Gurumauli Annasaheb More : विनाखर्च, विनाहुंडा विवाह व्हावेत : गुरुमाउली

Enormous response to marriage aspirants' gatherings organized by Sevamarga.
Enormous response to marriage aspirants' gatherings organized by Sevamarga. esakal
Updated on

Gurumauli Annasaheb More : अखिल भारतीय श्री. स्वामी समर्थ सेवा मार्गातील विवाह संस्कार विभागांतर्गत आजपर्यंत सुमारे पन्नास वर्षात सामुदायिक विवाह सोहळ्याच्या माध्यमातून हजारो विवाह विनाहुंडा, विनाखर्च, मानपामांना फाटा देत झाले.

ही सर्व जोडपी आज आनंदात संसार करीत आहेत. आजकाल विवाहसोहळे म्हणजे आपल्या खोट्या प्रतिष्ठा प्रदर्शित करण्याचे एक साधन झाले आहे. (Gurumauli Annasaheb More statement about marriage nashik news)

ऐपत नसताना अव्वाच्या सव्वा खर्च करून कर्जबाजारी व्हायचं आणि आत्महत्येचा मार्ग स्वीकारायचा म्हणूनच साखरपुड्या सारख्या छोट्या कार्यक्रमात हुंडा न घेता, न देता, विनाखर्च, कुठलाही बडेजाव न करता, मानपान न देता, न घेता विवाह होणे ही आज काळाची गरज बनली असून या पद्धतीनेच लग्न व्हावीत, असा आग्रह गुरुमाउली अण्णासाहेब मोरे यांनी केला.

श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग आणि समर्थ गुरुपीठ अंतर्गत सक्रिय असलेल्या विवाह संस्कार विभागाच्या कामकाजाबाबत माहिती देताना गुरुमाउलींनी हा आग्रह व्यक्त केला.

दिंडोरी दरबारात आणि राज्यभरातील सर्व केंद्राच्या माध्यमातून विवाहेच्छुक मुला, मुलींची माहिती सर्वाना मिळावी म्हणून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अधिक सुलभ पद्धतीने हे अभियान राबविणारे आबासाहेब मोरे म्हणाले की गुरुमाउलीचे स्वप्न आहे गाव तिथे केंद्र आणि केंद्र तिथे विवाह मंडळ. विवाह संस्कार विभाग जर आपल्या केंद्रात कार्यरत असेल तर त्या परिसरातील विवाहइच्छूक मुला- मुलींची नाव नोंदणी तेथे करता येते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Enormous response to marriage aspirants' gatherings organized by Sevamarga.
Gurumauli Annasaheb More : पशुपतिनाथाच्या कृपेने संपूर्ण जगात विश्वशांती नांदेल : गुरुमाउली आण्णासाहेब मोरे

त्या संदर्भात तिथे विवाह संस्कार विभागातील प्रतिनिधी मार्गदर्शन करतात. त्यामुळे श्री.स्वामी समर्थ महाराज व परमपूज्य गुरुमाउलीच्या आशीर्वादाने त्या केंद्राच्या परिसरातील मुला-मुलींची विवाह लवकर होतात आणि त्यांचे भावी वैवाहिक जीवन सुखकर होते. मोफत, निःशुल्क विवाह नोंदणी व अपेक्षित स्थळाची माहिती ऑनलाइन उपलब्ध आहे.

विवाह संस्कार विभागाची प्रथम प्रधान केंद्र दिंडोरी येथे सुरवात झाली होती. आज या विभागाच्या शाखा जिल्ह्यात, राज्यात, देशात, परदेशात पण आहेत. आपला हा मार्ग सेवाभावी असल्यामुळे प्रत्येक केंद्रात मोफत, निःशुल्क विवाह नोंदणीचे फॉर्म भरून घेतले जातात. इच्छुक वधू- वरानी आपल्या जवळच्या केंद्रामध्ये आपला बायोडेटा, फोटो आणि आधार कार्ड सोबत घेऊन जावे आणि विवाह प्रतिनिधीशी संपर्क साधून विवाह नोंदणी करता येते. अर्थात आपले विवाहासाठी रजिस्ट्रेशन मोफत केले जाते.

गुरुमाउलीच्या आशीर्वादाने ‘दिंडोरी प्रणीत विवाह संस्कार’ या उपवर वधू- वरांचा संकलित केलेला डेटा निःशुल्क उपलब्ध करून दिला जातो. या मुळे पालकांना पायपीट करावी लागत नाही. घर बसल्या योग्य, अनुरूप, निर्व्यसनी आणि सेवेकरी वर-वधू बघू शकतात, असेही आबासाहेब मोरे यांनी स्पष्ट केले.

Enormous response to marriage aspirants' gatherings organized by Sevamarga.
Gurumauli Annasaheb More : जीवसृष्टीसह राष्ट्रहितासाठी सेवाकार्य करा : गुरुमाउली

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.