Nashik Drug Case : नशेचा बाजार उठवा, अन्यथा... पालकमंत्र्यांचा पोलिसांना पुन्हा ‘अल्टिमेटम’

Nashik Drug Case : नशेचा बाजार उठवा, अन्यथा... पालकमंत्र्यांचा पोलिसांना पुन्हा ‘अल्टिमेटम’
Updated on

Nashik Drug Case : ड्रग्जमुळे नाशिकला गालबोट लागले असून, ही बाब अत्यंत खेदजनक आहे. समाजाविरोधात नशेचे रॅकेट चालविणे, हा एक प्रकारचा देशद्रोह आहे. त्यामुळे हा नशेचा बाजार पोलिसांनी कठोरपणे कारवाई करून उठवावा.

त्यासाठी येत्या आठवडाभरात त्याची पाळेमुळे खोदून पोलिसांनी अशा समाजविरोधी, देशविरोधी कृत्य करणाऱ्यांचा चेहरा समाजासमोर आणावा. राजकीय लागेबांधे असले, तरीही त्यांची चौकशी करावी.

अन्यथा, हे प्रकरण मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांसमोर नेऊन योग्य रीतीने तडीस लावले जाईल, असा सज्जड दमच पालकमंत्री दादा भुसे यांनी मंगळवारी (ता. १७) पोलिस यंत्रणेला दिला. (Guardian Ministers ultimatum to police for week in md drug crime case nashik news)

जिल्हाधिकारी कार्यालयात ‘अमली पदार्थविरोधी जनजागरण चळवळ’ या संदर्भातील बैठक पालकमंत्री भुसे यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. बैठकीला आमदार डॉ. राहुल आहेर, प्रा. देवयानी फरांदे, सीमा हिरे, सरोज अहिरे यांच्यासह जिल्हाधिकारी जलज शर्मा, पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, पोलिस अधीक्षक शहाजी उमाप, उपायुक्त प्रशांत बच्छाव, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात, एक्साईजचे अधीक्षक शशिकांत गर्जे, पंढरीनाथ थोरे, प्राचार्य हरीश आडके यांच्यासह विविध शैक्षणिक संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री भुसे म्हणाले, की ड्रग्ज‌ नव्हे, तर अवैध धंद्यांविरोधात कारवाईची प्राथमिक जबाबदारी पोलिस प्रशासनाची असली, तरीही अन्य विभागांचेही कर्तव्य आहे. अन्न व औषध विभाग, औद्योगिक विकास महामंडळ यांच्याकडून परवानगी देताना प्रत्यक्ष पाहणी केली जात नसेल, त्यांच्यावरही कारवाई केली जाईल. ड्रग्ज, अवैध धंदे ज्या कोणाच्या आशीर्वादाने चालत असतील, त्यांचेही बुरखे फाडून पोलिसांनी थेट कारवाई करावी.

नशेविरोधात चळवळ न राहता आता लढा देण्याची गरज आहे. त्यासाठी शैक्षणिक संस्थांनी पुढाकार घेतला पाहिजे. पोलिसांनीही याचा खोलवर तपास करून हे रॅकेट उद्‍ध्वस्त करावे. ज्याठिकाणी अवैध धंदे सुरू असतील, ते त्याच ठिकाणी मोडीत काढावे. पुन्हा ते उभे राहता काम नये. येत्या आठवडाभरात पोलिसांचे रिफ्लेक्शन दिसायला पाहिजे, अन्यथा हे प्रकरण मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांसमोर मांडले जाईल, असा सज्जड दमच पालकमंत्र्यांनी पोलिस यंत्रणेला दिला.

