Nashik News : स्वामी कार्य गावागावात पोहोचविल्यास रामराज्य येईल : गुरूमाऊली अण्णासाहेब मोरे

Gurumauli Annasaheb More
Gurumauli Annasaheb More esakal
Updated on

Nashik News : समाजातील सर्व घटकांनी मिळून श्री स्वामी समर्थ महाराजांचे सेवाकार्य गावागावात अन् घराघरात पोहोचविल्यास रामराज्य प्रस्थापित व्हायला वेळ लागणार नाही, असे प्रतिपादन अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गाचे अध्वर्यू गुरूमाऊली अण्णासाहेब मोरे यांनी केले. (Gurumauli Annasaheb More statements about Swami samarth work is brought to villages nashik news)

त्र्यंबकेश्‍वर येथील श्री गुरूपीठामध्ये शनिवार (ता.३) रोजी गुरूमाऊली यांचा साप्ताहिक सत्संग समारोह झाला. त्यावेळी ते बोलत होते. राज्यभरातून आलेल्या सेवेकऱ्यांशी त्यांनी संवाद साधला. वटपौर्णिमेच्या पावनपर्वावर गुरूपीठामध्ये एकदिवसीय श्रीगुरुचरित्र पारायण झाले. पारायणाला बसलेल्या शेकडो सेवकेऱ्यांनीही परमपूज्य गुरूमाऊलींच्या दर्शन व आशीर्वाद आणि अमृततुल्य हितगुजाचा लाभ घेतला.

गुरूमाऊली म्हणाले, की सेवामार्गाने सदैव राष्ट्रहिताला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. समाजातील सर्व घटकांसाठी सेवामार्गाचे सर्व अठरा विभाग सक्षमपणे कार्यरत आहेत. हे सेवाकार्य विनामूल्य केले जाते. मानव सुखी होऊन तो सदाचारी कसा होईल, नवीन पिढी कर्तृत्ववान, चारित्र्यवान आणि सुसंस्कारित कशी होईल, यादृष्टीने कार्य केले जाते.

मूल्य संस्कार विभागाच्या माध्यमातून भावी पिढीवर सुसंस्कार करून घरोघरी श्रावणबाळ आणि पुंडलिक निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले जातात तर प्रश्‍नोत्तरे विभागाचे प्रतिनिधी दुःखी, कष्टी, पीडित व्यक्तीला स्वामी महाराजांची सोपी सेवा सांगून दुःखमुक्तीचा मार्ग दाखवितात.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Gurumauli Annasaheb More
Vat Purnima 2023 : वटपोर्णिमेनिमित्त भगवतीला आंब्यांची आरास; विलोभनीय दर्शनाने भाविक तृप्त

आयुर्वेद विभागातर्फे जनतेच्या निरामय आरोग्यासाठी आणि विशेषतः कॅन्सर मुक्तीसाठी प्रयत्न केले जातात तर आजारपण आणि आर्थिक संकटे घालविण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोनातून वास्तूदोषांवर उपाययोजना सुचविली जाते. आर्थिक स्थिरतेसाठी व समृद्धीसाठी श्रीयंत्राची सेवा आणि उत्तम आरोग्यासाठी रुद्र यंत्रावर कोणती सेवा करावी याविषयी श्री. मोरे यांनी हितगुजातून सविस्तर माहिती दिली.

हे संपूर्ण सेवाकार्य मानवतावादी भूमिकेतून सुरू आहे. या सेवाभावी कार्यासाठी हजारो हातांची गरज आहे. त्याकरिता समाजातील प्रत्येक घटकाने सेवाकार्यात सक्रिय सहभागी होऊन वंचित, दुःखी, कष्टी व अनभिज्ञ लोकांसाठी कार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. नेहमी समाजासाठी जगा असे सांगताना त्यांनी छत्रपती शिवराय व पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या तेजस्वी कार्याची माहिती दिली.

पुण्यश्‍लोक अहिल्यादेवींनी संपूर्ण भारतभर विहिरी, घाट, तळी, धर्मशाळा उभारल्या. मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण केले आणि देवस्थाने उभारून जनतेला सन्मार्गाला लावले. छत्रपती शिवरायांचे कार्यही अलौकिक होते. या लोकोत्तर महापुरुषांच्या जीवनादर्श आचरणात आणावा, असे त्यांनी नमूद केले.

Gurumauli Annasaheb More
Sant Nivruttinath Palakhi : संत निवृत्तिनाथांच्या पालखीत 15 सदस्यीय आरोग्य पथक

सर्वत्र सुवृष्टी होऊ अखिल जीवसृष्टीला पिण्यासाठी, शेतकऱ्यांना शेतीसाठी आणि कारखान्यांना उद्योगांसाठी पाणी मिळावे याकरिता आपण गंगापूजन, जलपूजन केले. सुवृष्टी झाली तर विपुल प्रमाणात धान्य पिकून शेतकरी सुखी होईल आणि शेतकरी सुखी झाला तर जग सुखी होईल.

हाच धागा पकडून त्यांनी शेतीला राष्ट्रीय उद्योगाचा दर्जा मिळाल्यास अगदी अल्पभूधारक शेतकऱ्याला खऱ्या अर्थाने सरकारकडून न्याय मिळेल, याकडे लक्ष वेधले. केंद्र सरकारने याबाबत कायदा करावा, अशी मागणी त्यांनी केली.

वारंवार अपघात होतात अशा अपघातस्थळी कोणती सेवा करावी तसेच नैसर्गिक आपत्ती टाळण्यासाठी कोणती सेवा उपयुक्त आहे, त्याची माहिती त्यांनी उपस्थितांना दिली. पावसाळ्यात दीर्घ आयुष्य असणाऱ्या वृक्षांचेच रोपण व संगोपन करावे, अशा सूचना त्यांनी सेवेकऱ्यांना केली. यावेळी चंद्रकांतदादा मोरे व नितीनभाऊ मोरे हेही उपस्थित होते.

रविवार, गुरुवार व शनिवारी हितगूज

श्रीक्षेत्र दिंडोरी येथील प्रधान केंद्रात दर रविवारी आणि गुरुवारी तर श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्‍वर येथील श्री गुरूपीठात दर शनिवारी परमपूज्य गुरूमाऊली श्री. मोरे यांचे हितगूज होते.

Gurumauli Annasaheb More
Nashik Bazar Samiti : पहिल्याच सभेत चुंभळे गटाच्या संचालकाचा सभात्याग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.