Gurumauli Annasaheb More: रामराज्य येण्यासाठी स्वामी कार्य करा : गुरुमाउली अण्णासाहेब मोरे

श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्‍वर येथील श्री गुरुपीठात शनिवारी (ता. ३०) मासिक महासत्संग सोहळा अपूर्व उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला.
Gurumauli Annasaheb More
Gurumauli Annasaheb Moreesakal
Updated on

Gurumauli Annasaheb More : जगभरात बळावलेल्या दहशतवाद, आतंकवाद, अनाचार, अत्याचार, साथीचे आजार, उपद्रव कायमचे नष्ट होऊन शांतता-सुख प्रस्थापित होऊन रामराज्य येण्यासाठी स्वतःला झोकून देऊन स्वामी कार्य करा, असे आवाहन अखिल भारतीय श्री स्वामी सेवामार्गाचे प्रमुख गुरुमाउली अण्णासाहेब मोरे यांनी केले. (Gurumauli Annasaheb More guidance in gurupeeth nashik news)

श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्‍वर येथील श्री गुरुपीठात शनिवारी (ता. ३०) मासिक महासत्संग सोहळा अपूर्व उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. या वेळी देश-विदेशातून आलेल्या हजारो सेवेकऱ्यांनी गुरुमाउलींच्या अमृततुल्य हितगूजचा लाभ घेतला. आपल्या ओघवत्या शैलीत आणि प्रासादिक वाणीत गुरुमाउलींनी सेवेकऱ्यांना संबोधित केले.

नुकत्याच पार पडलेल्या दत्त जयंती नाम सप्ताहाचा धागा पकडून गुरुमाउली मोरे म्हणाले, की नाम, जप, यज्ञ सप्ताह म्हणजे सामाजिक आणि आध्यात्मिक ब्रह्मानंद प्राप्त करण्याचे महत्त्वाचे प्रबळ साधन आहे. चारही दत्तधामांसह सेवा केंद्रांमध्ये सप्ताहकाळात सेवा रुजू करणारे सेवेकरी‌ भाग्यवान आहेत.

Gurumauli Annasaheb More
Gurumauli Annasaheb More: श्रीरामरक्षा, हनुमान चालिसाचे 11 कोटी पठण; गुरुमाउली आण्णासाहेब मोरे यांची घोषणा

आता नूतन वर्षाचे स्वागत करताना भारतमाता आणि स्वामी महाराजांची सेवा केल्यास संपूर्ण वर्षभर महाराज आपला सांभाळ करतील, असे गुरुमाउलींनी नमूद केले. वैयक्तिक, कौटुंबिक, आध्यात्मिक, सामाजिक आणि राष्ट्राच्या प्रगतीसाठी श्री स्वामीचरित्र, दुर्गा सप्तशती, मल्हारी, रुद्र, नवनाथ, गुरुचरित्र या सेवा आणि अब्जचंडीची सेवा निश्‍चितच महत्त्वपूर्ण ठरतील, असे त्यांनी स्पष्ट केले.

परमपूज्य मोरेदादा चॅरिटेबल हॉस्पिटलचे जलदगतीने बांधकाम होऊन वर्षभरात हॉस्पिटलचे काही विभाग सुरू होण्यासाठी १४ जानेवारीला एकदिवसीय नवनाथ पारायण आयोजित करण्यात आले आहे. त्यामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन गुरुमाउली मोरे यांनी केले. १८ ते २५ जानेवारी या काळात शाकंभरी नवरात्र असून, सेवेकऱ्यांनी देशाच्या हितासाठी श्री दुर्गा सप्तशतीचे जास्तीत जास्त पाठ करावे, तसेच २५ जानेवारीला चारही दत्तधामांवर एकदिवसीय गुरुचरित्र पारायण होणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

Gurumauli Annasaheb More
Gurumauli Annasaheb More : स्वामींकडे अभेद्य भक्ती मागा : गुरुमाउली आण्णासाहेब मोरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.