागणी त्यांनी केली.

पालकमंत्री भुसेंनी या प्रकरणाची तत्काळ दखल घेत कंकरेज यांच्या कारभाराचा यापूर्वीचा अहवाल राज्य शासनाकडे पाठविण्याचे आदेश दिलेले आहेत. तसेच नव्याने त्यांची चौकशी करून त्यांचा कारभार दुसऱ्या अधिकाऱ्यांकडे सोपविण्याचे आदेश दिले आहेत.

Dada Bhuse news
Nashik : ZPच्या कामकाजाचे पालकमंत्र्यांनी काढले वाभाडे; महिनाभरात घेणार आढावा बैठक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.