Nashik Drug Case : नशेचा बाजार उठवा, अन्यथा... पालकमंत्र्यांचा पोलिसांना पुन्हा ‘अल्टिमेटम’
Nashik Crime News : नाशिकच्या गुन्हेगारीतील क्रूरतेचे मूळ ‘एमडी’; नशेच्या तपासणीला बगल

लोकप्रतिनिधींचा निशाणा पोलिसांवर

आमदार फरांदे यांनी नेहमीच्या शैलीत पोलिस यंत्रणेला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करीत गंभीर आरोप केले. गेल्या वर्षभरापासून अमली पदार्थांविरोधात आवाज उठवत असताना, पोलिस अधिकाऱ्यांना ड्रग्ज‌ पेडलर्स, सप्लायर्सची माहिती त्यांच्या फोन नंबर आणि ठिकाणांसह दिली, तरीही शहर पोलिसांकडून कोणतीही कारवाई झाली नाही. नशेच्या या गोरख धंद्यात शहर पोलिसच सामील असल्याचा गंभीर आरोप आमदार फरांदे यांनी केला.

जनप्रबोधन, पथनाट्यासारखे प्रयोग करून तरुणांमध्ये कोणतीही जनजागृती होत नाही. प्रत्यक्ष कृती आणि त्याचे परिणाम दिसले पाहिजेत. अमली पदार्थांविरोधात लढा उभा करता येईल. त्यासाठी पोलिसांची मानसिकता सकारात्मक असायला हवी, असे ठाम मत आमदार डॉ. आहेर यांनी मांडले. आमदार अहिरे यांनी शिंदेगावातील कारखान्याला परवानगी कशी दिली गेली, याचा जाब विचारत संबंधित यंत्रणेसह पोलिसही यात सामील असल्याचा गंभीर आरोप करीत स्वत: पोलिसांना माहिती देऊनही कोणतीही कारवाई झाली नव्हती, असे सांगितले.

आमदार हिरे यांनी ड्रग्जमुळे नाशिक शहराच्या विकासाला खीळ बसू शकते. पोलिसांनी कोणताही दबाब न घेता या प्रकरणाचा छडा लावून नशेचा बाजार चालविणाऱ्यांना जेरबंद करण्याची मागणी केली. ग्रामीण भागात रात्री दहापर्यंत हॉटेल, ढाबे, बिअर बार सुरू ठेवावेत, अशी मागणी श्री. थोरे यांनी केली.

Nashik Drug Case : नशेचा बाजार उठवा, अन्यथा... पालकमंत्र्यांचा पोलिसांना पुन्हा ‘अल्टिमेटम’
Nashik MD Drug Case : ‘एमडी’ ड्रग्ज तपासी पथकात ‘फड’; नाशिक शहर पोलिस वर्तुळात उलटसुलट चर्चा

पालकमंत्र्यांच्या सूचना

- शाळा-महाविद्यालयांच्या प्रवेशद्वारावर पोलिस कर्मचारी नेमा

- अमली पदार्थांविरोधात कारवाईसाठी टास्क फोर्स

- शाळा-महाविद्यालयांत विशेष व्यवस्थापन समिती नेमा

- समितीत विद्यार्थी, शिक्षक, प्राचार्य, पालक, डॉक्टर, पोलिसांचा समावेश

- आयुक्तालय, अधीक्षक कार्यालयात स्वतंत्र पोलिस कक्ष उभारा

- शाळा-महाविद्यालयांत सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत

- जिल्हा नियोजन समितीतून निधी दिला जाणार

- नशेच्या आहारी गेलेल्यांवर मोफत उपचारांची सुविधा

- ड्रग्ज‌, अवैध धंद्यांसाठी त्या-त्या कार्यक्षेत्राचा अधिकारी जबाबदार

येथे करा बिनधास्त तक्रार

ड्रग्ज, अवैध धंदे, टवाळखोरी याबाबत सर्वसामान्यांना थेट पोलिसांकडे तक्रार करता यावी, यासाठी ‘हेल्पलाइन खबर’च्या ६२६२२५६३६३ या क्रमांकावर तक्रार देता येईल. तसेच, ८२६३९९८०६२ या व्हॉट्‍सॲप क्रमांकावरही माहिती देता येईल. याबाबत तक्रारदाराची माहिती गोपनीय ठेवली जाईल.

Nashik Drug Case : नशेचा बाजार उठवा, अन्यथा... पालकमंत्र्यांचा पोलिसांना पुन्हा ‘अल्टिमेटम’
Nashik MD Drug Case: भूषण, अभिषेकच्या पोलिस कोठडीत वाढ; पथके नाशिकमध्ये तळ ठोकून

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.