Dada Bhuse News : शिक्षणाचे नाशिक मॉडेल राज्यात आदर्श ठरावे : पालकमंत्री दादा भुसे

Guardian Minister Dada Bhuse, MLA Seema Hire, etc. along with awardee teachers at the meritorious teacher award ceremony of Zilla Parishad.
Guardian Minister Dada Bhuse, MLA Seema Hire, etc. along with awardee teachers at the meritorious teacher award ceremony of Zilla Parishad.esakal
Updated on

Dada Bhuse News : जिल्हा परिषदेतर्फे गतवर्षी ‘सुपर ५०’ हा उपक्रम यशस्वी झाला असून त्यात यंदा ५० ऐवजी १०० विद्यार्थ्यांना संधी दिली जात आहे. ‘सुपर ५०’ मध्ये निवड झालेले विद्यार्थी हे भविष्यात नक्कीच जिल्ह्याचा नावलौकिक वाढवतील.

इंग्रजी माध्यमातील शाळांसोबत स्पर्धा टिकण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शाळा मॉडर्न स्कूल म्हणून विकसित करण्याचे काम सुरू आहे. अंगणवाड्या बोलक्या झाल्या पाहिजे, यादृष्टीने बांधकामे केली जात आहे.

जिल्हयात राबविण्यात येणारा हा नावीन्यपूर्ण शिक्षणाचा उपक्रम राज्यात शिक्षणाचा नाशिक मॉडेल म्हणून नेता येईल, असा विश्वास पालकमंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केला. (Guardian Minister Dada Bhuse statement about Nashik model of education should be ideal in state news )

जिल्हा परिषदेच्या २०२३-२४ वर्षाचे गुणवंत शिक्षक पुरस्कार वितरण गंगापूर रोडवरील रावसाहेब थोरात सभागृहात शनिवारी (ता.९) पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते झाले.

आमदार सीमा हिरे, मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे, प्राथमिक शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव, माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रवीण पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि) रवींद्र परदेशी, उपशिक्षणाधिकारी भास्कर कनोज, गटशिक्षणाधिकारी मीता चौधरी आदी उपस्थित होते. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासोबतच जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना आवश्यक असणाऱ्या सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनामार्फत कोणताही निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही देखील पालकमंत्री भुसे यांनी दिली.

शिक्षकांनी विद्यार्थ्यांना बदलत्या काळानुसार डिजिटल माध्यमातून शिक्षण देण्यासाठी आवश्यक कौशल्य आत्मसात करावीत. आपल्या ज्ञानदानाच्या कामातून उद्याचे आदर्श नागरिक घडणार असल्याने शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासावर देखील भर द्यावा, असे आमदार हिरे यांनी सांगितले. गुणवंत शिक्षक पुरस्कारासाठी कमी प्रस्ताव येत असल्याची खंत मुख्य कार्यकारी अधिकारी मित्तल यांनी प्रास्ताविकात व्यक्त केली. उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते यावेळी शिक्षकांचा गौरव करण्यात आला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Guardian Minister Dada Bhuse, MLA Seema Hire, etc. along with awardee teachers at the meritorious teacher award ceremony of Zilla Parishad.
Dada Bhuse News: राज्यातील अकरा नदीजोड प्रकल्पांचे सादरीकरण : पालकमंत्री दादा भुसे

पुरस्कारार्थी शिक्षक

प्रमिला भावराव पगार (बागलाण), वैशाली विलास जाधव (चांदवड), अर्चना दादाजी आहेर (देवळा), नौशाद अब्बास मुसलमान (दिंडोरी), चित्रा धर्मा देवरे (कळवण), अनिल सारंगधर शिरसाट (इगतपुरी), प्रतिभा सुनील अहिरे (मालेगाव), देवेंद्र वसंतराव वाघ (निफाड), उत्तम भिकन पवार (नाशिक), राजकुमार माणिकराव बोरसे (नांदगाव), रवींद्र सुभाष खंबाईत (पेठ), संतोष बाळासाहेब झावरे (सिन्नर), परशराम पंडित पाडवी (सुरगाणा), बालाजी बिभीषण नाईकवाडी (येवला), अर्चना ज्ञानदेव गाडगे (त्र्यंबकेश्वर).

पालकमंत्र्यांनी टोचले कान

भाषणात पालकमंत्री भुसे यांनी शिक्षण विभागासह शिक्षकांचे चांगलेच कान टोचले. इतर भानगडीत वेळ घालविण्यापेक्षा ज्ञानदानाचे काम करावे. खिचडी इतकी का शिजवली याचा किस काढण्यापेक्षा विद्यार्थी घडविण्याचे चांगले काम करा असे त्यांनी सांगितले. शिक्षक चांगले काम करत असल्यानेच त्यांना इतर शासकीय काम दिले जात असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

Guardian Minister Dada Bhuse, MLA Seema Hire, etc. along with awardee teachers at the meritorious teacher award ceremony of Zilla Parishad.
Dada Bhuse News : शेतकऱ्यांना 2 टप्प्यांत कांद्याचे अनुदान : पालकमंत्री भुसे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.