Shiv Mahapuran Katha: शिवमहापुराण कथेचा मिनी कुंभ शहरवासीयांनी यशस्वी करावा : पालकमंत्री दादा भुसे

Guardian Minister Dada Bhuse while guiding the attendees.
Guardian Minister Dada Bhuse while guiding the attendees.
Updated on

Shiv Mahapuran Katha: येत्या २१ ते २५ नोव्हेंबरदरम्यान पंडित प्रदीप मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथेचा मिनी कुंभ नाशिककरांनी एकजुटीने यशस्वी करून शहराचा नावलौकिक जागतिक पातळीवर पोचविण्याचे आवाहन दादा भुसे यांनी केले. कथा उपक्रमासाठी स्वयंस्फूर्तीने तयार झालेल्या शेकडो स्वयंसेवकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

श्री. भुसे म्हणाले, की हा कुंभ कुणा पक्षाचा नाही, तर शहरवासीयांचा आहे. या शिवकथेत अंधश्रद्धेला थारा नाही. विश्वासपूर्वक सेवा केली तर देवाला देखील दान द्यावे लागते, हे या कथेचे सार आहे. यानिमित्ताने संपूर्ण शहरभर एक सकारात्मक ऊर्जा पसरेल. (Guardian Minister Dada Bhuse statement about Shiv Mahapuran katha nashik news)

कथेच्या निमित्ताने सर्व बाबींचे नियोजन केले आहे. मात्र शहरवासीयांची यासाठी मोठी मदत आवश्यक आहे. लाखोंच्या संख्येने भाविक शहरात येणार असल्याने व्यावसायिक, तसेच मालवाहतूक आणि प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांनी भाविकांची लूट करू नये, असे आवाहन त्यांनी केले.

अजय बोरस्ते यांनी सांगितले, की या ठिकाणी सात प्रवेशद्वार ठेवण्यात आले आहेत. नाशिक रोड, पाथर्डी फाटा, इंदिरानगर आदी भागातून येणाऱ्या नागरिकांची त्यामुळे सोय होईल. प्रवेशद्वारांना त्र्यंबकेश्वर, सोमेश्वर, कपालेश्वर, निवृत्ती महाराज, निळकंठेश्वर, टाळकुटेश्वर अशी नावे देण्यात आली आहेत. सध्या सुमारे तीन लाख चौरस फूट मंडपाचे काम सुरू असून, गरज पडल्यास तो वाढविण्याची देखील संपूर्ण तयारी करण्यात आली आहे.

दररोज ५० हजार लोकांसाठी भोजनाची व्यवस्था असेल. शहर वाहतूक सेवेच्या बस कार्यक्रम स्थळाच्या नजीक आणण्याची आणि त्यासाठी स्वतंत्र बस थांबे देखील करण्यात येणार आहेत. मैदानात ३० बेडचे सुसज्ज हॉस्पिटल करण्यात येत आहे.

Guardian Minister Dada Bhuse while guiding the attendees.
Shiv Mahapuran Katha : भूतकाळात वेळ दवडण्याऐवजी सतीयुगात डोकावून पाहा : पंडित प्रदीप मिश्रा

या ठिकाणी २४ तास पाण्याचा पुरवठा केला जाणार असून, जनरेटरची देखील व्यवस्था करण्यात आली आहे. संपूर्ण मैदान सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या कक्षेत घेण्यात आले आहे.

मुक्कामासाठी थांबणाऱ्या भाविकांसाठी ४०० तात्पुरत्या शौच कुपिकांची व्यवस्था करण्यात आली आहे. माहेश्वरी समाजातर्फे संपूर्ण भोजनाची जबाबदारी स्वीकारण्यात आली, तर रामराव पाटील यांनी संपूर्ण मंडपाचा खर्च उचलला आहे. गोकुळ दूध दररोज पाचशे लिटर दूध देणार असून, श्रमिक सेनेचे बाळासाहेब पाठक यांनी या ठिकाणी येणाऱ्या भाविकांना माफक दरात रिक्षा सेवा देण्यात येईल, असे जाहीर केले.

या वेळी महंत भक्तिचरणदास महाराज, आमदार सीमा हिरे, लक्ष्मण सावजी, नाना महाले, सतीश शुक्ल, रंजन ठाकरे, महेश हिरे, बंटी तिदमे, प्रशांत जाधव, कोंडाजीमामा आव्हाड, अमोल जाधव, सुदाम डेमसे, भगवान दोंदे, शिवाजी चुंभळे, राहुल दिवे, संगीता जाधव, सोमनाथ बोराडे, रामसिंग बावरी, समीर शेटे, जगन पाटील आदी उपस्थित होते.

Guardian Minister Dada Bhuse while guiding the attendees.
Nashik News: गटविकास अधिकाऱ्यांसह अधिकारी, कर्मचाऱ्यांना नोटिसा; त्र्यंबकेश्वर पंचायत समिती होती कुलूपबंद

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()