Gurumauli Annasaheb More: सामाजिक बांधिलकीतून सेवाकार्य करा : गुरुमाउली

सेवामार्गाच्या दिंडोरी प्रधान केंद्रात मार्गदर्शन
Gurumauli Annasaheb More
Gurumauli Annasaheb More esakal
Updated on

Gurumauli Annasaheb More : सेवेकऱ्यांनी प्रपंचात राहून आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून सेवाकार्य करावे, असे आवाहन अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गाचे प्रमुख गुरुमाउली आण्णासाहेब मोरे यांनी दिंडोरी प्रधान सेवा केंद्रात गुरुवारी (ता. २२) केले. (Guidance of Gurumauli Annasaheb More in Dindori Pradhan Kendra of Vidhana Sevamarga nashik news)

सेवामार्गाच्या दिंडोरी प्रधान केंद्रात गुरुवारी साप्ताहिक प्रश्नोत्तरे मार्गदर्शन आणि सत्संग समारोप झाला. त्या वेळी गुरुमाउलींनी सेवेकऱ्यांना संबोधित केले. गुरुमाउली म्हणाले, की सेवामार्गामध्ये केवळ वीस टक्के अध्यात्म आणि ऐंशी टक्के समाजकारणाला प्राधान्य आहे.

त्यामध्ये सेवाकार्य करण्यासाठी महिलांना शंभर टक्के आरक्षण देण्यात आले आहे. सेवामार्गातर्फे सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतूनच असंख्य उपक्रम राबविले जातात.

हीच भावना जोपासून सेवेकऱ्यांनी दु:खितांचे अश्रू पुसावेत, त्यांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करावा, अखिल जीवसृष्टीला मुबलक पाणी मिळावे म्हणून रोज पर्जन्यसूक्ताचे पठण करावे आणि अनभिज्ञ लोकांपर्यंत स्वामींचे कार्य पोचवावे, असे स्पष्ट केले.

गुरुपौर्णिमा सोहळ्याविषयी गुरुमाउलींनी सांगितले, की आपला सेवेकरी परिवार खूप मोठा आहे. त्यामुळे सेवामार्गाचा गुरुपौणिमा उत्सव देवशयनी एकादशीपासून सुरू होत आहे. ‘गुरू-शिष्य’ या नात्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे.

गुरू असंख्य लाभतील. मात्र शिष्य होण्याची पात्रता आपल्यामध्ये आहे का, याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे. वीर बजरंगबली आणि धनुर्धारी अर्जुन यांच्या तोडीचे शिष्य अजून तयार झालेले नाहीत. हाच धागा पकडून गुरुमाउलींनी जीवनातील पाच गुरू आणि पंचमाता यांची माहिती दिली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Gurumauli Annasaheb More
Gurumauli Annasaheb More : राष्ट्रहितासाठी ग्रामअभियान गतिमान करा; गुरुमाउली अण्णासाहेब मोरे यांचे आवाहन

आपले आई-वडील हे प्रथम गुरू, तर प्राथमिक ज्ञान देणारे द्वितीय, उच्चशिक्षण देणारे तृतीय, रोजगार देणारे चतुर्थ आणि आध्यात्मिक मार्गदर्शन करणारे पाचवे गुरू असतात. त्याचप्रमाणे जन्मदाती माता, गुरुमाता, राजाची पत्नी, मित्राची पत्नी आणि पत्नीची आई या पंचमाता आहेत.

आपण सर्वजण श्री स्वामी समर्थ महाराजांनाच गुरू मानतो. गुरुतत्त्वही तेच आहेत. या गुरुपौणिमेपासून पुढील गुरुपौर्णिमेपर्यंत महाराजांनी आपला सांभाळ करावा, अशी प्रार्थना आपण करतो आणि रोज ११ माळा व ३ अध्याय व पंचमहायज्ञ ही सेवा करणाऱ्या सेवेकऱ्याचा योगक्षेमही महाराज चालवितात, ही वस्तुस्थिती आहे.

तेव्हा सेवेकऱ्यांनीही केंद्रामध्ये काम करताना प्रामाणिक आणि पारदर्शकपणे कायद्याच्या चौकटीत राहून सेवाकार्य करावे, अशी स्पष्ट सूचना गुरुमाउलींनी केली.

मूल्यसंस्कार, आयुर्वेद, विवाह, प्रशासकीय, मराठी अस्मिता-भारतीय संस्कृती, वास्तूशास्त्र, याज्ञिकी, दुर्ग संवर्धन, स्वयंरोजगार, देश-विदेश अभियान, पर्यावरण-प्रकृती या विषयांवरही गुरुमाउलींनी मार्गदर्शन केले.

Gurumauli Annasaheb More
Gurumauli Annasaheb More : यंदाही ‘सीडबॉल’ उपक्रम : गुरुमाउली अण्णासाहेब मोरे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.