Gurumauli Annasaheb More : प्रखर राष्ट्रभक्त पिढी निर्माण व्हावी : गुरुमाउली अण्णासाहेब मोरे

Gurumauli Annasaheb More guidance patriotic generation should be created nashik news
Gurumauli Annasaheb More guidance patriotic generation should be created nashik newsesakal
Updated on

Gurumauli Annasaheb More : समर्थ राष्ट्र निर्मितीसाठी आजच्या युवकांमध्ये प्रखर राष्ट्रप्रेम अंगी असलेली राष्ट्रभक्त पिढी तयार व्हायला हवी, अशी आदर्श, निर्व्यसनी, शाकाहारी, सदाचारी पिढी घडविण्यासाठी सर्व सेवेकरी बंधू-भगिनींनी परिश्रम घ्यायला हवेत, असे आवाहन गुरुमाउली अण्णासाहेब मोरे यांनी आज केले.

अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ दिंडोरी प्रधान सेवा केंद्रात उपस्थित सेवेकरी, भाविकांशी संवाद साधताना गुरुमाउलींनी हे आवाहन केले. (Gurumauli Annasaheb More guidance patriotic generation should be created nashik news)

शिक्षण, नोकरी, संतती, अपघात, आरोग्य, व्यवसाय, शेती, कर्ज, कोर्ट कचेरी, शत्रूपासून त्रास, नोकरीत बढती, बदली, बडतर्फी, मनःशांती, आध्यात्मिक प्रगती, पितृदोष, पती-पत्नी संघर्ष, घरातील मुले व आई-वडिलांचे मतभेद असे एक ना अनेक प्रश्न, यात काही छोटे-मोठे; तर काही अत्यंत जटील.

या आणखी समस्या घेऊन समर्थ सेवा केंद्रात दिवसेंदिवस गर्दी वाढत आहे. या समस्यांशी लढण्यासाठी लागणारे आत्मबल समर्थ सेवामार्गातील प्रश्नोत्तरे कार्यक्रमातून मिळत असल्याने आणि स्वामी महाराजांच्या कृपाशीर्वादाने हे प्रश्न मार्गी लागत असल्यानेच सेवेकरी, भाविकांचा श्री स्वामी समर्थ महाराजांवरील श्रद्धा दृढ होते आहे, असा विश्वासही गुरुमाउली अण्णासाहेब मोरे यांनी या वेळी व्यक्त केला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Gurumauli Annasaheb More guidance patriotic generation should be created nashik news
Gurumauli Annasaheb More : ‘ठायीच बैसूनि करा एकचित्त आवडी अनंत आळवावा’ : गुरुमाउली

श्री स्वामी समर्थ सेवामार्गाच्या माध्यमातून देशभर आज विविध समजोपयोगी, राष्ट्रनिर्मितीचे, भावी पिढी घडविण्याचे कार्य जोमाने सुरू असले, तरी या सर्व कार्याचा पाया सेवामार्गातून सुरू असलेले प्रश्नोत्तरे हाच आहे.

दर गुरुवारी आणि रविवारी गेली ४० वर्षे गुरुमाऊली दिंडोरी येथे येणाऱ्या भाविक व सेवेकऱ्यांना मार्गदर्शन करून त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्यासाठी काम करीत आहेत. आजही गुरुमाउलींनी दिंडोरीत आलेल्या भाविकांशी विविध विषयांवर संवाद साधला.

काही ठिकाणी अतिवृष्टी, तर काही ठिकाणी दुष्काळसदृश परिस्थिती, मानवनिर्मित व निसर्गनिर्मित समस्या आणि उपाययोजना याबाबत गुरुमाउलींनी ऊहापोह केला. दिंडोरी, त्र्यंबकेश्वरप्रमाणेच सर्व समर्थ केंद्रांत विविध मानवी समस्यांवर मार्गदर्शन ज्येष्ठ सेवेकरी करतात, याचा लाभ सर्वांनी घ्यावा, असे आवाहन दिंडोरी दरबारतर्फे करण्यात आले आहे.

Gurumauli Annasaheb More guidance patriotic generation should be created nashik news
Gurumauli Annasaheb More : कायदा आणि शिक्षणासाठी ‘गीता रहस्य’ उपयोगी : गुरुमाउली

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()