Gurumauli Annasaheb More : सेवेकऱ्यांनी समाज अन्‌ राष्ट्रासाठी योगदान द्यावे : गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे

Gurumauli Annasaheb More
Gurumauli Annasaheb More esakal
Updated on

Gurumauli Annasaheb More : सेवेकऱ्यांनी कर्मयोगीप्रमाणे समाज अन्‌ राष्ट्रासाठी अखंड योगदान द्यावे, असे आवाहन अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गाचे गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांनी आज दिंडोरी प्रधान केंद्रात केले. (Gurumauli Annasaheb More statement Servants should contribute to society and nation nashik news)

दिंडोरी येथील प्रधान केंद्रामध्ये गुरुवारी (ता. ८) साप्ताहिक सत्संग समारोह व प्रश्‍नोत्तरे मार्गदर्शन सेवा झाली. त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना गुरुमाऊली बोलत होते. श्री. मोरे पुढे म्हणाले की, गेल्या ऐंशी वर्षांपासून दिंडोरी प्रणीत सेवामार्गातर्फे विनामूल्य प्रश्‍नोत्तरांप्रमाणेच विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात.

अध्यात्मातून राष्ट्र विकास हे उद्दीष्ट्य डोळ्यासमोर ठेवून कार्य केले जाते. सेवामार्गामध्ये कोणताही भेदभाव पाहिला जात नाही. माणूस ही एकच जात आणि माणुसकी हा एकच धर्म पाळला जातो. दु:खी व्यक्तीला धीर-दिलासा देऊन त्याच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो.

सेवामार्गामध्ये केवळ वीस टक्के अध्यात्म आणि ऐंशी टक्के सामाजिक उपक्रम राबविले जातात. श्री. स्वामी चरित्र सारामृताचे रोज क्रमश: तीन अध्याय, रोज श्री. स्वामी समर्थ या दिव्य मंत्राचा अकरा माळा जप आणि पंचमहायज्ञ करणाऱ्या सेवेकऱ्यांचा योगक्षेम स्वतः: स्वामी महाराज चालवितात, त्यांचे जीवन सुखी करतात, असेही ते म्हणाले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Gurumauli Annasaheb More
Annasaheb More Birthday | स्वामीसेवा घराघरांत पोचविण्याचा ध्यास घ्या : गुरूमाऊली अण्णासाहेब मोरे

सामाजिक उपक्रमांबद्दल बोलताना त्यांनी सांगितले की, अतिवृष्टीही नको आणि अनावृष्टीदेखील नको तर सुवृष्टी होऊन शेतकरी राजा सुखी होऊन धनधान्य विपुल पिकावे, यासाठी आजपासून रोजी पर्जन्यसूक्ताचे अवश्‍य पठण करावे.

तसेच शहीद जवान आणि आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुला-मुलींचे सामुदायिक विवाह सेवामार्गातर्फे केले जातात. यापुढेही हा उपक्रम सुरू राहील. ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचवा, असे आवाहन त्यांनी केले.

नवीन पिढी सदाचारी, सुसंपन्न निर्व्यसनी होण्यासाठी घरोघरी पुंडलिक आणि श्रावणबाळ निर्माण झाले पाहिजेत. त्याकरिता मूल्य संस्काराची चळवळ अधिकाधिक गतिमान झाली पाहिजे, असे विचार त्यांनी मांडले. ११ ते १८ जून या काळात पाथर्डी-अहमदनगर भागात चार ठिकाणी विवाह परिचय मेळावे आयोजित केले जाणार आहेत.

Gurumauli Annasaheb More
Gurumauli Annasaheb More: कुलधर्म, कुलाचार नव्या पिढीपर्यंत पोचवा : गुरुमाऊली

पालकांनी या मेळाव्यांना आवर्जून हजेरी लावावी, असे सांगताना कोणत्याही मानपानाशिवाय कमी खर्चात विवाह करावेत, अशी सूचना त्यांनी केली. शेतकऱ्यांची पेरणीपूर्वी माती, बी व पाणी परीक्षण करावे, तसेच सेंद्रिय दैवतंचा सन्मान करताना जीवहिंसा करू नये व त्याद्वारे अंधश्रद्धेला खतपाणी घालू नये, तर अहिंसापूर्वक जीवन जगावे, अशी स्पष्ट आज्ञा त्यांनी केली.

क्षात्रधर्म या ग्रंथामध्ये आपली कुलदेवी आणि कुलदेव यांची माहिती मिळते. त्यानुसार कुलदेवी मानसन्मान आणि कुळाचार पाळावेत. आर्थिक सुबत्तेसाठी श्रीयंत्रावर आणि निरामय आरोग्यासाठी रूद्रयंत्रावर सेवा करावी. वादळ थांबण्यासाठी वादळ शमन ध्वजाचा वापर करावा अशा महत्त्वपूर्ण आध्यात्मिक सेवाही त्यांनी सांगितल्या.

Gurumauli Annasaheb More
Ashadi Wari : टाळमृदंगाचा गजर अन् ज्ञानोबा माऊली तुकारामांचा जयघोष! कैकाडी महाराजांच्या दिंडीचे प्रस्थान

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.