Gurumauli Annasaheb More : ‘जैसी जिनकी चाकरी, वैसी उनको देन’ : गुरुमाउली

Gurumauli Annasaheb More
Gurumauli Annasaheb More esakal
Updated on

Gurumauli Annasaheb More : श्री स्वामी महाराजांची सेवा करताना आचारसंहिता महत्त्वाची आहे. मात्र, या नियमावलीचे पालन केले नाही तर ‘जैसी जिनकी चाकरी, वैसी उनको देन’ या उक्तीनुसार फलश्रुती मिळते, हे लक्षात घेऊन सेवेकऱ्यांनी सेवा करताना नियमही पाळावेत, असा उपदेश श्री स्वामी सेवामार्गाचे प्रमुख गुरुमाउली आण्णासाहेब मोरे यांनी आज केला. (Gurumauli Annasaheb More guidance about devotion of devotee nashik news)

दिंडोरी प्रधान केंद्रात आज साप्ताहिक प्रश्नोतरे-मार्गदर्शन आणि सत्संग समारोह झाला. या वेळी राज्यभरातून मोठ्या संख्येने आलेल्या सेवेकऱ्यांशी गुरुमाउलींनी संवाद साधला. आपल्या अमृततुल्य हितगुजात गुरुमाउलींनी दुर्गाष्टमीनिमित्त कुलस्वामिनीच्या सेवेबरोबरच श्री स्वामी समर्थांची सेवा आणि पंचमहायज्ञाचे महत्त्व सांगितले.

गुरुमाउली म्हणाले, की आज दुर्गाष्टमी आहे. अष्टमी, नवमी आणि पौर्णिमा या तिथी भगवतीला विशेष प्रिय आहेत. मंगळवार आणि शुक्रवार देवीचे वार आणि गुरुवार स्वामींचा वार सांगितला जातो. मात्र, मानवाने हे वार ठरविले असून, देवाची सेवा करण्यासाठी कोणताही वार आड येत नाही. कोणत्याही दिवशी परमेश्वराची सेवा करता येते.

सेवामार्गाने आचारसंहिता आखली आहे. कौरवांकडे एकापेक्षा एक धुरंधर वीर योद्धे होते. ज्यांनी देवांनाही पराभूत केले, असे पराक्रमी सरदार होते. मात्र, असे असूनही पांडवांचा विजय का झाला, याचा अभ्यास केल्यास सेवामार्गाने नियमावली पाळायला का सांगितली आहे, याचा उलगडा होईल, अशी पुष्टी त्यांनी जोडली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Gurumauli Annasaheb More
Gurumauli Annasaheb More : दिव्याने दिवा- ज्योतीने ज्योत लावा! : गुरुमाउली आण्णासाहेब मोरे

भगवान श्री स्वामी समर्थ महाराज पंजाबजवळच्या छेली खेडा गावी इ. स. १०४९ मध्ये पृथ्वी दुभंगून प्रकट झाले आणि भगवती सीतामाताही नेपाळच्या जनकपूरमध्ये पृथ्वीमातेच्या पोटातून अवतरली. या दोन दैवतांनी कोणाच्या पोटी जन्म घेतला नाही.

इतर दैवी आविष्कारांनी मातेच्या पोटातून जन्म घेतला, असे सांगत गुरुमाउली म्हणाले, की श्री स्वामी महाराज आजही अखंड मानवजातीसाठी कार्य करीत आहेत. त्यामुळे सेवामार्गातर्फे मानव, समाज, राष्ट्र बळकट व्हावे आणि विश्वशांती नांदावी, यासाठीच सेवा केली जाते. अब्जचंडीची सेवा याच उद्देशाने सुरू आहे. ‘जय जवान-जय किसान आणि जय विज्ञान’ हा सेवामार्गाचा नारा आहे.

गर्भसंस्कार, बाल-शिशुसंस्कार, मूल्यसंस्कार, प्रश्नोत्तरे, विवाह, आयुर्वेद, प्रशासकीय, मराठी अस्मिता- भारतीय संस्कृती, देश-विदेश अभियान, स्वयंरोजगार, पर्यावरण प्रकृती, शेती, दुर्ग अभियान, बचतगट प्रतिनिधी, याज्ञिकी आदी महत्त्वपूर्ण विषयांवरही गुरुमाउलींनी प्रासादिक मार्गदर्शन केले.

Gurumauli Annasaheb More
Gurumauli Annasaheb More : सामाजिक भावनेतून मानवाला दुःखमुक्त करा : गुरुमाऊली

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()