World Remembrance Day: जागतिक स्मरण दिनानिमित्ताने उद्या अपघात नुकसान भरपाईबाबत मार्गदर्शन

World Remembrance Day
World Remembrance Dayesakal
Updated on

World Day of Remembrance : रस्ते अपघातांमध्ये मृत्युमुखी, गंभीर जखमी आणि अपघातमध्ये अपंगत्व प्राप्त झालेल्या व्यक्तींच्या स्मरणार्थ तसेच अपघात पीडितांच्या कुटुंबियांना अपघातमधील नुकसान भरपाई मिळण्यास कायदेशीर मार्गदर्शन देण्याची सामाजिक जबाबदारी म्हणून दरवर्षी नोव्हेंबर महिन्यातील तिसऱ्या रविवार जागतिक स्मरण दिन म्हणून पाळण्यात येतो. (Guidance on accident compensation tomorrow on World Day of Remembrance nashik)

सदर जागतिक स्मरण दिनाच्या अनुषंगाने महामार्ग पोलीस, ठाणे परिक्षेत्र, ठाणे यांचे वतीने रस्ते अपघात जनजागृती व अनुषंगिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

गंगापूर रोडवरील मविप्रच्या रावसाहेब थोरात सभागृहात उद्या, शुक्रवारी (ता.१) सकाळी ११ वाजता या कायदेशीर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

World Remembrance Day
Nashik: गोराणेतील ZP प्राथमिक शाळेच्या प्रवेशव्दाराला ठोकले कुलूप; शिक्षकांच्या तात्पुरत्या नियुक्तीनंतर उघडले कुलूप

यावेळी राज्य महामार्ग वाहतूक विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक डॉ. रवींद्र कुमार सिंगल, नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, जिल्हाधिकारी जलज शर्मा, पोलीस अधीक्षक शहाजी उमाप, जिल्हा परिषदेच्या सीईओ अशिमा मित्तल, महामार्ग अधीक्षक डॉ मोहन दहिकर, मोटार वाहन न्यायालयाचे न्या. पुष्कर जोशी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

तरी यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन राज्य महामार्ग वाहतूक विभागातर्फे करण्यात आले आहे.

World Remembrance Day
Nashik Police: बेशिस्त वाहनचालकांना पोलिसांचा दणका! सव्वा लाखांचा दंडही केला वसुल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.