Gudhi Padwa Festival : ‘ऑटोमोबाईल’ मध्ये 30 कोटींची उलाढाल! गुढीपाडव्‍याचा साधला मुहूर्त

rush to buy vehicles on the occasion of Gudipadwa
rush to buy vehicles on the occasion of Gudipadwaesakal
Updated on

नाशिक : गुढीपाडव्‍याच्‍या मुहूर्तावर अनेक ग्राहकांनी आपल्‍या स्वतःच्या वाहन खरेदीची स्‍वप्‍न पूर्ण केले. यामुळे बुधवारी (ता.२२) दुचाकी, चारचाकी वाहनांचे दालन ग्राहकांनी गजबजले होते. सुमारे तीस कोटी रुपयांची उलाढाल या क्षेत्रात झाली असल्‍याचा अंदाज व्‍यावसायिकांनी व्‍यक्‍त केला आहे. (Gudhi Padwa Festival 30 crore turnover in Automobile sector nashik news)

गेल्‍या काही दिवसांपासून वाहनाची चौकशी करताना आगाऊ नोंदणीची ग्राहकांची लगबग सुरू होती. गुढीपाडव्‍याला धार्मिक महत्त्व असल्‍याने अनेकांनी वाहन खरेदीचा मुहूर्त या दिवशी साधला. ग्राहकांनी सहकुटुंब कंपनीचे दालन गाठताना वाहनाचा ताबा घेतला.

ग्राहकांच्‍या स्‍वागतासाठी दालनांमध्ये आकर्षक सजावट करण्यात आलेली होती. तसेच, कॅश डिस्काउंटसह अन्‍य विविध सवलतीच्‍या योजना उपलब्‍ध करून दिलेल्‍या होत्‍या. वाहन खरेदी करतानाचे छायाचित्र टिपताना सोशल मीडियावर पोस्‍ट स्वरूपात व्‍हायरल करत ग्राहकांनी आनंदभाव व्‍यक्‍त केला.

हेही वाचा : अदानी..हिंडेनबर्ग आणि भविष्य....

rush to buy vehicles on the occasion of Gudipadwa
Gudhi Padwa : छत्रपती शिवाजी महाराज चौकातील पुतळ्यासमोर गगनचुंबी गुढी उभारत सिन्नरला शोभा यात्रेची सुरुवात

गाडीसोबत गुढी भेट

चारचाकी वाहनांच्‍या दालनात ग्राहकांसाठी विशेष सुविधा करण्यात आलेल्‍या होत्‍या. या आनंदाच्‍या क्षणी आप्तस्‍वकीयांचे तोंड गोड करण्यासाठी पेढा, चॉकलेटचा बॉक्‍स यासह वाहनाचे औक्षण करण्यासाठी पूजेचे ताट व सोबत छोट्या आकाराची गुढी भेट म्‍हणून दिली जात होती. पारंपारिक वेशभूषेत उपस्‍थित राहून ग्राहकांनी वाहन घरी नेले.

व्‍यावसायिक वाहनांच्‍या खरेदीचा जोर

वैयक्‍तिक वापरासाठीच्‍या दुचाकी, चारचाकीसोबत व्‍यावसायिक वापरासाठी वाहन खरेदीसाठीही गुढीपाडव्‍याचा मुहूर्त साधण्यात आला. यात प्रामुख्याने रुग्‍णवाहिका, स्‍कूल व्‍हॅन, मालवाहू छोटा हत्ती यासह अन्‍य व्‍यावसायिक उपयोगासाठीच्‍या वाहनाची खरेदी करण्यात आली.

rush to buy vehicles on the occasion of Gudipadwa
Gudhi Padwa Celebration: बॉलीवूडनंही दणक्यात साजरा केला गुढीपाडवा..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.